गर्भावस्थेत आईचा आहार कसा असावा ? Diet for pregnant women

Spread the love
गर्भावस्थेत आईचा आहार कसा असावा ? Diet For Pregnant Mother

गर्भवतीने संपूर्ण नऊ महिने पौष्टिक, ताजा आणि पुरेसा आहार घेणे आवश्यक असते कारण आई जो आहार घेते त्यावरच बाळाचे पोषण आणि संपूर्ण वाढ अवलंबून असते. बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी आणि आईच्या आरोग्यासाठी तिच्या आहारामध्ये सर्व व्हिटॅमिन्स, भरपूर कॅल्शियम, प्रोटीन, लोह अशी पोषकतत्वे महत्वाची असतात. हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळतील यानुसार आईचा आहार असायला हवा.या लेखामध्ये गर्भावस्थेत आईचा आहार कसा असावा, काय खावे , काय खाऊ नये याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे. 

Diet For Pregnant Mother

गरोदरपणात काय काय खावे ? Diet Chart For Pregnant Mother

१. दूध आणि दुधाचे पदार्थ

दुधामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि कॅल्शियम असते त्यामुळे दूध व दुधाचे पदार्थ गर्भावस्थेत अत्यंत पौष्टिक असतात. दुधाचे वेगवेगळे प्रकार, दही, लोणी, ताक, पनीर अश्या वेगवेगळ्या प्रकारे दुधाचा आहारामध्ये समावेश करू शकता.

२. हिरव्या पालेभाज्या व फळभाज्या

ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या भाज्या येतात त्या सर्व भाज्या मुबलक प्रमाणात गर्भवतीच्या आहारामध्ये यायला हव्यात. हिरव्या भाज्यांमध्ये भरपूर लोह आणि इतर जीवनसत्वे आणि पोषक घटक असतात. हे सर्व घटक जर आई तिच्या आहारामध्ये पुरेश्या प्रमाणात घेत असेल तर गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाची वाढ योग्य प्रकारे होते.

३. गडद रंगाची फळे

जेवढी जेवढी गडद रंगांची फळे आहेत जसे कि मोसंबी, चिकू, सफरचंद, केळी , नासपती, संत्रा यामध्ये भरपूर अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. भरपूर पोषक घटक असतात. आईची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर असे सर्व पोषक घटक फळांमधून मिळतात. पोट साफ होण्यासाठी आणि आईचे गर्भावस्थेच्या काळामध्ये शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी ताजी रसाळ फळे आहारामध्ये जरूर घ्यावीत.

४. पाणी

गर्भावस्थेत गर्भवतीने दिवसातून किमान ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. शरीरामध्ये जर पाण्याची योग्य पातळी असेल तर इन्फेक्शन होण्याचे प्रमाण कमी होते म्हणजेच आजारी पाडण्याचे प्रमाण कमी होते पर्यायी गर्भाची वाढ उत्तम प्रकारे होते. नॉर्मल पाण्याशिवाय लिंबू पाणी, नारळ पाणी, फळांचे रस, ताक हे हि घेऊ शकता.

५. सुकामेवा / ड्राय फ्रुटस

ड्राय फ्रुटस मध्ये भरपूर प्रोटीन आणि बाळाच्या बुद्धीच्या विकासासाठी आवश्यक असणारे ओमेगा – ३ फॅटी ऍसिड असते याशिवाय अनेक प्रकारचे जीवनसत्वे आणि पोषक घटक असतात. त्यामुळे गर्भावस्थेत रोज एक मूठ भरून मिक्स ड्राय फ्रुटस आहारामध्ये जरूर घ्यावेत. भिजवून घेतलेले ड्राय फ्रुटस अधिक फायदेशीर ठरतात.

६. मांसाहार

अंडी, चिकन , मटण किंवा मासे यामध्ये हि भरपूर प्रोटीन, लोह आणि व्हिटॅमिन्स असतात ज्यामुळे बाळाची वाढ आणि विकास सुयोग्य पद्धतीने होण्यास मदत होते.

७. मोड आलेले कडधान्ये

मोड आलेल्या कढधान्यांमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. विविध प्रकारच्या दाली आणि कडधान्यातून मुबलक प्रमाणात प्रोटीन, लोह आणि ओमेगा फॅटी ऍसिडस् मिळण्यास मदत होते.

गर्भावस्थेत कोणते पदार्थ खाऊ नयेत. Food To Avoid During Pregnancy 

१. वारंवार चहा किंवा कॉफी घेणे टाळावे.
२. उघड्यावरचे , जंक फूड, स्ट्रीट फूड टाळावे.
३. शिळे अन्न टाळावे.
४. मसालेदार, तेलकट , माद्यांचे किंवा केमिकल असणारे पदार्थ टाळावेत.
५. फ्रीज मध्ये ठेवलेले किंवा सोडा असणारे कोल्ड ड्रिंक्स टाळावेत.
६. धूम्रपान आणि मद्यपान करू नये.

७. सी फ़ूड अणि कच्चे किंवा नीट न शिजलेले मांस खाणे टाळावे. 

८. खूप जास्त गोड पदार्थ खाणे हि गर्भावस्थेत टाळणे अपेक्षित असते.

गर्भवतीला आहाराच्या बाबतीमध्ये काही महत्वाच्या सूचना Some Important Tips On Pregnancy Diet 

१. गर्भावस्थेत बऱ्याचदा आपल्याला जास्त खाण्याचा सल्ला दिला जातो. गरोदर आहेत म्हणून जास्त खायलाच हवे असे नाही , जेवढी भूक आहे आणि जेवढे पचते तेवढेच जेवण करा. 

२. कोणताही पदार्थ जरी पौष्टिक असला तरी तो प्रमाणातच खा. कमी किंवा जास्त खाणे बाळाच्या विकासावर परिणाम करू शकते. 

३. आहारामध्ये जंक फूड कमी आणि ताजे पौष्टिक पदार्थांचा समावेश जास्त करा. 

४. गरोदरपणात बाहेरचे किंवा आंबट किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते पण असे असले तरीही अश्या पदार्थांचे प्रमाण कमीच ठेवा. 

५. गर्भावस्थेत एकाच वेळी भरपूर जेवण करण्यापेक्षा थोडा थोडा वेळानी आहार घेणे जास्त फायदेशीर ठरते. 

६. जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नका. १५ ते २० मि. जाऊ द्या आणि मग पाणी पिऊ शकता. यामुळे पचन उत्तम राहते. 

७. आहारामध्ये तरल पदार्थ आणि पुरेसे  पाणी जरूर प्या. 

गर्भावस्थेत प्रत्येक महिन्यात गर्भाची होणारी वाढ | Fetal weight gain in permanency per month

गरोदरपणाचा पहिला महिना – लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यायची काळजी First month of pregnancy care

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top