गालगुंड किंवा गालफुगी (MUMPS)म्हणजे काय ? लहान मुलांना झाल्यास गालगुंड काय उपाय करावेत ? कशी काळजी घ्यावी ? Best Treatment on Mumps in Kids 2024

Spread the love

गालगुंड किंवा गालफुगी (MUMPS)म्हणजे काय ? लहान मुलांना झाल्यास गालगुंड काय उपाय करावेत ? कशी काळजी घ्यावी ? Best Treatment on Mumps in Kids 2024

गालगुंड किंवा गालफुगी हा आजार कोणत्याही वयोगटामध्ये दिसून येतो परंतु याचे जास्त प्रमाण १२ वर्षांपेक्षा लहान मुलांमध्ये जास्त आढळून येते. अचानक ताप येणे, डोकेदुखी होणे,गाल फुगणे, जेवताना किंवा काही पिताना त्रास होणे अशी लक्षणे दिसायला लागली कि समजायचं कि बाळाला गालफुगी झाली आहे. या पोस्ट मध्ये घेणार आहोत गालगुंड या आजाराची लक्षणे , कारणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.

गालगुंड किंवा गालफुगी
गालगुंड किंवा गालफुगी म्हणजे नक्की काय ? What is Mumps ?

गालगुंड किंवा गालफुगी हा लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येणारा आजार पसरणाऱ्या विषाणूंमुळे होतो. चेहऱ्याच्या आत दोन्ही बाजूला कानाच्या खाली असलेल्या सलायवरी ग्रंथींना सूज आल्याने गाल फुगतो ज्याला आपण गालफुगी किंवा गालगुंड म्हणतो.

(हेही वाचा उन्हाळ्यात येणाऱ्या घामोळ्यांवर करा हे खात्रीशीर उपाय Heat Rash/ Fungal infection Best 7 home remedies

गालगुंड किंवा गालफुगी होण्याची कारणे Main Reason of Mumps

पॅरामिक्सओ जमातीतील विषाणू तोंडावाटे किंवा नाकावाटे शरीरामध्ये गेला कि गालगुंड हा आजार होतो. संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकेतून हे विषाणू हवेमध्ये पसरतात आणि त्यामुळे अश्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीलासुद्धा हा आजार होतो. गालगुंड चे विषाणू पसरू नयेत म्हणून प्रभावित व्यक्तीने शिंकताना किंवा खोकताना तोंड हाताने किंवा रुमालाने तोंड झाकणे गरजेचे असते.

गालगुंड आजाराची मुख्य लक्षणे Signs & symptoms of Mumps in kids

१. जबड्यावर सूज येणे म्हणजेच गाल फुगणे.
२. डोकेदुखी
३. स्नायूंचे दुखणे.
४. सांध्यांचे दुखणे.
५. तोंड कोरडे पडणे.
६. भूक न लागणे.
७. ताप आणि अशक्तपणा येणे.
८. वृषणांमध्ये दुखणे .
९. चिडचिडेपणा वाढणे.
गालगुंड / गालफुगी या आजाराचे निदान कसे केले जाते ?
१. संक्रमित व्यक्तीची शारीरिक तपासणी मुख्यतः गाळाची आणि कानाची तपासणी केली जाते.
२. रक्ताची चाचणी केली जाते .
३. लाळेची चाचणी केली जाते.
४. लघवीची चाचणी केली जाते.
५. गालगुंडची लस (MMR Vaccine) घेतली आहे कि नाही हे लक्षात घेतले जाते.

Mumps signs
गालगुंड या आजारावर उपचार Treatment on Mumps 

हा आजार विषाणूंमुळे होत असल्याने यासाठी अँटिबायोटिक्स दिले जात नाहीत. हा आजार झाल्यानंतर संक्रमित व्यक्तीच्या शरीरामध्ये या विषाणूविरुद्ध लढण्यासाठी तयार होते म्हणजेच तशी रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि हळू हळू गालगुंड कमी होण्यास सुरुवात होते. गालगुंड वर असणारी लस दिली गेली नसेल तर ती दिली जाते . या आजारावर विशेष असे काही उपचार नाहीत पण जी लक्षणे दिसत आहेत त्यासाठी अराम देण्यावर जास्त भर दिला जातो.
जर बाळाला हि लस दिली असेल आणि तशी प्रतिकारशक्ती बाळाच्या शरीरामध्ये तयार झाली असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा कधीही गालगुंड होत नाही.

(हेही वाचा बालदमा – कारणे, लक्षणे आणि उपचार . बालदमा बरा होतो का? Childhood Asthma Best Treatment 2024

गालगुंडवर प्रतिबंधात्मक उपाय Preventive Tips 

१. प्रभावित व्यक्तीपासून बाळाला दूर ठेवणे.
२. ताप किंवा कणकणी जास्त वाटत असेल तर पॅरासिटॅमॉल घेणे.
३. सूज कमी व्हावी म्हणून थंड किंवा गरम पाण्याचा शेक देणे.
४. जाडसर किंवा कडक पदार्थ खाणे टाळणे. पातळ पदार्थांचा समावेश करणे.
५. सूज जास्त असेल तर आयब्युप्रोफेन घेणे.

या लेखामधून मी तुम्हाला गालगुंड किंवा गालफुगी म्हणजे काय ? लक्षणे आणि कारणे आणि उपचार काय आहेत याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

Please Visit our YouTube channel for more information 

बालविश्व मराठी BabyWorld

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *