बाळाला भूक न लागण्याची कारणे आणि भूक वाढवण्यासाठीचे  घरगुती उपाय |Loss Of Appetite In Children : Causes and Best 9 Tips To Improve It

Spread the love
बाळाला भूक न लागण्याची कारणे आणि भूक वाढवण्यासाठीचे  घरगुती उपाय |Loss Of Appetite In Children : Causes and Tips
बाळाला भूक न लागण्याची कारणे आणि भूक वाढीसाठी उपाय 

जेवण म्हटले की बऱ्याच मुलांना कंटाळा येतो. मुलांची जेवायची इच्छाच होत नाही. आई जेवणाचे ताट मागे घेऊन पळत असते आणि मुलांचे जेवण तासंतास चालूच असते. बऱ्याच पालकांची आपल्या मुलांबद्दल हीच तक्रार असते की आमची मुले नीट जेवत नाहीत. तोंडामध्ये घास धरून ठेवतात किंवा काही मुले तर  तोंडातील घास थुंकून देखील देतात. विशेषतः उन्हाळयात उष्णतेमुळे मुलांना भूक लागत नाही , जेवण पचत नाही आणि  मुलांना  जर जबरदस्तीने जेवायला दिले तर ते त्यांच्या अंगीदेखील  लागत नाही.

 पहिल्या पाच वर्षात बाळाचा  शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक विकास  हा जलदरीत्या होत असतो. अशा वेळी बाळाचा आहार(diet) हा संतुलित असावा. बाळाला पुरेसा आहार मिळणे खूप गरजेचे असते पण बऱ्याच वेळा बाळ जेवतांना खूप नखरे करतो. त्याला व्यवस्थित भूक लागत नाही. याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो . 

बाळाला भूक न लागण्याची कारणे . Causes of Loss of Appetite in kids.
१)वारंवार बाळाला खायला देणे(Frequently feeding the baby)

बाळाला भूक न लागण्याचं हे एक महत्वाचे कारण आहे. बऱ्याचदा पालकांना असं वाटतं की माझे बाळ व्यवस्थित जेवत नाही. त्याचे वजन खूप कमी आहे म्हणून ते सारखे सारखे बाळाला काही ना काही खायला देत असतात. त्यामुळे हे ते खाऊनच बाळाचे पोट भरते आणि बाळ व्यवस्थित जेवत नाही. त्यामुळे असे न करता बाळाचे खाण्याचे व्यवस्थित वेळापत्रक(timetable) बनवावे आणि त्याप्रमाणेच २ तासांचा गॅप घेऊन बाळाला भरवावे यामुळे बाळाच्या पचनसंस्थेवर(digestive system) जास्त ताण येणार नाही आणि बाळाला व्यवस्थित भूकही लागेल. तसेच चिप्स,शेव,चॉकलेट्स,बिस्कीटस अशा गोष्टी बाळाला जास्त प्रमाणात देऊ नयेत.

२)बाळाच्या पोटात गॅसेस होणे (Gases in the baby’s stomach)

 सामान्यतः लहान मुलांच्या पोटात गॅसेस होण्याचे प्रमाण खूप जास्त असते. याचे कारण म्हणजे बाळ हे सॉलिड फूड खायला शिकत असते आणि कधी कधी तुम्ही बाळाला खूप फास्ट भरवत असाल किंवा बाळ खूप फास्ट खात असेल तर अशा वेळी बाळाला गॅसेस चा त्रास होऊ शकतो. तसेच कधी कधी बाळाच्या आहारात गॅसेस होणारे पदार्थ आले तरीदेखील बाळाला गॅस होऊ शकतात आणि गॅस झाल्यामुळे देखील बाळाला भूक लागत नाही.

३)बाळाच्या पोटात जंत होणे. (Worm in baby’s stomach)

 बाळाच्या पोटात जर जंत झाले असतील तरीदेखील बाळाला नीट भूक लागत नाही आणि त्याचा परिणाम म्हणजे बाळाचे वजनदेखील कमी होते. बाळाचे हिमोग्लोबिन,आयर्न कमी होते आणि त्याचा परिणाम म्हणजे बाळ चिडचिड करतो, रडतो. त्यामुळे बाळ जर सारखा रडत असेल ,चिडचिड करत असेल तर त्याला जंत तर झाले नाही ना ते एकदा चेक करावे.

४)बाळाच्या आहारात त्याच त्याच पदार्थांचा समावेश करणे. (Including the same foods in the baby’s diet)

जर तुम्ही बाळाला वारंवार तोचतोच पदार्थ देत असाल तर बाळाला त्याचा कंटाळा येतो. आपण देखील एक पदार्थ जास्त काळ खाऊ शकत नाही. आपल्यासारखाच बाळांनाही एकाच पदार्थाचा कंटाळा येतो. तसेच एकच पदार्थ त्याला दिल्यामुळे त्याचे नीटसे पोषण देखील होत नाही आणि तीच चव असल्यामुळे त्याला खाण्यामध्ये इंटरेस्ट वाटणार नाही. म्हणूनच बाळाला वेगवेगळे पदार्थ दिले पाहिजेत. “Variety Of Foods Is Nothing But Balanced Nutrition” आणि वाढत्या वयाप्रमाणे बाळाला चांगले Nutrition मिळणे हे गरजेचे आहे. त्याचबरोबर या काळात बाळाचे testbuds देखील डेव्हलप होत असतात. आणि त्यानुसार बाळाला वेगवेगळे पदार्थ टेस्ट घ्यायला आवडतात. त्यामुळे जर तुम्ही बाळाला वेगवेगळ्या चवींचे वेगवेगळे पदार्थ करून खायला दिले तर बाळ ते आवडीने खातो.

५)बाळाच्या आहारात दूध आणि पाण्याचे प्रमाण जास्त असणे (Excess milk and water in baby’s diet)

जर बाळ दूध आणि पाणी जास्त पीत असेल तर त्यानेच त्याचे पोट भरते. त्यामुळे देखील जेवणासाठी त्याच्या पोटात जागाच उरत नाही. म्हणूनच १ वर्षानंतर जर तुम्ही बाळाला ब्रेस्टफीडिंग आणि गाईचे दूध देत असाल तर त्याचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. यासाठी रोज बाळाला ६००ml  ते ८००ml पेक्षा जास्त दूध अजिबात देऊ नका.त्याची सुद्धा एक योग्य वेळ निश्चित  करा. तुम्ही सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपायच्या आधी ब्रेस्टफीडिंग किंवा गाईचे दूध त्याला देऊ शकता. याशिवाय पाण्याचे प्रमाण देखील बाळाच्या आहारानुसार असायला हवे. जेवणाच्या आधी अर्धा तास आणि जेवणानंतर अर्धा तास बाळाला पाणी देऊ नका. यामुळे बाळाचे पचन देखील व्यवस्थित होईल आणि बाळ व्यवस्थित जेवेल.

मुलांच्या भूक वाढीसाठी प्रभावी उपाय (Remedies & Tips To Increase Kids Hunger) 

१. काळ्या मनुका(black raisins)

काळ्या मनुका आपली पचन संस्था चांगली ठेवण्यासाठी खूप जास्त फायदेशीर असतात. हे मनुके रोज लहान मुलांना खायला देत असाल तर मुलांचे पोट साफ राहते जे खाल्लेले अन्नपदार्थ आहेत ते मुलांच्या अंगी लागतात आणि मुलांचे आरोग्य उत्तम राहायला मदत होते .

काळ्या मनुकांचे पाणी(black raisin water)

जर मुले लहान असतील,त्यांना मनुका चावून खाता येत नसतील तर  तुम्ही मुलांना काळ्या मनुकांचे पाणीदेखील देऊ शकता.

काळ्या मनुक्यांचे पाणी बनवण्याची पद्धत:

काळ्या मनुक्यांचे पाणी बनवण्यासाठी १०-१२ मनुका एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर हे पाणी सकाळी मनुक्यांसहित उकळून घ्या. हे  एक ग्लास पाणी अर्धा ग्लास होईपर्यंत तुम्हाला मनुका उकळवायच्या आहेत,ज्यामुळे मनुक्यातील सर्व रस पाण्यामध्ये उतरेल . नंतर हे पाणी गाळून मुलांना सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी प्यायला द्यावे आणि उरलेले पाणी दिवसभरात थोडे थोडे द्यावे. हे पाणी चवीला देखील छान लागते आणि मुले आवडीने पितात. हा उपाय सलग ३-४ दिवस केल्यास मुलांच्या भुकेमध्ये लक्षणीय बदल जाणवून येईल .

२. गूळ आणि सुंठ गोळी(Jaggery and ginger pill)

गुळामध्ये भरपूर लोह असते ज्यामुळे शरीरातील हिमोग्लोबीन चे प्रमाण उत्तम राखले जाते. मुलांचे जेव्हा हिमोग्लोबीन कमी होते त्यावेळी मुलांना भूक लागत नाही अश्यावेळी गूळ आणि सुंठ मुलांची भूक वाढवण्यासाठी रामबाण ठरतात. हा उपाय करण्यासाठी १/२ चमचा किसलेला गूळ घ्यावा आणि त्यामध्ये १/४ चमचा सुंठ घालावी. दोन्ही पदार्थ छान एकजीव करून घ्यावेत आणि त्याची एक गोळी बनवावी. ही  गोळी मुलांना सकाळी उपाशीपोटी चाखायला द्यावी .

३. मध आणि आल्याचा रस(Honey and ginger juice)

१/२ चमचा मधामध्ये १/४ चमचा ताजा आल्याचा रस घालून या मिश्रणाचे चाटण बनवावे आणि सकाळी उपाशी पोटी मुलांना चाटवावे. मधामुळे पचनक्रिया नियंत्रित राहते आणि बाळाचे वजन वाढण्यासही मदत होते . या उपायामध्ये मधाचा वापर केल्याने हे चाटण एक वर्षापेक्षा मोठ्या मुलांनाच द्यावे.

हे तीनही उपाय अतिशय प्रभावी आहेत . सर्व उपाय एकाच वेळी करण्याची गरज नाही कोणताही एक उपायही मुलांची भूक वाढवण्यास प्रभावी ठरेल.

 बाळाची भूक वाढण्यास मदत करणारे पदार्थ (Food Items To Improve Kids Appetite/Hunger )

१)आवळा किंवा कोरफडचा रस(Amla or Aloe-vera juice)

मधामुळे कफापासून देखील रिलीफ मिळतो आणि आवळ्यामुळे बाळाचे पचन देखील चांगले होईल. आणि त्याला चांगली भूक लागेल.

२)हिंग (asafetida)

बाळाच्या पोटात खूप जास्त प्रमाणात गॅसेस होत असल्यामुळे गॅसेस पासून बाळाला आराम मिळण्यासाठी बाळाच्या आहारात हिंगाचा समावेश जरूर करावा. 

३)ओवा(AJWINE)

१ कप पाण्यामध्ये थोडासा ओवा टाकून ते पाणी व्यवस्थित उकळून घ्या. जेणेकरून ओव्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरेल. त्यानंतर ते पाणी गाळून बाळाला द्या. त्यामुळे यानेदेखील बाळाचे पचन चांगले होईल आणि बाळाची भूक वाढण्यास मदत होईल.

४)तुळशीची पाने(Basil Leaves)

तुळस ही अनेक आजारांवर उपयोगी असणारी औषधी वनस्पती आहे.तुळशीमुळे सर्दी,कफ,खोकला,viral infection यापासून आराम मिळतो. आणि बाळाची appetite level वाढण्यास मदत होते आणि बाळाची भूक वाढते.

५)आलं(Ginger)

बाळाच्या आहारात आल्याचा समावेश असणे देखील गरजेचे आहे. बाळ जर आलं खात नसेल तर थोडासा आल्याचा रस काढून तो मधाबरोबर मिक्स करून बाळाला द्या. त्यामुळे बाळाची भूक वाढायला मदत होईल.

६)वेलची पावडर(Cardamom)

वेलचीमुळे देखील बाळाची भूक वाढण्यास मदत होते. त्यामुळे बाळाच्या दुधामध्ये ,खिरीमध्ये वेलदोडे घाला ज्यामुळे बाळाची भूक वाढण्यास मदत होईल.

७)दही(Curd)/ताक buttermilk

दह्यामुळे पचन चांगले होते आणि भूक लागण्यास मदत होते. फक्त बाळाला दही देताना ते ताजेच द्यावे. त्याचबरोबर एकदम सकाळी किंवा रात्री बाळाला दही देऊ नये. याशिवाय बाळाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याला ताकसुद्धा देऊ शकता. परंतु जर बाळाला सर्दी,कफ किंवा खोकला झाला असेल तर दही किंवा ताक देणे टाळावे.

८)पुदिन्याची पाने(Mint Leaves)

 बाळ पुदिना जर खात नसेल तर पुदिन्याच्या पानांचा रस काढून तो मधाबरोबर बाळाला द्या.त्यामुळे बाळाची भूक छान वाढेल. 

९)हळद आणि लसूण (Turmeric and Garlic)

हळद आणि लसणाचा समावेश बाळाच्या आहारात असणे देखील खूप महत्वाचे आहे. हळदीमध्ये अँटिऑक्सिडंटल प्रॉपर्टी असल्यामुळे सर्दी,खोकला आणि त्याचबरोबर पोटात जर जंत झाले असतील तर ते निघून जायला,पोट साफ व्हायला मदत होते.

FAQ (Frequently Asked Questions)

1)मनुका खाण्याचे अजून कोणते फायदे आहेत?

मनुका खाल्ल्यामुळे केस गळती कमी होते. रक्तातील अशुद्धता काढून टाकण्याचे  काम मनुका  करतात. तसेच अशक्तपणा कमी होण्यासाठी मनुका खाल्ल्या जातात. रोज रात्री दहा ते पंधरा मनुका भिजवून सकाळी उपाशीपोटी खाव्यात. मनुका भिजवून खाल्ल्या तर त्या जास्त फायदेशीर असतात.

२)मुलांना बाहेर खेळण्यासाठी पाठवावे का?

हो नक्कीच ,बाहेर खेळल्यामुळे मुलांची physical activity होते. मुलांचा चांगला व्यायाम होतो. आणि खाल्लेल्या अन्नाचे योग्य प्रकारे पचन होण्यास मदत होते. त्यामुळे खेळून आल्यावर मुलांना चांगली भूक लागते. म्हणूनच पालकांनी मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रवृत्त करावे.

अधिक वाचा

बाळाला ठोस आहार/वरचा आहार कधी सुरु करावा ?

लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होणे कारणे , लक्षणे आणि उपचार (Stomach Worm in Kids)

बाळाला पोटामध्ये गॅस होण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *