गर्भावस्थेत हिमोग्लोबिन प्रमाण कमी होणे-ऍनेमिया (What is Anemia ?)
ऍनिमिया म्हणजे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होणे. हिमोग्लोबिन हे लाल पेशींमधील महत्वाचा भाग असते. या पेशींद्वारे शरीराला आक्सिजनचा पुरवठा केला जातो. शरीरामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाल्यास ऍनिमियाचा त्रास होऊ लागतो.गर्भावस्थेत हिमोग्लोबीन कमी झाल्यास मात्र आईच्या पोटामध्ये वाढणाऱ्या बाळालाही पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही त्यामुळे याचा विपरीत परिमाण गर्भावर आणि आईच्या आरोग्यावर होऊ शकतो.
ऍनिमियामुळे गर्भावर आणि आईच्या आरोग्यावर होणारा परिणाम (Effect of Anemia on Fetal development and Mother’s Health)
ऍनेमियामुळे गरोदरपणामध्ये प्रचंड अशक्तपणा येतो अश्यावेळी गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाला पुरेश्या प्रमाणात ऑक्सिजन न मिळाल्याने त्याची अंतरिक वाढ योग्य प्रमाणात होत नाही. ऍनेमियामुळे कमी वजनाचे बाळ जन्माला येते, डेलिव्हरीच्या दरम्यान खूप साऱ्या समस्या निर्माण होऊ शकतात . बाळाचा वेळापूर्वी जन्म होऊ शकतो किंवा जन्माच्या वेळी बाळाचा मृत्यू होऊ शकतो. अनेमियामुळे बाळासोबतच आईच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.
ऍनिमियामुळे अकाली प्रसूती होऊ शकते, बाळाची वाढ आणि वजन कमी असते, जन्मानानंतरही बाळाची वाढ मंद गतीने होते, मतिमंद किंवा अपंग बाळ जन्माला येऊ शकते. या शिवाय प्रसूतीदरम्यान अति रक्तस्त्रावामुळे नवीन आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो.

ऍनिमिया होण्याची कारणे (What Causes Anemia During Pregnancy?)
१. गरोदरपणात असंतुलित आहार.
२. कमी वयामध्ये गरोदर राहणे.
३. एकपेक्षा जास्त गर्भधारणा होणे म्हणजे जुळे किंवा तिळे गर्भ राहणे.
४. गरोदरपणात खूप जास्त उलट्या किंवा जुलाब होणे.
५. एका डिलिव्हरीनंतर लगेच दुसरा गर्भ राहणे.
६. चहा, कॉफी किंवा दुधाचे प्रमाण आहारामध्ये जास्त असणे.
७. पोटामध्ये जंत झाल्यानेही अनेमिया होऊ शकतो.
८. काही महिलांमध्ये जन्मापासूनच लोहाचे प्रमाण कमी असते अश्यावेळीही गरोदरपणामध्ये अनेमिया होण्याच्या शक्यता जास्त असतात.
ऍनिमिया असण्याची लक्षणे (What are the signs and symptoms of Anemia during Pregnancy )
१. अशक्तपणा, थकवा जाणवणे. –
गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीमध्ये थकवा आणि अशक्तपणा जाणवणे हे साधारण आहे पण हा थकवा जर खूप जास्त असेल आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्येही असेल तर ऍनेमिया असण्याची शक्यता असते.
२. चक्कर येणे, छातीमध्ये धडधडणे.
शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते त्यावेळी वारंवार चक्कर येणे आणि धाप लागणे , छातीमध्ये धडधड होणे , दम लागणे अश्या समस्या जाणवतात.
३. भूक न लागणे.
गरोदरपणामध्ये आई आणि बाळाला पुरेसे पोषण मिळण्यासाठी आईने पुरेसा आहार घेणे आवश्यक असते पण जर खाण्याची इच्छा होत नसेल किंवा भूकच लागत नसेल तर त्यावेळी मात्र ऍनेमिया असू शकतो.
४. चिडचिड वाढणे व झोप न लागणे.
सतत छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होणे, राग येणे किंवा अस्वस्थ वाटणे आणि रात्री शांत झोप न लागणे हे हि अनेमिया असण्याचे एक लक्षण आहे.
५. त्वचा काळवंडणे.
गर्भावस्थेत शरीरामध्ये होणाऱ्या हार्मोनल चेंजेस मुळे गर्भवतीचे त्वचा उजळते पण लोहाची कमतरता असेल , ऍनेमिया असेल तर त्वचेची उजळ कमी होते.
६. एकाग्रता कमी होणे.
ऍनेमियामुळे कोणत्याच गोष्टीवर लक्ष केंद्रित होत नाही , एकाग्रता करण्याची क्षमता कमी होते.
७. वजन प्रमाणापेक्षा कमी वाढणे.
भूक न लागल्याने, पुरेसे पोषण न मिळाल्याने आणि पुरेशी गाढ झोप न घेतल्याने जेवढी वजन वाढ अपेक्षित असते तेवढी होत नाही.
८. गरोदरपणात उच्च रक्तदाब राहणे.
गरोदरपणामध्ये उच्च रक्तदाब राहणे आणि यासोबतच अजूनही समस्या ऍनेमियामुळे उध्दभवू शकतात.
ऍनिमियावर योग्य ते उपचार (How to treat Anemia During Pregnancy ?)
ऍनिमियाचे बरेच प्रकार आहेत , नक्की कोणत्या प्रकारचा ऍनिमिया आहे हे तपासण्यासाठी योग्य त्या चाचण्या करणे आवश्यक असते. लोहाच्या, व्हिटॅमिन बी-१२ च्या किंवा फोलेट च्या कमतरतेमुळे ऍनिमिया होऊ शकतो. यापैकी कोणता ऍनिमिया आहे यानुसार योग्य ते वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक असते.
मुख्यतः लोहाच्या कमतरतेमुळे ऍनिमिया होण्याची जास्त शक्यता असते.
ऍनिमिया असल्यास घरगुती काय उपाय करावेत , आहार कसा घ्यावा? (Iron Rich Diet For Anemia)
लोहाच्या कमतरतेमुळे जर ऍनिमिया झाला असेल तर गर्भवतीच्या आहारामध्ये विशेष बदल करणे आणि वेळेमध्ये घेणे आवश्यक असते.
१. लोखंडाच्या भांडयांमध्ये जेवण बनवा ज्यामुळे लोहाची कामतरता कमी होण्यास मदत होते.
२. पाणी आणि इतर द्रव पदार्थांचा आहारामध्ये समावेश करणे.
३. रात्रीची पुरेशी आणि गाढ झोप घेणे.
४. चहा, कॉफी आणि थंड पेयांचे प्रमाण कमी ठेवणे.
५. ताण तणाव आणि टेन्शन कमी घेणे.जास्तीत जास्त आनंदी आणि सकारात्मक राहणे.
६. गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यापासून डॉक्टरांच्या सल्ल्याने फॉलीक ऍसिडच्या गोळ्या घ्याव्यात.
७. ऍनिमियाचे प्रमाण जास्त असेल तर आयर्न चे इंजेक्शन किंवा रक्तही चढवले जाते. यासाठी डॉक्टरांनाच योग्य तो सल्ला घ्यावा.
ऍनेमिया कमी करण्यासाठी उत्तम पदार्थ (Iron Rich Food Items To Treat Anemia During Pregnancy)
काही लोहयुक्त पदार्थांच्या नियमाची सेवनामुळे ऍनिमिया वर लवकर मात करता येऊ शकते.
१. हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या – पालक , ब्रोकोली इ.
२. बीट खाल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण पटकन वाढते.
३. गूळ,शेंगदाणे, खजूर,मनुके, जर्दाळू, प्रुन्स, अंजीर ,डाळिंब, तीळ यांचे सेवन नियमित करावे.
४. अंडी, मटण, मासे आहारामध्ये घ्यावेत.
५. आंबट गोड फळांचे रस किंवा फळे खावीत. संत्री, आवळा, मोसंबी यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असते.
६. चहा आणि कॉफीचे प्रमाण कमी करणे.
या लेखामध्ये आपण गरोदरपणात होणाऱ्या अनेमियाबद्दल थोडक्यात माहिती पाहिली . मला खात्री आहे की या माहितीचा(information) तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
हे वाचा
गरोदरपणात आईचा आहार कसा असावा ?
नॉर्मल डिलिव्हरी कशी होते ? Normal Delivery Process In Marathi
गरोदरपणात गर्भाचे वजन वाढवण्यासाठी उपाय How to increase baby weight during pregnancy?