डिलिव्हरीमध्ये पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी?(How to take care of stiches in delivery?)

Spread the love

 

बाळंतपणात पडणारे टाके Stiches During Delivery:

सिझेरियन डिलिव्हरीमध्ये पोटाला आणि बऱ्याचदा नॉर्मल डिलिव्हरीमध्ये योनीमार्गात टाके पडतात. नॉर्मल डेलिव्हरीमध्ये योनीमार्गाची त्वचा हलकीशी फाटते. बसताना किंवा चालताना यावर दाब पडून अजून जास्त फटू शकते आणि इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते . या दोन्ही गोष्टी टाळल्या जाव्यात यासाठी नॉर्मल डेलिव्हरीनंतर योनीमार्गात टाके घातले जातात.  सिझेरिअन किंवा नॉर्मल डेलिव्हरीमध्ये पडलेल्या टाक्यांची यथायोग्य काळजी घेणे खूप आवश्यक असते. योग्य प्रकारे काळजी घेतली गेली तर हे टाके लवकर भरून येतात आणि वेदना , सूजही लवकर कमी येतात. 

डेलिव्हरीदरम्यान पडलेले टाके कधीपर्यंत भरून येतात ?

नॉर्मल डेलिव्हरीमध्ये घेतलेले टाके भरण्यास कमी कालावधी लागतो . योग्य प्रकारे काळजी घेतली तर हे टाके २-३ आठवड्यात भरून येतात. सिझेरिअन डेलिव्हरीमध्ये घेतलेले टाके हे खोलवर असतात त्यामुळे ते भरण्यास साधारणतः ४-६ आठवडेही लागू शकतात. हा कालावधी प्रत्येक स्त्री साठी वेगवेगळा असू शकतो .  पहिल्या २ महिन्यांपर्यंत या टाक्यांमुळे वेदना होतात , खाज येते अश्यावेळी योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते . या लेखामध्ये डेलिव्हरीमध्ये पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

How to take care of Stiches in delivery

डिलिव्हरीमध्ये पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी?(How to take care of stiches in delivery?)

 

१)सिझेरिअनच्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी ?

पहिल्या १ ते २ आठवड्यापर्यंत टाके पडलेला भाग हा कोणतेही तीव्र केमिकल असलेला साबण लावून धुवू नये. साबणामुळे ती जागा कोरडी पडते आणि खाज हि येण्याची शक्यता असते. स्वच्छ पाण्याने टाके घेतलेली जागा स्वच्छ करावी आणि त्यानंतर कोरड्या सुती आणि स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावे. डॉक्टरांनी दिलेली क्रीम किंवा पावडर असेल तर ती लावावी. टाके घेतलेली जागा कोरडी आणि स्वच्छ राहील याकडे लक्ष द्यावे. सतत टाक्यांना हात लावू नये.
पोटाला पडणाऱ्या टाक्यांवर आपल्या हालचालीमुळे किंवा कामामुळे दाब पडण्याची शक्यता असते. त्यामुळे सिझर झाल्यानंतर ६ आठवडे तरी जिने चढउतार करणे, जड वस्तू उचलणे, खाली वाकणे, बसताना पोटावर दाब पडेल असे बसने किंवा झोपणे किंवा पोटाचे मालिश करणे टाळावे. पोटावर दाब पडेल किंवा ताण येईल अशी कोणतीही कमी टाके पूर्णपणे भरून येईपर्यंत करू नयेत. टाके भरून यायला लागले कि थोडी खाज उठते अश्यावेळी नखे न लावता हलका हात फिरवावा.

२)योनीमार्गात पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी?

१. डिलिव्हरीनंतर पहिल्या सव्वा ते दीड महिन्यापर्यंत रक्तस्त्राव होत असतो जर टाके असतील तर सॅनिटरी पॅडचाच वापर करावा आणि प्रत्येक २ तासांनी पॅड बदलावे.
२. लघवी किंवा शौचाच्या वेळी जास्त जोर देऊ नये.
३. साबणाचा वापर करू नये.
४. खूप गरम किंवा थंड पाणी टाके पडलेली जागा स्वच्छ करण्यासाठी वापरू नये. कोमट पाण्याचाच वापर करावा.
५. पाण्यामध्ये कडुलिंबाची पाने किंवा डेटॉल टाकून त्या पाण्याने ती जागा धुवावी.
६. बसताना किंवा उठताना टाक्यांवर ताण पडेल अश्याप्रकारे बसू नये.
७. टाके जरी योनीमार्गात असतील तरीही जाड वस्तू उचल्याने ताण पडू शकतो त्यामुळे जड वस्तू उचलले टाळावे . पायऱ्या चढउतार करू नये .
८. बद्धकोष्टता होऊ नये यासाठी भरपूर पाणी प्यावे कारण शौचास साफ होत नसेल तर पोटावर ताण पडतो व टाक्यांची जखम वाढण्याची शक्यता असते.
९. टाके पडलेली जागा नेहमी स्वच्छ आणि कोरडी राहील याकडे लक्ष द्यावे.
१०. थोडीही खाज किंवा जखम चिघळयासारखी वाटत असेल, घाण वास येत असेल किंवा रक्त येत असेल तर लगेच डॉक्टरांना भेटावे.

साधारणपणे योनीमार्गातील टाके ३-४ आठवड्यात आणि पोटावरील टाके एक ते दीड महिन्यात भरून येतात. यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर डॉक्टरांना जरूर भेटावे.

डेलिव्हरीदरम्यान पडलेल्या टाक्यामुळे होणाऱ्या वेदनांपासून अराम देण्यासाठी उपाय 

१. योनीमार्गात पडलेल्या टाक्यांमुळे वेदना होत असतील किंवा खाज येत असेल तर अश्यावेळी त्याठिकाणी कोमट पाण्याचा शेक जरूर द्यावा . हा शेक देण्यासाठी टबमध्ये कोमट पाणी भरून त्यामध्ये बसावे . वेदनांपासून अराम मिळतो . 

२. आहारामध्ये भरपूर पाणी घ्यावे ,ज्यामुळे बद्धकोष्टता होणार नाही . सौचास सुलभ होत नसेल तर पोटावर किंवा योनीमार्गात पडणाऱ्या दाबामुळे या वेदना वाढू शकतात. लघवी किंवा सौचास करून झाल्यानंतर तो भाग स्वच्छ आणि कोरडा राहील याकडे विशेष लक्ष द्यावे. 

३. टाळ्यांमुळे होणाऱ्या वेदना खूप जास्त असतील किंवा असह्य होत असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनाशामक औषधे घेऊ शकता. 

४. पोटावर पडलेल्या टाक्यांवर सूज जाणवत असेल किंवा वेदना होत असतील तर त्या ठिकाणी बर्फाचा शेक द्यावा . ज्यामुळे सूजही उतरते आणि वेदनाही कमी होण्यास मदत होते. 

५. उठ बस करताना योनीमार्गातील किंवा पोटावरील टाक्यांवर दाब पडणार नाही याकडे लक्ष द्यावे. जड वस्तू उचलू नये शिवाय पायर्याही चढउतर करू नये . 

६. जेवढा शक्य होईल तेवढा अराम करावा.

टाके लवकर भरून येण्यासाठी उपाय

शिरीरावर झालेली कोणतीही जाखम लवकर भरून येण्यासाठी गरज असते ती पौष्टिक आहार आणि पुरेसा अराम करण्याची. डेलिव्हरीदरम्यान आईच्या शरीराची बरीच झीज झालेली असते , अशक्तपणा आलेला असतो. अश्या दरम्यान टाके लवकर भरून यावेत यासाठी आईने पौष्टिक, आहार घेणे आवश्यक असते. डिलिव्हरी झाल्यानंतर किमान पहिल्या दीड महिन्यांपर्यंत भरपूर अराम करावा . जड वस्तू उचलणे , भरभर चालणे , टाक्यांवर दाब पडेल अश्या प्रकारे ऊठ-बस करणे , पायऱ्या चढउतर करणे टाळावे . टाक्यावर जर सतत दाब पडत असेल तर जखम चिघळून टाके भरून येण्यास वेळ लागू शकतो.

Frequently Asked Questions (FAQ)

)नॉर्मल डिलिव्हरीमध्ये टाके दुखतात का?

होय,नॉर्मल डिलिव्हरीमध्ये प्रसूती झाल्यावर लगेचच योनीमार्गात टाके घातले जातात आणि ते घालताना स्त्रियांना खूप वेदना देखील होतात. परंतु त्यांनी नुकत्याच एका बाळाला जन्म दिलेला
असतो,त्यामुळे त्या आनंदापुढे त्यांना या वेदना जाणवत नाहीत.

 

)योनीमार्गात जर टाके असतील तर किती वेळ  झोपावे?

जर योनीमार्गात टाके घातले असतील तर पहिल्या २४ तासांमध्ये खूप जास्त विश्रांतीची गरज असते. जर जास्त वेळ बसले तर टाक्यांवर ताण येऊ शकतो.

 

)टाके विरघळत आहेत हे कसे ओळखावे?

साधारणपणे टाके हे धाग्याने शिवलेले असतात. ते धागे हळूहळू दिसेनासे झाले की हळूहळू टाके विरघळत आहेत हे ओळखावे.

 

)जर योनीमार्गात टाके असतील तर तुम्ही अंघोळ करू शकता का?

होय,जरी योनीमार्गात टाके पडले असतील तरी रोज अंघोळ करणे आवश्यक असते. अंघोळ करताना टाके पडलेली जागा कोमट पाण्याने धुवावी. तिथे साबणाचा वापर करू नये. रोज स्वच्छ अंघोळ केल्यामुळे तिथे इन्फेकशन होण्याचे चांसेस कमी होतात.

 

तर मी आज तुम्हाला डिलिव्हरी मध्ये पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी

तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.  .

डिलिव्हरीनंतर मासिक पाळी कधी येते ?

डिलिव्हरीनंतर लैंगिक संबंध कधी ठेवावेत?

बाळंपणानंतर आईची काळजी कशी घ्यावी? 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *