बाळ पालथे / पलटी कधी होते ? When Do Babies Start Rolling Over ?
प्रत्येक पालकांना बाळाच्या जन्मापासूनच त्याच्या प्रत्येक गोष्टींचे कुतूहल , कौतुक आणि उत्सुकता असते . बाळ कधी पालथा होणार, बसायला शिकणार , रांगणार कधी बोलणार या सर्व गोष्टींची त्यांना उत्सुकता लागलेली असते . बाळाचे हे सर्व विकासाचे टप्पे योग्य प्रकारे आणि लवकरात लवकर होण्यासाठी ते अपार कष्ट हि करत असतात.बाळाचे पालथे होणे म्हणजेच पथावरून पोटावर येणे आणि परत पोटावरून पाठीवर होणे हा त्याच्या शारीरिक विकासाचा सर्वात महत्वाचा टप्पा असतो आणि या बाळाच्या गोंडस हालचालीची प्रत्येक आईबाबा आतुरतेने वाट पाहत असतात.
बाळाने मान व्यवस्थित धरली कि त्याला आपले डोके वर उचलून इकडे तिकडे पाहण्याची क्षमता येते , त्यानंतर हळू हळू बाळाला पाठीवर झोपवल्यास एका बाजूवर वळून पोटावर येण्याचा प्रयत्न करते आणि त्यानंतर स्वतःहून वळून पाठीवर झोपू शकते . बाळाच्या या क्रियेला पालथे होणे किंवा पलटी मारणे असे म्हणतात.
आजच्या या लेखामध्ये आपण सविस्तररित्या जाणून घेणार आहोत कि बाळ पालथे कधी होते, पालकांनी बाळ पालथे पडावे यासाठी काय प्रयत्न करावेत आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी . सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
बाळ कधी पालथे (Roll Over) होते ? What age do babies start rolling over ?
६ महिन्याच्या आसपास बाळाचे त्याच्या मानेवर उत्तम प्रकारे नियंत्रण येते . त्यानंतर सातव्या पाहिन्यापर्यंत बाळ एका बाजूला होऊन हळू हळू पोटावर आणि पाठीवर होण्यास शिकते .
काही बाळ या आधीही पालथे होतात पण ज्या बाळांचे वजन थोडे जास्त असते किंवा बाळ ९ महिन्याच्या आधी जन्माला आले असेल तर थोडा वेळ लागू शकतो .प्रत्येक बाळ वेगळा आहे आणि प्रत्येक बाळाचा विकास वेगवेगळ्या गतीने होत असतो , त्यामुळे आपल्या बाळाची दुसऱ्या बाळासोबत कधीच तुलना करू नये आणि बाळाला जर पालथे हिण्यास उशीर होत असेल तर काळजी न करता पुढे दिलेल्या टिप्स वापराव्यात आणि बाळाला पालथे होण्यास प्रोत्सहीत करावे.
बाळाने लवकर पालथे व्हावे यासाठी काय प्रयत्न करावेत ? How To Help Babies To Roll Over Early ?
प्रत्येक पालकांना आपल्या बाळाच्या वाढीबद्दल आणि विकासाबद्दल खूप कौतुक असते आणि तेवढीच काळजीही असते. बाळाने लवकर पालथे व्हावे , रंगावे , चालावे , बोलावे म्हणून ते सतत प्रयत्न करत असतात .
१. बाळाने लवकर पालथे व्हावे यासाठी बाळाला जास्तीत जास्त त्याच्या पोटावर (Tummy Time) झोपवावे , जेव्हा बाळ पोटावर झोपतो तर त्यावेळी बाळाच्या मानेचे स्नायू मजबूत बनतात शिवाय हातावर भार देऊन बाळ त्याची छाती वर उचलण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे त्याच्या हाताचे स्नायूही मजबूत होतात आणि त्यामुळे बाळाचा शारीरिक विकास उत्तम प्रकारे होण्यास मदत होते .
२. दिवसातून कमीत कमी २ वेळा तरी बाळाचे एका चांगल्या तेलाने मालिश करावे. मालिश केल्याने शरीरातील रक्ताभिसरण उत्तम राहते, हाडे आणि मांसपेशी मजबूत बनतात आणि बाळाची वाढ आणि विकास योग्य प्रकारे होण्यास मदत होते.
३. बाळाला पाठीवर झोपवले असता याच्या एका बाजूला खेळणे धरावे म्हणजे ते खेळणे घेण्यासाठी किंवा पाहण्यासाठी बाळ एका बाजूला होण्याचा प्रयत्न करेल. आणि असे करत करतच बाळाला त्याच्या शरीराची होणारी हालचाल आणि पोटावर होण्यासाठी लागणारी ताकद आणि पद्धत समजेल ज्यामुळे बाळ पलटी मारण्यास शिकेल.
४. बाळ एका बाजूला झाले असता त्याच्या पाठीला थोडा आधार देऊन त्याचा वरचा पाय पुढे टाकून हाताने हलकेसे पुढे ढकलण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे बाळ त्याच्या पोटावर येईल आणि असे सतत केले तर हळू हळू बाळ स्वतःहून त्याच्या पोटावर पालथे होण्यास लवकर शिकेल.
बाळाला पालथे होण्यास शिकवत असताना काय काळजी घ्यावी ? Tips While Helping Baby To Roll Over .
बाळाला पालथे होण्यास शिकवत असताना पुढे दिलेल्या काही टिप्स जरूर लक्षात घ्याव्यात.
१. सुरुवातीला बाळाला त्याच्या पोटावर झोपणे त्रासदायक वाटेल आणि बाळ रडायला लागेल अश्यावेळी बाळाला जास्त वेळ पोटावर झोपवू नये . हळू हळू जसा सराव होईल त्यानंतर बाळाला पालथे होणे सोपे वाटेल.
२. बाळाला त्याच्या पोटावर झोपवत असताना मऊ अंथरुणावरच झोपवावे म्हणजे त्याच्या छातीवर खूप दाब पडणार नाही आणि बाळाने डोके खाली केले असता नाकालाही इजा होणार नाही .
३. बाळाला दूध पाजून झाल्यावर लगेचच पोटावर झोपवू नये त्यामुळे बाळ उलटी करू शकते . अर्धा तासाचा वेळ जाऊ द्यावा आणि मग पालथे होऊ द्यावे .
४. बाळ जर मान नीट धरत नसेल तर बाळाला खूप जास्त वेळ पालथे करू नये आणि बाळाचे नाक दाबले जाणार नाही याचीही काळजी घ्यावी.
५. बाळाला पालथे होण्यास प्रोत्साहित करण्यासाठी पालथे झाल्यास त्याच्या सोबत भरपूर बोला , वेगवेगळी खेळणी दाखवा , त्याच्या समोर रंगीबेरंगी पुस्तके ठेवा.
या लेखामधून मी तुम्हाला बाळ कधी पालथे होण्यास शिकते आणि लवकर पलटी होण्यासाठी पालकांनी काय काळजी घ्यावी आणो कोणत्या टिप्स वापराव्यात याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
अधिक वाचा
बाळ मान कधी धरते ? लवकर मान धारावी म्हणून काय प्रयत्न करावेत ?
बाळ कधी रंगायला लागते ? पालकांनी काय प्रयत्न करावेत ?
Pingback: बाळ मान कधी धरते ? लवकर मान धरण्यासाठी काय करावे ? – बालविश्व मराठी BABYWORLD
Pingback: बाळाचे गुडघ्यावर रांगणे ?(Crawling) बाळाला रांगायला कधी आणि कसे शिकवावे ? – बालविश्व मराठी BABYWORLD