बाळाचे लसीकरण संपूर्ण माहिती Baby’s Vaccination Schedule In Marathi 2022
एखादा आजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा तो आजार होऊच नये म्हणून प्रतिबंध करणे केव्हाही चांगलेच. म्हणूनच लहान बाळांचे लसीकरण योग्य वेळेत आणि योग्य ते होणे आवश्यक असते. लहान मुलांचे कर्दनकाळ असलेल्या काही आजार रोगप्रतिबंधक लसी दिल्याने टाळता येतात. या सर्व लसी प्रत्येक गावामध्ये असणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विनामूल्य उपलब्ध असतात.
बाळाच्या जन्मानंतर बाळाला नियमितपणे लसीकरण करणे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि काही गंभीर आजारापासून रक्षण करण्यासाठी आवश्यक असते. कोणत्या वयात बाळाला कोणत्या लसी दिल्या जातात याची माहिती या लेखामध्ये दिली आहे .
सूचना – काही कारणांमुळे बाळाचे लसीकरण राहिले असल्यास किंवा उशीर झाला असल्यास जेवढ्या होईल तेवढ्या लवकर ते करून घ्यावे. बाळाला सर्दी, ताप, खोकला असेल तरीही बाळाला लस द्यावी.
लस म्हणजे नक्की काय ? What is exactly Vaccine means?
प्रत्येक लस म्हणजे त्या-त्या रोगाचे मेलेले किंवा अर्ध मेलेले जंतूंचा असतात किंवा त्यांचा अंश असतो. असे असले तरीही हे जंतू सबळ नसल्यानं हे रोग होत नाहीत पण हि लस शरीरात गेली कि शरीर त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी तयार होते.
बाळाचे लसीकरण वेळापत्रक Vaccination Schedule
१. नवजात बाळाला कोणत्या लसी दिल्या जातात.
बाळच्या जन्मानंतर लगेच बाळाला पोलिओ, बीसीजी आणि हिपॅटायटीस बी या तीन लसी दिल्या जातात.
पोलिओ, क्षयरोग आणि कावीळ या रोगांपासून बाळाचे रक्षण होण्यासाठी या लसी दिल्या जातात. पोलिओचे दोन थेम्ब तोंडात, बीसीजी डाव्या दंडावर आणि हिपॅटायटीस बी डाव्या मांडीत दिली जाते.
१.१. बी. सी.जी – लहान बाळाचा क्षय रोगापासून बचाव करण्यासाठी बी. सी.जी. हि लस जन्मानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी दिली जाते. काही कारणांमुळे जर हि लस बाळाला लगेच दिली गेली नसेल तर पहिल्या ३-४ महिन्यांपर्यंत हि लस बाळाला मिळणे गरजेचे असते.
१.२. पोलिओ – बाळाच्या जन्मानंतर पहिल्या १२ तासांच्या आत बाळाला पोलिओचा पहिला डोस दिला जातो. गेली कित्येक वर्षे भारतामध्ये पोलिओची मोहीम शासनाकडून राबवली जाते आहे. जी प्रत्येक गावामध्ये प्राथमिक केंद्रावर उपलब्ध असते.
१.३. हिपॅटायटिस ‘ए’ – हिपॅटायटिस ‘ए’ हा एक गंभीर स्वरूपाचा लिव्हरशी निगडित आजार आहे. थकवा येणे, पोटदुखी, मळमळ आणि कावीळ यासारखी लक्षणे या विषाणूमुळे दिसून येतात. हि विषाणूजन्य कावीळ आहे. या विषाणूची लक्षणे काही आठवडे ते काही महिन्यांपर्यंत दिसून येतात. बाळाला या आजारापासून सुरक्षा मिळावी म्हणून हि लस अजिबात चुकवू नका. बाळाला वेळीच हि लस द्या.बाळाला २ डोस मध्ये हि लस देणे आवश्यक असते.
सहा आठवड्यानंतर बाळाचे लसीकरण
बाळाला दीड महिना पूर्ण झाला कि काही लसी दिल्या जातात
१. पोलिओ – बाळाच्या तोंडात पोलिओचे दोन डोस दिले जातात.
२. डी.टी. पी. – याला ट्रिपल किंवा त्रिगुणी लास म्हणतात जी बाळाच्या उजव्या मांडीला दिली जाते. बाळ दीड महिन्याचं झालं कि त्याला ट्रिपल ची लस दिली जाते. यालाच डीटीपी लस असे नाव आहे. या लसीमध्ये घटसर्प, डांग्या खोकला आणि धनुर्वात या ३ आजारांच्या लसी असतात.
३. हिपॅटायटीस बी – हिपॅटायटीस ची हि दुसरी लस बाळाला डाव्या मांडीला दिली जाते.
दहा आठवडे पूर्ण झाल्यावर बाळाचे लसीकरण
बाळाला अडीच महिने पूर्ण झाले कि अडीच महिन्यामध्ये ज्या तीन लसी दिल्या जातात. त्याचाच बुस्टर डोस दिला जातो. म्हणजे अडीच महिन्यानाने बाळाला परत पोलिओ , डी.टी.पी आणि हिपॅटायटीस बी या लसी दिल्या जातात.
चौदा आठवडे पूर्ण झाल्यानंतर बाळाला दिले जाणारे लसीकरण
बाळाला साडे तीन महिने पूर्ण झाले कि पोलिओ आणि डी.टी.पी चा तिसरा डोस दिला जातो. पोलिओ तोंडावाटे तर डी.टी.पी. उजव्या मांडीला लास टोचली जाते.
नऊ महिने पूर्ण झाल्यानंतर बाळाला दिले जाणारे लसीकरण
नऊ महिने पूर्ण झाले कि बाळाला एमएमआर,टायफॉईड आणि व्हिटॅमिन अ या लसी दिल्या जातात. एमएमआर ची लस बाळाच्या उजव्या दांडावर टोचली जाते तर व्हिटॅमिन A डोस तोंडावाटे दिला जातो.
एमएमआर लस – या लसीमध्ये गोवर(मीझल्स), गालगुंड(मम्प्स) आणि रुबेला या तीन आजारांवर प्रतिबंधात्मक लसी असतात. बाळ नऊ महिन्याचा झाल्यावर पहिला डोस देतात. १५ महिन्याचा झाल्यावर दुसरा आणि ४-५ वर्षाच्या दरम्यान तिसरा डोस दिला जातो.
टायफॉईड लस – टायफॉईड अर्थात विषमज्वर या आजाराचा पहिला डोस बाळाला ९-१२ महिन्यांच्या दरम्यान दिला जातो.
कांजण्यावरील लस चिकनपॉक्स – कांजण्या हा संसर्गजन्य रोग आहे. हा आजार प्रामुख्याने उन्हाळ्यात दिसून येतो. लहान मुलांसाठी हा आजार अतिशय त्रासदायक आणि गंभीर ठरू शकतो. या लसीचा पहिला डोस बाळाच्या १५ व्या महिन्यात दिला जातो तर त्यानंतर ३ महिन्यांनी दुसरा डोस दिला जातो. कांजण्या हा आजार नक्की काय आहे आणि त्यावर काय उपाय करायला हवेत यासाठी पुढे दिलेली लिंक क्लिक करा. लहान मुलांना होणाऱ्या कांजण्या Chickenpox : Symptoms, Causes & Treatment
दीड वर्ष पूर्ण झाल्यावर बाळाला दिले जाणारे लसीकरण
दीड ते दोन वर्षाच्या दरम्यान बाळाला डी.टी.पी , पोलिओ , गोवर आणि व्हिटॅमिन A यांचे बूस्टर डोस दिले जातात. टायफॉईड चा दुसरा डोस बाळ २ वर्षाचे झाल्यावर दिला जातो.
अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर बाळाला केले जाणारे लसीकरण
बाळाला ३० महिने पूर्ण झाले म्हणजे अडीच वर्षे पूर्ण झाले कि व्हिटॅमिन A चा तिसरा डोस तोंडावाटे दिला जातो.
व्हिटॅमिन A चा हा डोस बाळ पाच वर्षाचा होईपर्यंत प्रत्येक सहा सहा महिन्यांनी बाळाला दिला जातो.
पाच वर्षे पूर्ण झाल्यावर बाळाला दिले जाणारे लसीकरण
पाच ते सहा वर्षे पूर्ण झाल्यावर डी.टी.पी चा बूस्टर डोस दंडाच्या वरच्या बाजूला दिला जातो.
दहा ते सोळा वर्षे पूर्ण झाल्यावर बाळाला दिले जाणारे लसीकरण
१०-१६ वर्षे पूर्ण झाल्यावर बाळाला धनुर्वाताचे इंजेक्शन दिले जाते.