गर्भावस्थेत गर्भजलाचे प्रमाण कमी किंवा जास्त होणे – कारणे, बाळाच्या वाढीवर होणार परिमाण आणि उपाय
गर्भधारणेनंतर ४ आठवडयांनी गर्भाच्या बाजूला गर्भजल कोष तयार होतो ज्याला ऍम्नीऑटिक कॅव्हिटी (Amniotic Cavity) असे म्हंटले जाते. या कॅव्हिटीच्या आतून असणाऱ्या विशिष्ट्य प्रकारच्या आवरणातून गर्भजल पाझरत असते . हे गर्भजल आईच्या रक्तातून आणि काही प्रमाणात गर्भाच्या लघवीपासून तयार होते. गर्भावस्थेत बाळ आईच्या पोटामध्ये असणाऱ्या याच पाण्यामध्ये तरंगत असते . गर्भाच्या वाढीसाठी पोषक असणारे सर्व घटक या गर्भजलामध्ये (ऍम्नीऑटिक फ्लुईड) असतात. याशिवाय आईच्या पोटावर काही दुखापत झाल्यास गर्भजलामुळे बाळाचे रक्षण व्हावे, बाळाची वाढ आणि विकास योग्य प्रकारे व्हावा, बाळाला इन्फेक्शन होऊ नये आणि गर्भामध्ये बाळाचे तापमान योग्य राखले जावे यासाठी हे गर्भजल योग्य प्रमाणात असणे आवश्यक असते.

गर्भजल कसे बनते आणि त्याचे प्रमाण किती असावे ?
सुरुवातीला हे गर्भजल आईच्या रक्ताद्वारे तयार होत असते त्यानंतर साधारणपणे ५ व्या महिन्यानंतर गर्भाच्या मूत्रद्वारे गर्भजल तयार होते. आईच्या पोटामध्ये गर्भाची वाढ आणि विकास योग्य प्रकारे होण्यासाठी योग्य प्रमाणात गर्भजल असणे आवश्यक असते. नऊ महिन्यापर्यंत हे गर्भजल साधारणपणे १ लिटर पर्यंत असते आणि प्रसूतिकाळ जसजसा जवळ येईल तसे याचे प्रमाण कमी होत जाते. गर्भाशयातील बाळ हे थोडेथोडे गर्भजल पीत असते आणि पुन्हा लघवीवाटे बाहेर सोडत असते. त्यामुळे याचे प्रमाण कमी जास्त होते सामान्य आहे.
असे असले तरीही अधिक प्रमाणात गर्भजल कमी होणे किंवा वाढणे बाळ आणि आई दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते.
गर्भजल कमी होण्याची कारणे आणि गर्भजल वाढवण्यासाठी उपाय (Causes of Low Amniotic Fluid During Pregnancy and Tips To Increase It Naturally at home)
गर्भजल कमी होण्याची कारणे (Causes of Low Amniotic Fluid)
१) आईला जर मधुमेह , बी.पी चा त्रास होत असेल तर गर्भजल कमी होऊ शकते.
२) गर्भजलाची पिशवी फुटल्याने गर्भजल कमी होऊ शकते.
३) बाळाच्या मूत्रद्वारे गर्भजल बनत असते पण जर पुरेश्या प्रमाणात गर्भ मूत्र विसर्जन करत नसेल तर गर्भजल कमी होऊ शकते.
४) प्रसूतीची नियोजित तारीख होऊन गेली असेल आणि तरीही प्रसूती झाली नसेल तर गर्भजल कमी होऊ लागते .
५) गर्भावस्थेत काही इन्फेक्शन झाले असेल किंवा आई आजारी पडली असेल तरीही अश्या समस्या उद्भवू शकतात.
६) गरोदरपणात आईला जर सकस आहार मिळाला नाही तर योग्य ते पोषण न मिळाल्याने गर्भजल कमी होऊ शकते.
७)गर्भाच्या फुफ्फुसामध्ये किंवा किडनीमध्ये काही व्याधी निर्माण होत असतील तर गर्भाच्या लघवीचे प्रमाण कमी होते जयचा परिमाण म्हणजे गर्भजल पातळी खालावते.
८) काही केसमध्ये हि समस्या गर्भाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये आलेल्या अडथळ्यांमुळेही होऊ शकते.
गर्भजल कमी झाल्यास बाळाच्या वाढीवर होणार परिणाम
पुरेश्या प्रमाणात असणाऱ्या गर्भजलामुळे बाळाची फुफ्फुसे आणि पाचनक्रिया विकसित होऊन बाळाच्या मांसपेशी आणि हाडे विकसित होत असतात. गर्भजलाचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा विपरीत परिणाम बाळाच्या सर्वांगीण वाढीवर आणि विकासावर होतो. गर्भावस्थेच्या पहिल्या व दुसऱ्या तिमाही मध्ये गर्भजल कमी झाल्यास गर्भपात होण्याची शक्यता असते . तिसऱ्या तिमाहीमध्ये शक्यतो गर्भजल पिशवी फाटल्यामूळे गर्भजल कमी होते अश्यावेळी अकाली प्रसूती करावी लागू शकते.
गरोदरपणात प्रत्येक महिन्यात बाळाची वाढ कश्याप्रकारे आणि किती होते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
गर्भजल वाढवण्यासाठी उपाय
१. गर्भावस्थेत सांगितल्या जाणाऱ्या सर्व तपासण्या वेळेत कराव्यात म्हणजे योग्यवेळी गर्भजलाची पातळी लक्षात येईल आणि वेळीच उपाय करता येतील.
२. आईने दुवसभरात भरपूर पाणी आणि द्रव पदार्थ घेणे आवश्यक असते.
३. ताजा, पौष्टिक , पुरेसा आणि संतुलित आहार घ्यावा. गर्भवतीचा आहार जाऊन घेण्यासाठी या लिंकवर करा.
४. पुरेशी विश्रांती आणि शारीरिक हालचाल ठेवा.
५. शहाळ्याचे पाणी, लिंबू पाणी, ताक, फळाचे रस पुरेश्या प्रमाणात आहारामध्ये घ्यावेत.
६. मानसिक ताण तणाव न घेणे.
७. गर्भजल(Amniotic Fluid) वाढवण्यासाठी आईला विशिष्ट्य प्रकारचे सलाईन दिले जाते ज्यामुळे गर्भजल पातळीमध्ये साधारणतः ३०% वाढ होऊ शकते.
गर्भजल अधिक प्रमाणात वाढण्याची कारणे
१. एका पेक्षा जास्त गर्भ राहिल्यास म्हणजे जुळे किंवा तिळे असल्यास गर्भजलही त्याच प्रमाणात निर्माण होते आणि याचे प्रमाण जास्त असल्यास गर्भजलाची पिशवी फुटू शकते.
२. गरोदरपणात आईला मधुमेह असल्यासही गर्भजलाचे प्रमाण वाढते.
तर या लेखामध्ये आपण पाहिलं कि गर्भावस्थेत गर्भजल का कमी होते आणि गर्भजल वाढवण्यासाठी काय उपाय करावेत (Causes Of Low Amniotic Fluid And Tips To Increase It Naturally At Home) याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली . मला खात्री आहे की या माहितीचा(information) तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
अधिक वाचा
गर्भवतीचा आहार कसा असावा ?
गर्भावस्थेच्या पहिल्या महिन्यात घ्यायची काळजी
गरोदरपणातील काही धोकादायक लक्षणे