बाळ उशिरा का बोलायला शिकते ? बाळाने लवकर आणि स्पष्ट बोलण्यासाठी काही टिप्स आणि उपाय Best Speech Therapy For Toddlers At Home
बाळाच्या विकासामधील सर्वात महत्वाचा टप्पा म्हणजे बाळाचे बोलणे. बाळाचे पहिले बोबडे बोल ऐकण्यासाठी आईबाबांचे कान नेहमीच आतुर असतात. पण बाळ जर लवकर बोलत नसेल किंवा बोलण्याचा प्रयत्न हि करत नसेल तर मात्र पालकांना चिंता सतावू लागते.बाळाने लवकर आणि स्पष्ट बोलायला शिकावे यासाठी ते धडपडत असतात , प्रयत्न करत असतात. पण लक्षात घ्या प्रत्येक बाळ हा वेगळा आहे आणि त्याचा विकासही वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो. त्यामुळे घाबरण्याचे काहीच कारण नाही. थोडासा प्रयत्न आणि योग्य त्या टिप्स वापरून तुम्ही बाळाला लवकर आणि स्पष्ट बोलायला शिकऊ शकता.
या लेखामध्ये आपण बाळ उशिरा बोलायला शिकण्याची काही कारणे आणि बाळाने लवकर आणि स्पष्ट बोलण्यासाठी काही टिप्स आणि प्रभावी उपाय पाहणार आहोत . सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
बाळ उशिरा का बोलायला शिकते? Causes Of Speech Delay in Kids
बालतज्ञांच्या अभ्यासानुसार बाळ जन्मापासूनच ऐकू शकत असले तरीही ६ महिन्यानंतर बाळाला आवाजामधील बदल आणि त्याचा अर्थ समजू लागतो. बाळाचे लवकर बोलणे हे त्याचा ऐकण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. याशिवाय जर बाळाचे आई बाबा किंवा जवळचे नातलग उशिरा बोलायला शिकले असतील तर ती अनुवंशिकता मुलांमध्येही येते. बाळ आईच्या गर्भात असताना आईला काही आरोग्याच्या समस्या असतील तर त्याचा परिणाम बाळाच्या ऐकण्यावर आणि बोलण्यावर होतो. याचप्रमाणे प्रसूतीच्या वेळी काही दुखापत झाली असेल तरीही बाळाच्या ऐकण्याच्या आणि परिणामी बोलण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होतो. जी बाळ जन्माला आल्यानंतर लगेच रडत नाहीत अश्या बाळांनाही बोलण्यास थोडा उशीर लागू शकतो.
बाळाने लवकर बोलावे यासाठी करा हे साधे सोपे उपाय Tips To Make Child Speak Early
बाळाला लवकर बोलायला शिकवण्यासाठी त्याने भरपूर आणि वेगवेगळे शब्द ऐकणे महत्वाचे असते आणि त्यासाठी नक्कीच पालकांनाच बाळाशी भरपूर संवाद असणे अपेक्षित असते. त्यासाठी बाळासोबत भरपूर बोला, बाळासोबत वाचन करा, नवनवीन गोष्टी सांगा , गाणी म्हणून दाखवा म्हणजे बाळाचा शब्दसंग्रह वाढेल. तेच ते शब्द परत परत ते बाळ आत्मसात करण्याचा प्रयत्न करेल आणि बोलायला शिकेल.
बाळाशी संवाद साधत असताना वापर या टिप्स Effective Tips While Communicating With Kids
१. बाळासोबत बोलत असताना थोडासा मोठ्या आवाजात आणि सावकाश बोला म्हणजे बाळाला समजण्यास सोपे जाईल.
२. बाळाची श्रवणशक्ती वाढवण्याची बाळाला गाणी म्हणून दाखवा किंवा बोलत असताना थोडासा सूर लावून बोला कारण असे बोलणे बाळाला आवडते आणि ते व्यवस्थित ऐकते. शिवाय ते शब्द हि उच्चारण्याचा प्रयत्न करते.
३. ठराविक वेळेत बाळाला ठराविक संगीत किंवा गाणे किंवा प्रार्थना ऐकावा म्हणजे तेच ते शब्द कानावर पडून बाळाच्या ते लक्षात राहतील आणि बाळ ते उच्चारण्याचा प्रयत्न करेल.
४. बाळाशी बोलत असताना हातवारे करून किंवा चेहऱ्यावर हावभाव आणून बोला म्हणजे बाळाला त्या बोलण्याचा अर्थही कळेल.
५. सुरुवातीला बाळाला दादा, मामा , काका असे सोपे शब्द शिकवा , एकावेळी एकच शब्द ऐकवा आणि तो बाळाला उच्चारण्यासाठी प्रोत्साहित करा. एक शब्द यायला लागला कि मग दुसरा शिकवा आणि हळू हळू साधी २-३ शब्द असणारी वाक्ये वापरून बाळासोबत संवाद साधा.
६. बाळाने बोलत असताना तुमच्या ओठांची आणि जिभेची हालचाल पाहणे ही गरजेचे असते ज्यामुळे त्याला तुमची नक्कल करणे व ते शब्द उच्चाराने सोपे जाते.त्यामुळे बाळासोबत बोलत असताना बाळाचे लक्ष वेधून घ्या आणि बाळ ओठांची हालचाल तुमचे हावभाव बघेल याकडेही लक्ष द्या .
७. बाळाकडून काही जिभेचे व्यायाम हि तुम्ही करवून घेऊ शकता. बऱ्याचदा आपण ऐकतो कि बाळाची जीभ जड आहे त्यामुळे बाळ लवकर किंवा स्पष्ट बोलू शकत नाही. हि समस्या दूर करण्यासाठी बाळाच्या जिभेचे काही विशिष्ट प्रकारे व्यायाम करून घेणे आवश्यक असते .
बाळाला जीभ आत आणि बाहेर काढायला लावणे, जीभ टाळ्याला लावण्यास सांगणे, जीभ ट्विस्ट करायला लावणे, जीभ बाहेर काढून डाव्या आणि उजव्या बाजूला वळवणे असे काही साधे सोपे पण बाळाला लवकर आणि स्पष्ट बोलण्यासाठी प्रभावी ठरणारे जिभेचे व्यायाम दिवसभरात कधीही जेव्हा आणि जितक्या वेळा शक्य होईल तितक्या वेळा करून घेणे.
या लेखामधून मी तुम्हाला लहान बाळ बोलत नसेल तर त्याला लवकर आणि स्पष्ट बोलायला शिकवण्यासाठी काही टिप्स आणि उपाय याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होणे कारणे , लक्षणे आणि उपचार (Stomach Worm in Kids in Marathi)