बाळाचा कान दुखणे , कानातून पू किंवा पाणी येण्याची समस्या Ear Pain In Children
बऱ्याचदा लहान बाळ असेल किंवा मोठी मुलं कान दुखतो आहे अशी तक्रार करतात . तान्ह्या बाळाच्या कानाला हात लावला असता बाळ अचानक रडायला लागतो किंवा सतत कानाला हात लावतो किंवा कान ओढतो. कानात होणाऱ्या या वेदना अतिशय त्रासदायक असू शकतात. अश्यावेळी पालक मुलांच्या या वेदना पाहून घाबरतात .
पालकांना समजत नाही कि बाळाचा कान नक्की कशामुळे दुखतो आहे किंवा त्यावर काय उपाय करायला हवेत. आजच्या या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि तान्ह्या बाळाचा किंवा लहान मुलांचा कान दुखत असेल तर त्यामागे काय काय करणे असू शकतात, कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे असते आणि कोणत्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे आणि कान दुखत असल्यास काय उपचार करावेत .
सविस्तर माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा आणि काही प्रश्न असतील तर कंमेंट (Comment) मध्ये जरूर विचारा .

कान दुखण्याची कारणे Why Does Baby’s Ear Hurts ?
१. कानात मळ अधिक झाल्याने –
कानामध्ये मेणासारखा एक पदार्थ तयार होत असतो ज्यामुळे हवेतील धूळ किंवा काही परजीवी कानामध्ये जाऊ नये आणि कानाला इजा होऊ नये. परंतु असे असले तरी हा मळ जेव्हा अति प्रमाणात कानामध्ये साचत जातो त्यावेळी कानामध्ये वेदना होण्यास सुरुवात होते . त्यामुळे कानाच्या अगदी आतमध्ये असणारा नाही पण जो कानामध्ये आपल्याला सहज दिसतो असा मळ नियमितपणे स्वच्छ करणे किंवा काढणे आवश्यक असते.
२. बाळाला दात येत असतात त्यावेळी हिरडे सुजतात आणि कान हि दुखायला लागतात.
बाळाला जेव्हा दात येत असतात तेव्हा बाळाचे हिरडे फुगतात , सूज येते आणि दात येण्याच्या या प्रक्रियेचा परिणाम कानाच्या नसांवरही होतो. हिरड्यांवर आलेल्या सुजेमुळे बाळाच्या कानामध्ये हि वेदना होतात. या वेदना कमी करण्यासाठी वेळोवेळी हिरड्यांचा आणि बाळाच्या चेहऱ्याचा मसाज केला पाहिजे.
३. सर्दीमध्ये हि कान दुखण्याचे प्रमाण वाढते.
लहान मुलांना सर्दी होण्याचे प्रमाण थोडे जास्त असते. जेव्हा बाळाला सर्दी होते तेव्हाही कान बंद झाल्यासारखा वाटतो, कानामध्ये दाब जाणवतो आणि वेदनाही होतात.
४. कानामध्ये जर काही टोकेरी वस्तू घातल्याने जखम झाल्यास किंवा कानाचा पडदा फाटल्यास कान दुखतो.
बऱ्याचदा लहान मुलं त्यांच्या नकळत कानामध्ये काही वस्तू घालत असतात जसे कि पेन, पेन्सिल, खोडरबर किंवा छोटे मणी, कागदाचे गोळे. जर अश्या वस्तू कानामध्ये अडकल्या असतील आणि जर टोकेरी वस्तूंमुळे कानामध्ये जखम झाली असेल किंवा कानाच्या पडद्याला काही इजा झाल्या असतील तर कान दुखायला सुरुवात होते.
५. कानावर जर मार लागला असेल तर कान दुखतो.
कानावर काही जोराचा मार बसला असेल किंवा बाळ कानावर पडला असेल तर त्यावेळीही कान दुखू शकतो.
६.मोठ्या आवाजामुळे किंवा कानामध्ये कोणी किंचाळले असेल तर
आपल्याला बऱ्याचदा लहान मुलांच्या कानामध्ये मोठ्याने ओरडतो, खूप एकदम मोठा व कानावर अचानक पाने पडल्याशी कानामध्ये दुखायला लागते .
कान दुखण्यावर घरगुती उपचार What To DO If Baby’s Ear Hurts ? Remedies & Tips
बाळ खूप लहान असेल तर घरगुती उपचार करत बसू नये , वैद्यकीय सल्ला घ्यावा.
१. तुळशीच्या पानांचा रस
दिवसातून २ वेळा कानामध्ये तुळशीच्या पानांचा रस काढून तो २-३ थेंब टाकावा कान दुखणे थांबते.
२. लसणाच्या पाकळ्या
लसूण बारीक करून मोहरीच्या तेलामध्ये गरम करून घ्यावा हे तेल गाळून दिवसातून २-३ वेळा कानामध्ये टाकावे . काही इन्फेक्शन असेल तर कमी येण्यास मदत होते.
३. प्रत्येक २-३ महिन्यांनी कान विशेष तंज्ञांकडून कान साफ करून घ्यावेत.
४. दात येत असल्यामुळे जर बाळाचा कान दुखत असेल तर बाळाला टीदर द्यावे आणि दिवसातून ४-५ वेळा बाळाच्या हिरड्यांचा मसाज करावा.
५. अंघोळीनंतर बाळाचा कान कोरड्या कपड्याने पुसावा म्हणजे पाणी राहत नाही आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता कमी होते.
६.इयरबड किंवा अजून काही टोकेरी वस्तू वापरून कानातील घाण काढण्याचा प्रयत्न करू नये.
कानातून पू किंवा पाणी येणे .
कानातून पू किंवा पाणी येत असेल तर हे एक इन्फेक्शन चे लक्षण आहे त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कानातील बॅक्टेरियल इन्फेक्शनचे प्रमाण जेव्हा वाढते तेव्हा पानातून पाणी , पू किंवा रक्त स्त्राव होतो आणि काही गंभीर आजारांनाही निमंत्रण मिळते. हे टाळण्यासाठी वेळीच डॉक्टरांची मदत घ्यावी , अश्यावेळी वर सांगितलेला कोणताही उपचार करू नये , डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कानामध्ये कोणतेही औषध हि घालू नये.
डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा ?
बाळाच्या कानावर किंवा कानामागे सूज आली असेल किंवा कान लाल झाला असेल किंवा बाळाला सतत ताप येत असेल , कानातून रक्त किंवा पाणी किंवा पू येत असेल तर त्यावेळी वैद्यकीय सल्ल्ला लवकरात लवकर घ्यावा. बऱ्याचदा लहान मुलं कानामध्ये काही वस्तू किंवा खेळणी , रबर यांचे तुकडे घालतात त्यामुळे कानामध्ये इजा झालेली असू शकते . बाळाची मान जर कानदुखीमुळे रआखडली असेल किंवा बाळ खूप जास्त रडत असेल तर त्यावेळीही वेळ न घालवता डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.
या लेखामधून आपण लहान मुलांच्या कानामध्ये होणाऱ्या वेदना आणि त्याची कारणे आणि उपाय याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.