बाळाचे वजन का वाढत नाही ? Why My Baby Not Gaining Weight ? 6 Weight Loss Reasons

Spread the love
बाळाचे वजन का वाढत नाही ? Why My Baby Not Gaining Weight? 

प्रत्येक पालकांना आपले बाळ निरोगी, गुटगुटीत असावे , त्याची वाढ आणि विकास योग्य प्रकारे आणि झपाट्याने व्हावा असे वाटत असते. बाळाच्या विकासामध्ये सर्वात महत्वाचा घटक कोणता असेल तर तो आहे बाळाची वयानुसार योग्य वजन वाढ . बाळाचे वजन जर योग्य प्रकारे वाढत असेल तर बाळाचा विकासही योग्य प्रकारे होतो आहे असे समजले जाते .
बाळाचे जर वजन वाढत नसेल तर पालकांना खूप चिंता होते कि बाळाचे वजन कसे वाढवावे , वजन का वाढत नाही आणि काय उपाय करायला हवेत . 

या लेखामध्ये बाळाचे वजन न वाढण्याची करणे सांगितलेली आहेत , जर बाळाचे वजन वाढत नसेल तर यापैकी एखादे किंवा एका पेक्षा जास्त करणे असू शकतात . कोणत्याही समस्येचे कारण समजले कि त्यावर उपाय करण्यास सोपे जाते , त्यामुकले पालकांनी आपल्या बाळाच्या बाबतीमध्ये यापैकी कोणते कारण आहे हे शोधणे आणि त्यानुसार उपाय करणे अपेक्षित आहे.

Weight Loss reason in baby

बाळाचे वजन न वाढण्याची कारणे

१. बाळाचे वारंवार आजारी पडणे –

बाळ/ मुलं जर सतत आजारी पडत असतील तर बाळाचे वजन नीट वाढत नाही कारण बाळ जेव्हा आजार असते तेव्हा नीट खात – पीत नाही, झोप नीट होत नाही , सतत किरकिर करते आणि या सर्व असंतुलित झालेल्या रुटीन मुळे बाळाचे वजन कमी येते .

२. पुरेशी झोप घेणे –

बाळाच्या वजन वाढीमध्ये बाळाला पुरेशी व गाढ झोप मिळणे खूप आवश्यक असते . बाळाच्या वाढीसाठी आवश्यक असणारे ग्रोथ हार्मोन झोपेमध्ये जास्त सक्रिय असतात ज्यामुळे बाळाची वाढ उत्तम प्रकारे होते . पण बाळ जर नीट झोपत नसेल तर त्याचा चिडचिडेपणा वाढतो , थकवा जाणवतो ज्यामुळे इतर रुटीन हि बिघडते . परिणामी बाळाचे वजन वाढत नाही .

३. बाळाचा असंतुलित  आहार

मुलांच्या वजन वाढीमध्ये पोषक व संतुलित आहार जास्त महत्वाचा असतो . बाळ जर पुरेसा आणि पौष्टिक आहार घेत असेल तर त्यांच्या सुयोग्य आणि सुदृढ वाढीसाठी लागणारे सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात शरीराला मिळतात आणि बाळाचा सर्वांगीण विकास उत्तम प्रकारे होण्यास मदत होते . पण जर तुम्ही नेहमी बाळाला एकच एक आहार देत असाल , बेकारीचे पदार्थ , खूप मसालेदार , हॉटेल मधले पदार्थ देत असाल तर हे पोषण अपुरे पडते आणि वजन वाढीमध्ये बाधा निर्माण होते .

 ४. बाळाच्या पोटामध्ये जंत होणे .

जर लहान मुलांच्या पोटामध्ये जंत झाले असतील तर त्यावेळी बाळाला भूक लागत नाही किंवा जरी बाळ खात असेल तर ते बाळाच्या अंगी लागत नाही. जंतामुळे हिमोग्लोबीन हि कमी होते ज्यामुळे बाळाची भूक कमी होते , रोग प्रतिकार शक्ती कमी होते , बाळ सतत आजारी पडते आणि बाळाचे वजन कमी होते .

५. बाळाचे पोट साफ होणे –

बऱ्याचदा बाळाला आवश्यक असणारे पाणी जर पुरेश्या प्रमाणात मिळत नसेल तर बाळाचे पोट साफ होत नाही . बाळाची पोट्टी खूप घट्ट होते किंवा २-३ दिवस होत नाही . अश्या दरम्यान बाळाला भूक लागण्याचे प्रमाण कमी होते . बाळ नीट खात-पीत नाही . ज्यामुळे वजन कमी होऊ शकते . 

 बाळाचे वजन वाढण्यासाठी उपाय

६ महिन्यानंतर बाळाला हळू हळू आईच्या दूधासोबतच वरचा ठोस आहार देण्यास सुरु केलेले असते,बाळाला दातही यायला लागत , हालचाली वाढतात अश्या दरम्यान बाळाचे वजन कमी होण्याची जास्त श्यक्यता असते . काही विशेष गोष्टींची काळजी घेतली तर बाळाचे वजन हे उत्तम राहून बाळ सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होते .

१. स्तनपान / फॉर्मुला मिल्क

बाळाला जरी तुम्ही वरचा आहार सुरु केला असला तरी आईचे दूध देण्याचे प्रमाण कमी करू नये .रात्रीसुद्धा २-३ वेळा बाळाला स्तनपान किंवा फॉर्मुला मिल्क द्यावे .  पहिल्या एक वर्षांमध्ये बाळासाठी वरचा आहार हा फक्त बाळाला त्याची ओळख व्हावी , वेगवेगळ्या चवी कळाव्यात आणि बाळाला वरचा आहार खाण्यात गोडी वाढावी यासाठी असतो . फक्त वरच्या आहारावर बाळाचे सर्व पोषण होत नाही त्यामुळे ठोस आहारसोबतच स्तनपान हि चालू ठेवावे . त्याच बरोबर आवश्यक असल्यास फॉर्मुला मिल्कही चालू ठेवावे .

२. बाळाचा आहार

बाळाच्या आहारामध्ये जास्तीत जास्त लोहयुक्त पदार्थांचा समावेश करावा . सुरुवातीला बाळाला फळांच्या प्युरी , भाज्यांच्या प्युरी आणि हळू हळू भाताची पेज, डाळीचं पाणी , नाचणीची खीर असे पदार्थ द्यायला सुरु करावेत . बाळाला नेहमी वेगवेगळा आहार द्या ज्यामधून मिळणारे पोषणही हि वेगवेगळे असेल आणि बाळाला वरचा आहार खाण्याची गोडी हि लागेल .

३. बाळाची झोप –

बाळाच्या सर्वांगीण विकासामध्ये बाळाची झोप खूप गरजेची असते . बाळ जर त्याच्या वयानुसार आवश्यक असणारी झोप पुरेश्या प्रमाणात घेत असेल तर बाळाचे वजन छान वाढते .

४. बाळाचे मालिश –

या दरम्यान बाळाच्या हालचाली वाढलेल्या असतात त्याचबरोबर त्याच्या विकासाचा हा एक खूप महत्वाचा काळ चालू असतो . अश्या वेळी दिवसातून बाळाला कमीत कमी एकदा आणि जास्तीत जास्त २ वेळा तरी पूर्ण शरीराचे योग्य प्रकारे मालीश मिल्ने आवश्यक असते . ज्यामुळे बाळाच्या हाडांमध्ये आणि स्नायूंमध्ये बळकटी येते . बाळाची भूक वाढते , झोप छान लागते ज्यामुळे बाळाने जे खाल्ले आहे ते अंगी लागून बाळसे यायला मदत होते . 

५. बाळाचे लसीकरण

बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व काही गंभीर आजारांपासून बाळाचे रक्षण करण्यासाठी नेमून दिलेले लसीकरण हे वेळेत देणे आवश्यक असते . बाळाचे लसीकरण जर वेळेत होत असेल तर बाळाचे आजारी पाडण्याचे प्रमाण कमी होते . बाळ जर निरोगी आणि सुदृढ असेल तर वजन हि उत्तम प्रकारे वाढते .

६. बाळाला होणारे आजार –

या दरम्यान बाळाच्या पोटामध्ये जंत होणे , हिमोग्लोबीन कमी होणे , खूप जास्त चिडचिड करणे अश्या गोष्टी होऊ शकतात त्यामुळे प्रत्येक ३-४ महिन्यांनी बाळाला जंत होऊ नयेत यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे देणे , वेळोवेळी HB चेक करणे आणि मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स देणे गरजेचे असते.

या लेखामधून मी तुम्हाला लहान बाळाचे / मुलांचे वजन न वाढण्याची करणे आणि उपाय  याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top