बालदमा – कारणे, लक्षणे आणि उपचार . बालदमा बरा होतो का? Childhood Asthma Best Treatment 2024

Spread the love

पालक म्हणून आपल्याला नेहमीच आपल्या पाल्याच्या/ बाळाच्या आरोग्याची काळजी असते . बाळाला काहीही त्रास होत असेल तर आपण तो बघू शकत नाही . अशामध्ये बाळाला जर श्वास घ्यायला त्रास होत असेल तर मात्र बाळाला दमा तर नाही ना ? बालदमा म्हणजे काय ? लक्षणे आणि कारणे काय आहेत ? बालदमा किती वर्षाच्या बाळाला होऊ शकतो ? बालदमा बरा होतो का ? आणि काय उपचार करावेत असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये येतात .
या पोस्ट मध्ये आपण बाळाला होणार ” बालदमा “ या आजाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत .
बालदमा म्हणजे काय ? कारणे, लक्षणे आणि उपचार याबद्दल सविस्तर माहितीसाठी हि पोस्ट शेवटपर्यंत जरूर वाचा . 

बालदमा

दमा हा श्वासोच्छ्वासाचा एक आजार आहे .  मोठया माणसांप्रमाणे लहान मुलांनाही या दम्याचा त्रास होऊ शकतो. ज्याला आपण बालदमा म्हणतो. यासाठी बालदमा वयाच्या सहा महिन्यांनंतरच येतो. याआधी बाळाला दम लागत असेल तो न्यूमोनिया गटातला आजार आहे असे समजावे.

बालदमा दोन प्रकारचा असतो. पहिल्या प्रकारचा बाळदमा पाच वर्षानंतर आपोआप नाहीसा होतो. मात्र दुसरा प्रकार पाच वर्षानंतरही टिकून राहणारा असतो. बाळदमा असणा-या बाळाच्या आई, वडील, भाऊ, बहीण, काका, मामा, मावशी, आत्या, आजोबा, आजी, इ.नातेवाईकांना दम्याचा त्रास असल्यास बाळाला सुद्धा कायमचा दमा राहण्याची शक्यता असते.

 * दमा म्हणजे नक्की काय ? लहान मुलांमध्ये दमा असणे सामान्य आहे का ?

श्वासाद्वारे घेतल्या जाणाऱ्या ऍलर्जिक किंवा इतर संवेदशील घटकांविषयीची संवेदनशीलता वाढणे आणि श्वसनाला अडथळा निर्माण होणे म्हणजे दमा . या समस्येमुळे श्वसनलिकेला सूज येते आणि त्यामुळे श्वास  त्रास जाणवतो. लहान बाळांच्या बाबतीमध्ये मात्र मोठ्या मुलीच्या किंवा प्रौढांच्या तुलनेने वायुमार्ग अजूनच लहान असल्या कारणाने बाळाला अश्या दम्याचा त्रास असल्यास धोका जास्त असतो.

* बालदम्याचे प्रकार

. ऍलर्जिक दमा – बरयाचदा काही ऍलर्जिक घटकांची जसे कि धूळ, धूर, तंबाखूचा/सिगारेटचा धूर ,वाहनांचे सांडपाणी, कारखान्यांचा धूर, परागकण, पाळीव प्राण्यांचे केस किंवा लाळ यांची ऍलर्जी असू शकते . अश्या घटकांच्या संपर्कात बाळ आल्यास बाळाला श्वास घेण्यास त्रास होतो.

. अनुवांशिक दमा – बाळाच्या रक्ताच्या नातेवाईकाना जर दमा असेल तर बाळाला सुद्धा दम्याचा त्रास होऊ शकतो.

*दम्याची लक्षणे 

1. बालकाला सर्दी, शिंका अश्या त्रासांची सुरुवात होणे.

2. छातीचा आवाज यायला लागतो.

3. जोरजोरात श्वास घेणे , श्वास घेताना नाकपुड्या फुलणे.

4. खाताना किंवा पिताना त्रास होणे .

5. थकवा आणि सुस्ती जाणवणे .

6. खोकल्याची मधून मधून उबळ येणे.

7.श्वास सोडताना शिट्टीसारखा आवाज येणे.

8. दम लागल्याने पोट उडताना दिसणे.

9.ओठ आणि हाताची त्वचा आणि नखे निळसर दिसणे.

10.इतर लहान बाळांच्या तुलनेत रडण्याचा आवाज क्षिण जाणवणे. 

11. न्यूमोनियात जसा सुरुवातीपासून ताप असतो तसा बाळदम्यात नसतो. पण ताप 2-3 दिवसांनी येऊ शकतो.

बाळाला सर्दी कफ खोकला असेल तर करा हे प्रभावी उपाय 10 Best Remedies on Cold & Cough in Babies

बालदमा
* बालदम्यावर उपचार

दम्यावर इलाज नाही मात्र या आजाराची लक्षणे कमी करण्यास किंवा गंबीरता टाळण्यास काही उपचार पद्धती मदत करू शकतात . बाळदम्यात सामान्यपणे इंजेक्शन आणि सलाईनची गरज नसते. श्वसनमार्गातून औषध योग्य ठिकाणी बरोबर पोहोचते.तोंडाने घ्यायच्या गोळ्यादेखील श्वासमार्ग मोकळा ठेवायला मदत करतात.

१. नेब्युलायझर

२. ड्राय पावडर इन्हेलर

३. मीटर डोस इन्हेलर

४. इंजेक्शन

बाळदम्याचा पहिलाच प्रसंग असेल तर बाळाला ताबडतोब डॉक्टरांकडे न्या. डॉक्टर तातडीक उपचार करतील तसेच घरी घेण्यासाठी औषधे सांगतील. त्याप्रमाणे औषधोपचार सुरु ठेवा.

उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्यांवर करा हे खात्रीशीर उपाय Heat Rash/ Fungal infection Best 7 home remedies

*दम्याची लक्षणे कमी करण्यास काय केले जाऊ शकते?

१. तुमच्या बाळाला ज्या घटकांची ऍलर्जी आहे त्यापासून दूर ठेवा .

२. बाळाच्या आसपासचे वातावरण आणि परिसर स्वच्छ आणि धूळमुक्त ठेवा.

३. बाळाचे अंथरून पांघरून , खेळणी आठवड्यातून एकदा नक्की धुवा.

४. बाळाला पाळीव प्राण्यांपासून दूर ठेवा .

५. एअर प्युरिफायर आणि हुमीडीफायरचा वापर करा.

६. ज्या अन्नपदार्थांची ऍलर्जी आहे असे पदार्थ बाळाच्या आहारामध्ये येणार नाहीत याची खबरदारी घ्या.

७. बाळामध्ये दम्याची लक्षणे दिसून येताच दिलेला इन्हेलर पंपचा वापर करा.

८. ऋतूमानाप्रमाणे बाळदमा कमी-जास्त होतो. यासाठी थंडी-पावसात काळजी घ्या. ऊबदार कपडे चांगले.

९. दमा असणाऱ्या बालकांना सर्दीताप झालेल्या व्यक्तीपासून शक्यतो दूर ठेवा.

* बालदमा बरा होऊ शकतो का ?

दम्याचा त्रास बाळाला दीर्घकाळ राहू शकतो. दम्यासाठी कोणतीही उपचार पद्धती नाही परंतु बाळ जसजसे मोठे होऊ लागते त्यानंतर दम्याची हि लक्षणे कमी होताना दिसून येतात. जर तुम्ही या सांगितलेले उपाय आणि टिप्स केल्या तर बाळाच्या वाढीवर किंवा विकासावर या आजाराचा परिणाम होणार नाही आणि हळू हळू हा त्रास कमी  होत जाईल.

या आजाराची गंभीरता आणि त्रास वाढू नये याकरता योग्य ती वैद्यकीय मदत आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.

* दमा जर अनुवांशिक असेल तर काय करावे ?

5 वर्षं वयानंतर बहुतेक बालकांचा दमा आपोआप थांबतो. मात्र काहींना यानंतरही दमा चालूच राहतो. अश्यावेळी काही टिप्स नक्कीच कमी येतील.

१. श्वसनोपचार म्हणजे निरनिराळे सोपे प्राणायाम मुलांना शिकवा.

२. फुगा फुगवण्याचा व्यायामही नियमितपणे मुलांकडून करून घ्या.

३. मुलाला भरपूर मैदानी खेळ खेळू द्या. खेळामुळे श्वसनमार्ग मोकळा आणि निरोगी राहतो.

४.मुलांसोबत नेहमी बॅगमध्ये औषधे आणि स्प्रे ठेवा , शिवाय त्यांचे मित्र / शिक्षक यांनासुद्धा मुलाला असलेल्या या त्रासाची माहिती देऊन सोबत असलेली औषधे किंवा स्प्रे कशाप्रकारे आणि कधी द्यावा याची माहिती द्या .

५. मुलांना या आजाराची भीती न घालता योग्य वेळेत होणार त्रास जवळच्या व्यक्तींना सांगण्यास शिकवा म्हणजे गंभीर परिस्थिती उध्दभवणार नाही .

या लेखामधून मी तुम्हाला बालदमा म्हणजे काय ? लक्षणे आणि कारणे काय आहेत ? बालदमा किती वर्षाच्या बाळाला होऊ शकतो ? दमा असेल तर तो बरा होतो का ? आणि काय उपचार करावेत याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

Please Visit our YouTube channel for more information 

बालविश्व मराठी BabyWorld

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top