लहान मुलांना ओट्स द्यावेत का? बाळाला ओट्स देण्याचे फायदे आणि तोटे All About Oats For Babies

Spread the love

प्रत्येक आई – वडिलांना आपलं बाळ सुदृढ , निरोगी, तंदुरुस्त असावं, त्याची रोगप्रतिकारशक्ती उत्तम असावी असे वाटत असते. त्यासाठी ते बाळाला जास्तीत जास्त पौष्टिक आणि सकस आहार देण्याचा प्रयत्न करतात. आजकाल पौष्टिक घटकांमध्ये ओट्स हा पदार्थ अग्रभागी आहे . बऱ्याचदा डॉक्टरही बाळाला ओट्स देण्यासाठी सल्ला देतात. ओट्स लहान मुलांना देण्याबद्दल बऱ्याच पालकांच्या मनामध्ये शंका आणि प्रश्न असतात . आजच्या या लेखामध्ये आपण बाळाला किंवा लहान मुलांना ओट्स देण्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत म्हणजेच मुलांना ओट्स का द्यावेत ? कधीपासून द्यावेत ? कसे द्यावेत ? आणि ओट्स देण्याचे काय काय फायदे बाळाला होऊ शकतात ? सविस्तर माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा .

Oats For Babies
ओट्स बाळाला का द्यावेत ? Why Oats are good for Babies?  

लहान बाळासाठी सर्वात उत्तम पौष्टिक आणि पूरक आहार कोणता असेल तर ते आहे ओट्स . ओट्स मधून वाढत्या वयामध्ये बाळाला लागणारे सर्व पौष्टिक घटक आणि पुरेश्या प्रमाणात ऊर्जा मिळते. लहान बाळाला पचण्यास हलके आणि कमीत कमी ऍलर्जीची शक्यता असणारा ओट्स हा एक पदार्थ आहे. ओट्स मध्ये भरपूर खनिजे, जीवनसत्वे आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. ओट्स हा फायबर चा उत्तम स्रोत आहे त्यामुळे जर तुम्ही बाळाला नियमितपणे ओट्स देत असाल तर बाळाचे पोट नेहमी साफ राहते. ओट्स हे हळू हळू पचतात त्यामुळे बाळाचे पोट जास्त काळासाठी भरलेले राहते विशेषतः रात्रीच्या जेवणामध्ये बाळाला ओट्सचे पदार्थ देत असाल तर बाळ रात्रभर शांत आणि गाढ झोप घेतो. ओट्समध्ये भरपूर लोह असते त्यामुळे लहान मुलांना ऍनेमिया किंवा रक्ताची कमतरता यासारखे आजार होत नाही. ओट्समध्ये कॅल्शियम, झिंक , फॉस्फरस, पोटॅशियम, सोडियम आणि मॅग्नेशियम यासारखे शरीराच्या वाढीसाठी पोषक पदार्थ असतात. हे सर्व घटक बाळाची हाडे मजबूत करण्यासाठी आणि बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. 

बाळाला ओट्स कधीपासून खाऊ घालावेत?  When Can We Give Oats To Babies ? 

पहिल्या ६ महिन्यापर्यंत बाळासाठी सर्वात पौष्टिक आणि पुरेसा आहार आईचे दूध असते. ६ महिन्यानंतर मात्र बाळाला योग्य प्रकारे योग्य त्या प्रमाणात ठोस आहार बाळाला सुरु करणे आवश्यक असते. सुरुवातीला बाळाला फळाच्या, भाज्यांच्या प्युरी द्यावे ती बाळाने व्यवस्थित पचवले कि मग साधारणपणे ७ महिन्याच्या आसपास बाळाला ओट्स देणे ठीक राहते. ओट्सची पातळ खीर बाळाला देऊ शकता.

ओट्स मुळे होणारे नुकसान 

ओट्स लहान मुलांना देण्याचे जसे फायदे आहेत तसेच तोटे सुद्धा आहेत. ओट्स मध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे बाळाच्या आहारामध्ये ओट्सचे प्रमाण मर्यादित ठेवणे गरजेचे असते. दिवसभरामध्ये एकावेळी बाळाला ओट्सचे पदार्थ देऊ शकता. 

कोणकोणत्या प्रकारे बाळाला ओट्स देऊ शकता ?

७-८ महिन्याच्या दरम्यान बाळाला अगदी पातळ अशी ओट्सची खीर द्या, ओट्स थोडेसे भाजून मिक्सरमध्ये पावडर करा आणि पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये शिजवून त्याची खीर बनवा. एखाद्या गोड फळाची प्युरी सुद्धा तुम्ही यामध्ये मिक्स करू शकता. ओट्सची भरपूर भाज्या घालून खिचड़ी बनवू शकता किंवा ओट्सचे पीठ वापरून मोठ्या मुलांसाठी पॅनकेक किंवा घावन बनवू शकता.

या लेखामधून मी तुम्हाला लहान मुलांना ओट्स देण्याचे फायदे आणि तोटे याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा

बाळाचे वजन का वाढत नाही ? Why My Baby Not Gaining Weight ? 6 Weight Loss Reasons

बाळाचे लसीकरण संपूर्ण माहिती -Baby’s Vaccination Schedul in Details 2022

1 thought on “लहान मुलांना ओट्स द्यावेत का? बाळाला ओट्स देण्याचे फायदे आणि तोटे All About Oats For Babies”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *