
कांजण्या (Chickenpox) म्हणजे काय ? (What is Chickenpox?)
कांजण्या होणे हा लहान मुलांचाच आजार आहे. कांजण्याचे जंतू श्वासावाटे शरीरात प्रवेश करतात आणि त्यानंतर साधारणपणे दोन आठवड्यानंतर कांजण्याची लक्षणे दिसू लागतात. सुरुवातीला तपासारखी लक्षणे दिसतात , त्यानंतर पुरळ सदृश खाज येणारे डाग शरीरभर तयार होतात. पुरळ यायच्या आधी डोकेदुखी आणि ताप कणकणी अशी लक्षणे दिसतात आणि पुढील ५ ते १० दिवसांपर्यंत ती लक्षणे तशीच राहतात.

कांजण्या होण्याचे टप्पे Stages Of Chickenpox –
कांजण्याचे पुरळ सुरुवातीला गुलाबी किंवा लाल रंगाचे असते मग त्याचे द्रवयुक्त फोडात रूपांतरित होतात व शेवटी त्यावर खपली बनते.
पुरळ आधी छाती पाठ आणि चेहऱ्यावर दिसू लागतात नंतर ते उरलेल्या शरीरावर जसे कि डोळ्यांच्या झापडीवर, गुप्तांगावर आणि तोंडामध्येही पसरतात.
सुदृढ आणि सशक्त बालकांना कांजण्यासाठी उपचारांची गरज नाही. खाज कमी करण्यासाठी आणि आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात. पहिली पुरळ आल्यानंतर २४ तासाच्या आत औषध दिल्यास आजाराची तीव्रता कमी होते.
कांजण्या होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक लस टोचणे आवश्यक असते. लस घेतलेल्या बाळाला किंवा व्यक्तीला कांजण्या शक्यतो होत नाहीत आणि झाल्याचं तर त्याची तीव्रता कमी असते.
कांजण्या या रोगाची लागण झाल्यास बाळाची/लहान मुलांची काळजी कशी घ्यावी?(How to care for children with chickenpox?)
१. थंड पाण्याने अंघोळ – थंड पाण्याने अंघोळ घातल्याने खाज कमी होते आणि पुरळ पसरनेही थांबते. खूप जास्त खाज असल्यास पुरळ आलेल्या ठिकाणी बर्फ़ानेही मालिश करू शकता,
२. खाजवू देऊ नका – बाळाच्या बोटांची नखे कापा. सतत खाजवणे टाळा.
३. ताप कमी करण्यासाठी उपाय – लहान बाळांसाठी बनलेले पॅरासिटामोल द्या ज्यामुळे वेदना आणि ताप हि कमी होईल.
४. हलका आहार द्या – बाळ स्तनपान घेत असे तर भरपूर स्तनपान द्या. ६ महिन्यांपेक्षा मोठ्या मुलांना हलके आणि तरल पदार्थ द्या.
या बाबतीमध्ये त्वरित वैद्यकीय सल्ला घ्या. Danger Signs of Chickenpox
१. कांजण्यांच्या फोडातून पू वाहत असेल किंवा खपले मोठे होत असल्यास.
२. औषदोपचार घेऊन हि ६ दिवसांनी परत कांजण्या झाल्यास
३. तापाची तीव्रता वाढल्यास आणि बाळ काहीच खात नसल्यास .
वरीलपैकी कोणतीही बाब असेल तर बाळाची परिस्थिती गंभीर होऊ शकते या वेळी वैद्यकीय मदत घेणे आवश्यक असते.
या लेखामध्ये आपण लहान मुलांना होणाऱ्या कांजण्या म्हणजे नक्की काय , त्याची लक्षणे आणि त्यावर उपाय याबद्दल माहिती पाहिली. मला खात्री आहे की या माहितीचा(information) तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
अधिक वाचा