बाळाला सर्दी कफ खोकला असेल तर करा हे प्रभावी उपाय 10 Best Remedies on Cold & Cough in Babies

Spread the love
बाळाला सर्दी कफ खोकला असेल तर करा हे प्रभावी उपाय 10 Best Remedies on Cold & Cough in Babies 

लहान मुलांना वारंवार सर्दी होणे हे खूप सामान्य आहे .लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती नाजूक असते शिवाय सर्दी हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे सर्दी झालेल्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये लहान मुले आल्यास त्यांना लगेच सर्दीची लागण होते. ऍलर्जी , बॅक्टरीयल इन्फेकशन, हवामानात किंवा पाण्यात झालेला बदल या कारणांमुळेही सर्दी होण्याची शक्यता असते. 

लहान बाळाला जेव्हा सर्दी होते तेव्हा बाळाचे संपूर्ण रुटीन बदलते, बाळ सतत रडत राहते, नीट खात पीत नाही , बाळाची झोप नीट होत नाही आणि या सर्वांचा परिणाम बाळाच्या वजन वाढीवर आणि विकासावर होतो. बाळाची सर्दी खूप जास्त दिवस राहिली तर कफ होण्याचे प्रमाण वाढते आणि खोकलाही सुरु होतो. त्यामुळे लहान बाळाचा हा त्रास कमी करण्यासाठी बाळाची सर्दी लवकरात लावलर कमी येणे गरजेचे असते. 

लहान बाळाला किंवा मुलांना सर्दी होण्या अगोदर २-३ दिवस त्याची लक्षणे दिसू लागतात , कणकणी जाणवते हलकासा तापही येऊ शकतो . अशी लक्षणे दिसताच या लेखामध्ये पुढे सांगितलेले उपाय केल्यास सर्दी लवकर आटोक्यात येण्यास मदत होते आणि बाळाला त्याचा त्रास जास्त प्रमाणात जाणवत नाही.  

Cold & Cough in Babies
सर्दी झाल्यास करा हे उपचार Remedies for Cold & Cough in Babies

तान्ह्या बाळाला (६ महिन्यांपेक्षा लहान ) सर्दी झाल्यास घरगुती उपचारांसोबतच डॉक्टरांचा सल्ला हि घ्यावा म्हणजे सर्दी लवकर आटोक्यात यायला मदत होईल.

१. दिवसातून २-३ वेळा ओव्याची किंवा पाण्याची वाफ बाळाला द्यावी. 

बाळाला सर्दी झाल्यास कफ बाहेर पडण्यासाठी दिवसातून २-३ वेळा वाफ देणे आवश्यक असते. हि वाफ ओव्याची किंवा पाण्याचीही देऊ शकता. मोठ्या मुलांसाठी पाण्यामध्ये थोडे विक्स व्हेपर रब टाकून त्याचीही वाफ दिली असता बंद नाक मोकळे होते आणि कफ बाहेर पडण्यास मदत होते. 

ओव्याची वाफ देण्यासाठी ३-४ चमचे ओवा गरम कढईमधे टाकावा आणि थोडावेळ झाकून वाफ बनली कि झाकण उघडून बाळाला जवळ धरावे म्हणजे ओव्याची हि वाफ बाळाच्या श्वासाद्वारे छातीमध्ये जाऊन भरलेली छाती मोकळी होण्यास मदत होईल. 

२. बेबी विक्स वेपरब छातीला , पाठीला आणि पायांच्या तळव्याला लावावे म्हणजे उब राहील आणि अराम मिळेल.

बाळाची सर्दी कमी येण्यासाठी शरीर उबदार राहणे / ठेवणे आवश्यक असते , अश्यावेळी विक्स व्हेपर रब उत्तम पर्याय असतो. लहान बाळासाठी बनलेले बेबी व्हेपर रब बाळाच्या छातीला , पाठीला , तळपायाला लावल्यास सर्दी पासून अराम मिळण्यास मदत होते. 

३. बाळाची छाती , डोके , तळहात आणि तळपाय उबदार राहतील अश्या प्रकारे बाळाला कपडे घालावेत.

बाळाचे शरीर उबदार राहण्यासाठी बाळाला थोडेसे उबदार किंवा मोकळी हवा लागणार नाही , छाती , तळवे आणि डोके उबदार राहील असे कपडे घालावेत. 

४.एक वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना गरम हळदीचे दूध प्यायला द्यावे.

हळदीच्या दुधाला सुवर्णामृत मानले जाते . हळदीमध्ये अँटीबॅक्टेरिअल गुणधर्म असतात ज्यामुळे सर्दी सारखे इन्फेक्शन असल्यास लवकर आराम मिळतो. झोपण्यापूर्वी बाळाला १ कप हळदीचे दूध जरूर द्यावे. 

५. सर्दीवर रामबाण काढा .

आले, लवंग , दालचिनी, हळद ,काळी मिरी, तुळशीची पाने घालून बनवलेला काढा सर्दी वर रामबाण ठरतो.

( या काढ्याची सविस्तर रेसिपी पाहण्यासाठी हि लिंक क्लिक करा https://youtu.be/8b7lcY0eUu0 )

६.मध आणि लिंबाच्या रसाचे चाटण 

चमचाभर लिंबूच्या रसामध्ये २ चमचे मध घालून कोमट पाण्यातून हे मिश्रण १ वर्षापेक्षा मोठ्या बाळाला द्यावे, नाक गळणे कमी येते.

७. मध, काळीमिरी आणि लवंग यांचे चाटण 

एक चमचा मधामध्ये थोडीशी काळीमिरी पावडर आणि लवंग पावडर घालून ते बाळाला चाटवावे खोकला कमी येतो.मधामुळे हे चाटण तिखट लागत नाही , शिवाय मध हा घास साफ होण्यासाठी गुणकारी असतो. 

८. हळद-गुळाची गोळी 

गुळामध्ये थोडीशी हळद घालून त्याची गोळी सकाळी उठल्याबरोबर बाळाला चाखून खायला देऊ शकता, घास मोकळा होण्यास मदत होते.

९.जायफळाचा लेप 

एक वर्षांपेक्षा लहान बाळाला रात्री झोपण्यापूर्वी छातीवर कोमट पाण्यामध्ये जायफळाची पेस्ट करून ती पेस्ट लावावी. कफ बाहेर पडतो आणि सर्दी पासून अराम मिळतो.

१०. ओवा व लसूण यांची पुरचुंडी 

ओवा आणि लसूण एकत्र करून भाजून घ्यावे आणि हे मिश्रण एका रुमालामध्ये बांधून त्याने बाळाला छातीला, पाठीला शेकावे. सर्दी मोकळी होते.

सर्दी झाल्यावर बाळाला काय खायला द्यावे. Best Diet For Cold & Cough 

लहान बाळाला किंवा मुलांना सर्दी झाल्यास बाळ काहीच खात नाही. नाक बंद झाल्याने आणि शरीरात कणकणी जाणवत असल्याने लहान मुलं खाण्यास नकार देतात. जे बाळ फक्त आईचे दूध पिते अश्या बाळाला नाक वारंवार बंद होत असल्याने दूध पिणेही जमत नाही. 

६ महिन्यांपेक्षा लहान बाळाच्या बाबतीमध्ये या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी.

जे बाळ फक्त आईचे दूध पिते आहे अश्या बाळाच्या बाबतीमध्ये बाळाला दूध देण्यापूर्वी थोडीसी वाफ द्यावी ज्यामुळे बंद झालेले नाक मोकळे होईल . त्याचप्रमाणे बाळाला दूध पाजत असताना नेहमीपेक्षा बाळाचे डोके थोडे वरती राहील याची काळजी घ्यावी. थोड्या थोड्या वेळानी बाळाला दूध देत राहावे, ज्यामुळे बाळाचे पोटही भरेल आणि डिहायड्रेशन होणार नाही. 

बाळाला आईच्या दुधा व्यतिरिक्त वरचा आहार देत असाल तर या गोष्टीची जरूर काळजी घ्या. 

सर्दी झाल्यास मुलांची भूक कमी होते , अन्नपदार्थ चव लागत नाहीत त्यामुळे मुलं नीट खात नाहीत. अश्यावेळी बाळाला थोडासाच पण पौष्टिक असा आहार द्यावा.
१. वारंवार कोमट पाणी द्यावे.
२. आहारामध्ये नैसर्गिकरित्या गरम असणारे पदार्थ आहारमध्ये समाविष्ट करावेत जसे कि लसूण, आले, चिकन, मटण, अंडी .
३. बाळ खाण्यास नकार देत असेल तर सूप च्या स्वरूपात पातळ असे पदार्थ द्यावेत जसे कि भाज्यांचा सूप , चिकन,मटण सूप, डाळीचे सूप .

४. थंड पदार्थांचे सेवन टाळावे , कोमट आणि ताजा आहार बाळाला द्यावा.
५. तळलेले , मसालेदार , बाहेरचे पदार्थ , बेकारीचे पदार्थ टाळावेत .
६. सर्दीमुळे डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते त्यामुळे जास्तीत जास्त पाणी आणि तरल पदार्थ बाळाला द्यावेत.

७. सर्दी झाल्यास बाळाला मूगडाळ आणि तांदुळाची पातळ खिचडी द्यावी , बाळाला ऊर्जाही मिळते आणि सर्दीही आटोक्यात येण्यास मदत होते शिवाय लहान मुलांना अशी खिचडी आवडते सुद्धा. 

८.बाळ जर आईचे दूध घेत असेल तर बाळाला थोडा थोड्यावेळानी आईचे दूधही द्यावे. 

लहान मुलांसाठी असलेले लिक्विड पॅरासिटॅमॉल चा योग्य तो डोस बाळाला द्यावा. बाळाला आलेली कणकणी किंवा ताप कमी येण्यास मदत होते. 

५ दिवसांपेक्षा जास्त दिवस सर्दी असल्यास डॉक्टरना जरूर भेटावे .

सर्दी मध्ये बाळाला काय खायला देऊ नये ? Food To Avoid In Cold & Cough
बाळाला सर्दी झाल्यास ती लवकरात लवकर कमी येण्यासाठी शरीरामध्ये उब टिकवून ठेवणे आवश्यक असते. यासाठी आहारामध्ये नेहमी गरम पदार्थांचा समावेश असावा. 
१. जे पदार्थ नैसर्गिकरित्या शरीराला थंडावा देतात अश्या पदार्थांचा समावेश टाळावा . जसे कि दही, साबुदाणा,केळी असे काही पदार्थ. 
२. थंड पाणी किंवा फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ बाळाला देऊ नये . 
३. शीतपेये किंवा रेडिमेड सरबत बाळाला देणे टाळावे. 
४. मैद्याचे पदार्थ सर्दीच्या काळामध्ये टाळावेत. मैद्यामुळे बाळाला कफ होण्याची शक्यता असते , शिवाय असे पदार्थ पचनासही जड असतात.
५. शक्यतो बाळाला गाईचे / म्हशीचे दूध देणे ही टाळावे पण जर द्यायचेच असेल तर कोमट आणि थोडीसी हळद घालून ते दूध बाळाला प्यायला द्यावे. 
६. बाळाला सर्दी झाल्यास केळी बाळाला देऊ नये . कफ वाढण्याची शक्यता असते. 
 

या लेखामधून मी तुम्हाला लहान बाळाला सर्दी का होते आणि त्यावर काय उपाय करावेत, बाळाला सर्दीमधे काय खायला द्यावे काय नको  याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

बाळाला भूक न लागण्याची कारणे आणि भूक वाढवण्यासाठीचे  घरगुती उपाय |Loss Of Appetite In Children : Causes and Best 9 Tips To Improve It

लहान मुलांना होणाऱ्या कांजण्या Chickenpox : Symptoms, Causes & Treatment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *