गरोदरपणात गर्भाचे वजन वाढवण्यासाठी उपाय How to increase baby weight during pregnancy?

Spread the love

 

गरोदरपणात पोटात वाढणाऱ्या बाळाचे वजन कसे वाढवावे –

गर्भवतीच्या आहारावरच गर्भाची वाढ अवलंबून असते. गरोदरपणात आईच्या असंतुलित आहारामुळे गर्भाची वाढ योग्य प्रकारे होत नाही. अश्या बाळाचे जन्मानंतर सुद्धा वजन कमीच राहते, याशिवाय पुरेसे पोषण न मिळाल्यामुळे अशक्त, मतिमंद किंवा काही व्यंग असणारे बाळ जन्माला येऊ शकते. गर्भामध्ये बाळाची वाढ आणि वजन योग्य प्रकारे ठेवण्यासाठी या लेखामध्ये काही उपाय सांगितले आहेत.

गर्भावस्थेत प्रत्येक महिन्यात गर्भाची वाढ आणि विकास कश्या प्रकारे होतो हे जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 

गर्भावस्थेत प्रत्येक महिन्यात गर्भाची होणारी वाढ | Fetal weight gain in permanency per month | 9 Months of Pregnancy

Causes of low Amniotic Fluid And Tips To Increase it Naturally At Home
पोटातील बाळाचे वजन वाढवण्यासाठी करा हे उपाय Tips To Increase Baby Weight During Pregnancy

गर्भवतीचा आहार संतुलित , ताजा, पौष्टिक आणि पुरेसा असणे आवश्यक असते. आवश्यक असणारी सर्व पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळण्यासाठी चौरस आहार घ्यावा. म्हणजे जेवणामध्ये पोळी, भाजी, आमटी, भात , प्रमाण थोडे असले तरी चालले पण सर्व घटक असावेत.

१. आहारामध्ये दूध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश करावा. दुधामध्ये भरपूर प्रोटीन असते ज्यामुळे गर्भाची वाढ सुदृढ होण्यास मदत होते.
२. मोड आलेले कडधान्ये, पालेभाज्या, फळभाज्या , सुकामेवा आणि फळांचा आहारामध्ये भरपूर समावेश करावा.
३. दिवसातून ३-४ वेळा थोडा थोडा पण पुरेसा आणि वेळच्या वेळी आहार घ्यावा.
४. दिवसभरात कमीतकमी ८-१० ग्लास पाणी प्यावे.
५. आहारामध्ये अंडी, मटण , मासे यांचा समावेश करावा.
६. पुरेश्या आहारासोबतच पुरेसा विहार आणि विश्रांती आवश्यक असते.
७. गर्भारपणात दिलेल्या औषधगोळ्या आणि तपासण्या वेळेवर कराव्यात.

लक्षात ठेवा 
“एक निरोगी आणि आनंदी आईच एका सुधृढ आणि आनंदी बालकाला जन्म देऊ शकते. “

गरोदरपणात गर्भजल का कमी होते? वाढवण्यासाठी उपाय.
गर्भवतीचा आहार कसा असावा?
गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात काय काळजी घ्यावी?

7 thoughts on “गरोदरपणात गर्भाचे वजन वाढवण्यासाठी उपाय How to increase baby weight during pregnancy?”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top