बाळांना होणारी कावीळ , करणे, लक्षणे आणि उपचार Jaundice In Newborn Babies
नव्या नव्या आईबाबांची सुरुवातीचे काही दिवस अत्यानंद देणारे तर असतातच पण त्याच सोबत काळजी देणारेही असतात. अश्यातच जर बाळाच्या जन्मानंतर ३-४ दिवसांनी बाळ पिवळसर दिसू लागले तर काळजीमध्ये अजूनच भर पडते कारण हे कावीळ झाल्याचे लक्षण आहे . नवजात बाळाच्या बाबतीमध्ये जन्मानंतर बाळाला कावीळ होणे हे बऱयाचदा गंभीर असतेच असे नाही. जर काविळीची तीव्रता जास्त नसेल तर नवजात बालकांना झालेली हि कावीळ आपोआप बरी होते मात्र याची तीव्रता जाणून घेण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.
१०० पैकी ६० नवजात बालकांना जन्मानंतर कावीळ होते. प्रौढांच्या तूलनेत नुकत्याच जन्मलेल्या बाळामध्ये लाल रक्त पेशींचे प्रमाण खूपच जास्त असते. ज्यामुळे,बिलिरुबीनचे प्रमाण वाढते आणि हे जास्तीचे बिलिरुबिन रक्तात तसेच राहते. कारण नवजात बाळाचे पूर्ण विकसित न झालेले यकृत याचे विघटन करू शकत नाही. रक्तात साचून राहिलेल्या या घट्ट बिलिरुबिन मुळे निर्माण होणाऱ्या अवस्थेला सामान्यपणे कावीळ असे म्हटले जाते.
या लेखामध्ये आपण नवजात बालकांना होणारी कावीळ , त्याची कारणे, लक्षणे आणि उपचार पद्धतीही जाणून घेणार आहोत. सविस्तर माहितीसाठी लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
नवजात बाळांमध्ये आढळणारे काविळीचे काही प्रकार Types Of Jaundice in Babies :
१. मुदतपूर्व (Premature )जन्मामुळे होणारी कावीळ
बऱ्याचदा हि कावीळ आपोआप बरी होते. बाळाच्या मुदतपूर्व जन्मलेल्या बाळाचे यकृत आणि इतर अवयव पूर्ण झालेले नसतात, यामुळे बिलिरुबीन उत्सर्जित करणे कठीण असते. पण जर रक्तातील बिलिरुबीनचे प्रमाण जास्त असेल तर त्याचा अनिष्ट परिणाम बाळाच्या मेंदूवर होण्याची शक्यता असते. मेंदूला काहीही इजा होऊ नये म्हणून या बाबतीमध्ये वैद्यकीय सल्ला वेळेमध्ये घेणे गरजेचे आहे.
२. विसंगत रक्तगटामुळे होणारी कावीळ
जेव्हा आई आणि बाळाचा रक्तगट वेगवेगळा असतो तेव्हा बाळाच्या लाल रक्त पेशी तयार होणाऱ्या अँटीबॉडीज नष्ट केल्या जातात. आई आणि बाळाचा रक्तगट वेगवेगळा असेल तर कावीळ होण्याचे हे एक महत्वाचे कारण आहे. रक्तगटाच्या विसंगतीमुळे बाळाच्या रक्ताचे विघटन होऊन बिलिरुबीनचे प्रमाण वाढते. परिणामी बाळाची त्वचा पिवळी किंवा नारंगी रंगाची होते. ज्यामुळे नवजात बालकामध्ये कावीळ या आजाराची लक्षणे दिसू लागतात.
३. आईच्या दुधामुळे होणारी कावीळ
स्तनपान करणाऱ्या बाळांमध्ये हि दुर्मिळ प्रकारची कावीळ आढळते. काही कारणांमुळे बाळाला जन्मानंतर सुरुवातीच्या काही दिवसनमध्ये आईचे दूध नीट मिळाले नसेल किंवा आईच्या दुधातील काही घटक बिलिरुबीनची पातळी वाढवत असतील तर अश्या प्रकारची कावीळ उध्दभवते. जर आईच्या दुधामुळे बिलिरुबीनचे प्रमाण वाढत असेल किंवा वाढत असेल तर काही दिवसांसाठी स्तनपान देणे बंद केले जाते म्हणजे बिलिरुबीनचे हे प्रमाण कमी होते. आईच्या दुधाचे महत्व जाणता शक्यतो असे करणे टाळले जाते कारण या प्रकारामुळे वाढलेले बिलिरुबीन अपायकारक ठरत नाही.
काविळीची इतर काही कारणे Causes Of Jaundice in Newborn Babies
बहुसंख्या नवजात बालकांमध्ये आढळणारी कावीळ हि सामान्य नैसर्गिक प्रकारचीच असते ज्यावर कोणत्याही विशिष्ट उपचारांची गरज पडत नाही. काही दिवसानंतर ती आपोआप बरी होते. मात्र या काविळीचे प्रमाण वेळेतच जाणून घेणे आणि त्यानुसार उपचार करणे आवश्यक असते.
१. यकृतातील बिघाड –
बाळाच्या रक्तातील लाल पेशी काही कारणांमुळे किंवा विशिष्ट कोणत्याही आजारामुळे जर नष्ट झाल्यास त्यातून बिलिरुबिन तयार होत असते. हे बिलिरुबिन काढून टाकण्याचे काम यकृत करत असते पण जर यकृत अपरिपकव असेल किंवा काही बिघाड असेल तर हे बिलिरुबिन शरीराबाहेर काढून टाकले जात नाही. परिणामी बाळाला कावीळ होते.
२. विषाणू किंवा सूक्ष्मजंतूमुळे होणारे संक्रमण
नवजात बाळाच्या बाबतीमध्ये बाळाचा विकास पूर्णपणे झालेला नसतो, रोगप्रतिकार शक्ती नाजूक असते अश्यावेळी काही विषाणू किंवा सूक्ष्मजंतूंमुले इन्फेक्शन झाले असेल तरीही कावीळ उदभवू शकते.
३.अंतर्गत रक्तस्त्राव
काही कारणांमुळे अंतर्गत रक्तस्त्राव होत असेल किंवा झालेला असेल तरीही रक्तातील लाल पेशींचे प्रमाण कमी होते आणि बिलिरुबीनचे प्रमाण वाढते आणि कावीळ हा आजार उद्भवतो.
४.बाळाच्या रक्तात होणारे संक्रमण
नवजात बाळाच्या बाबतीमध्ये असो किंवा मोठ्या मुलांच्या बाबतीमध्येही जर रक्तामध्ये इन्फेक्शन झाले असेल तर कावीळ होण्याची शक्यता असते.
काविळीची लक्षणे Signs Of Jaundice
नवजात बाळांना होणारी कावीळ त्वचा आणि डोळ्यांच्या पिवळसर रंगामुळे ओळखता येते . बाळाच्या जन्मानंतर दुसऱ्या ते चौथ्या दिवसांमध्ये होणाऱ्या काविळीमध्ये सर्वात अगोदर बाळाचा चेहरा पिवळा पडतो, त्यानंतर छाती, पोट , आणि पाय. बऱ्याचदा जन्मतः बाळांना होणारी कावीळ सौम्य असते आणि २ ते ३ आठवड्यांच्या आत बरीही होते.
असे असले तरीही काविळीचे प्रमाण किती आहे यानुसार त्यावर उपचार करण्याची आवश्यकता आहे कि नाही हे ठरवले जाते. जेव्हा बाळामध्ये अशी काविळीची लक्षणे दिसत असतील तेव्हा तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
बाळामध्ये पुढील काही लक्षणे प्रकर्षाने जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. Danger Signs Of Jaundice
१. त्वचेचा रंग गडद पिवळा असेल.
जर बाळाच्या त्वचेचा रंग गडद पिवळा असेल म्हणजेच याचा अर्थ बिलिरुबीनचे प्रमाण हे खूप जास्त आहे. या बाबतीमध्ये बाळाच्या मेंदूला इजा होण्याची शक्यता असते . ते टाळण्यासाठी योग्य वेळी उपचार गरजेचे असतात.
२. बाळाच्या जन्मानंतर २४ तासांच्या आत किंवा लगेचच काविळीची लागण झाल्यास
साधारणपणे जन्मानंतर २-३ दिवसांनी बाळाची त्वचा पिवळसर दिसू लागते आणि काविळीची लक्षणे दिसतात पण जर पहिल्या २४ तासांच्या आतच बाळ पिवळे दिसू लागले तर याचा अर्थ बाळाला जन्मतःच कावीळ असू शकते जी बाळासाठी जास्त गंबीर असते या बाबतीमध्ये वेळ न घालवता वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे असते.
३. बाळाला जास्त ताप असेल.
नवजात बाळाच्या बाबतीमध्ये किंवा लहान मुलांच्या बाबतीमध्ये ताप बाळासाठी अतिशय गंभीर ठरू शकतो. तापाचे प्रमाण जास्त असेल तर बाळाला तापामध्ये झटका येऊ शकतो आणि मेंदूला इजा पोहचू शकते. तहे टाळण्यासाठी जर बाळाला ताप जाणवत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांना भेटावे.
४. कावीळ तीन आठवड्यांपेक्षा जास्त राहात असेल.
नैसर्गिक कावीळ असेल किंवा योग्य ते उपचारानंतर साधारणपणे २-३ आठवड्यामध्ये कावीळ बरी होते पण जर ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ काविळीची लक्षणे दिसत असतील तर वैद्यकीय सल्ला जरूर घ्यावा.
५. बाळ खूप जास्त झोपत असेल आणि खूप जास्त रडत असेल.
कावीळ झाल्यानंतर अशक्तपणा हा येतोच पण जर बाळ खूप जास्त झोपत असेल किंवा सतत रडत असेल तर डॉक्टरांना भेटावे.
६. बाळ व्यवस्थित दूध पीत नसेल.
कोणताही आजार बरा होण्यासाठी योग्य प्रमाणात खाणे आणि लहान बाळाच्या बाबतीमध्ये बाळाने आईचे दूध पिणे गरजेचे असते. आईच्या दुधामध्ये असणाऱ्या अँटीबॉडीजमुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि कावीळ लवकरात लवकर बरी होण्यास मदत होते. पण जर बाळ दूध पीत नसेल बाळाची प्रकृती अजूनच गंभीर होऊ शकते त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.
कावीळवर केले जाणारे उपचार Treatment On Jaundice
कावीळ हा आजार नसून ते एक लक्षण आहे. त्यामुळे या वर घरगुती उपचार न करता वैद्यकीय सल्ला योग्य वेळेमध्ये घेणे आवश्यक असते. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच बाळाला औषधे द्यावीत, स्वतःहून काही औषधांचं प्रयोग केल्यास यकृतावर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो .
नवजात बाळांमधील काविळीचा उपचार खालील पद्धतींनी होऊ शकतो.
१. प्रकाश उपचार पद्धती (फोटो थेरपी)
या उपचारात निळी-हिरवी प्रकाश किरणे बाहे टाकणाऱ्या प्रकाशाला बाळावर सोडले जाते. हा प्रकाश बिलिरुबिन अणूचे रचना आणि आकार सुधारतो आणि बाळाच्या विष्ठा आणि मूत्रद्वारे ते बाहेर पडते आणि बिलीरुबीनचे प्रमाण कमी होते. हे उपचार करून घेणे आवश्यक असते
२. रक्त संक्रमणाचे विनिमय
तीव्र स्वरूपाच्या काविळीमध्ये हि उपचार पद्धती वापरली जाते . बाळाचे रक्त थोड्या प्रमाणात घेतले जाते आणि बिलिरुबिन व असणाऱ्या प्रतिद्रव्याला पातळ केले जाते. हे रक्त परत बाळाच्या शरीरात सोडले जाते.बाळाच्या रक्तातील बिलिरुबीनचे प्रमाण खूप जास्त असेल आणि बाळ फोटो थेरपीच्या उपचार पद्धतींना प्रतिसाद देत नसेल तर हि उपचार पद्धत अवलंबली जाते.
३. शिरेच्या आत सोडले जाणारे इम्युनोग्लोबुलीन
बाळ आणि आईच्या न जुळणाऱ्या रक्तगटामुळे होणाऱ्या काविळीच्या प्रकारात हि उपचार पद्धती उपयोगी ठरते.
नवजात बाळामध्ये कावीळ होण्याचा धोका केव्हा जास्त असतो ? Possibilities Of Jaundice in Newborn Babies
१. ९ महिन्यांपूर्वी जन्माला आलेल्या बाळामध्ये (Premature Baby) तर बाळाला कावीळ होण्याची शक्यता आणि धोका जास्त असतो.
२. पहिल्या काही दिवसामध्ये जर आईचे दूध पुरेश्या प्रमाणात मिळाले नाही तर कावीळ होण्याचा धोका जास्त वाढतो.
३. बाळाच्या आईला मधुमेह असेल तर बाळाला कावीळ होण्याची शक्यता जास्त असते.
४. जन्मतःच कावीळ असेल तर परिस्थिती गुंतागुंतीची होऊन धोका जास्त वाढू शकतो.
५. बाळाच्या मोठ्या भावंडाला जन्मानंतर कावीळ झालेली असेल तर नवजात बाळालाही कावीळ होण्याची शक्यता असते.
या लेखामधून मी तुम्हाला लहान किंवा नवजात बाळाला होणारी कावीळ आणि त्याबद्दल सर्व माहिती याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
Danger Signs In Pregnancy In Marathi गरोदरपणात हि लक्षणे दिसत असल्यास तात्काळ घ्या वैद्यकीय सल्ला
डिलिव्हरीमध्ये पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी?(How to take care of stiches in delivery?)