when do babies start crawling

When Do Babies Start Crawling ? बाळाचे गुडघ्यावर रांगणे ? बाळाला रांगायला कधी आणि कसे शिकवावे ?

Spread the love
बाळाचे गुडघ्यावर रांगणे ? बाळाला लवकर रंगायला कसे शिकवावे ? When Do Babies Start Crawling ? 

प्रत्येक पालकांना बाळाच्या जन्मापासूनच त्याच्या प्रत्येक गोष्टींचे कुतूहल, कौतुक आणि उत्सुकता असते . बाळ कधी पालथा होणार, बसायला शिकणार, रांगणार कधी बोलणार कधी या सर्व गोष्टींची त्यांना उत्सुकता लागलेली असते. बाळाचे हे सर्व विकासाचे टप्पे योग्य प्रकारे आणि लवकरात लवकर होण्यासाठी ते अपार कष्ट हि करत असतात. प्रत्येक पालकांना आपल्या बाळाच्या विकासाबद्दल खूप उत्सुकता असते. बाळाच्या विकासाचे हे टप्पे पाहण्यासाठी ते आतुर असतात. बाळाचा विकास हा त्याच्या सुदृढ आणि सुयोग्य वाढीवर अवलंबून असतो. बाळ जेवढा जास्त ऍक्टिव्ह आणि निरोगी असेल तेवढ्या लवकर बाळाचा शारीरिक आणि मानसिक विकास लवकर होतो.

जे बाळ ९ महिन्याच्या आधी जन्माला आले आहे किंवा जन्मतःच वजन कमी होते किंवा काही आजार असेल तर बाळाचा शारीरिक विकास आणि हे विकासाचे टप्पे गाठण्यासाठी उशीर लागू शकतो. या लेखामध्ये आपण बाळ कधी रांगायला शिकते आणि लवकर रांगायला शिकण्यासाठी काय टिप्स कराव्यात याबद्दल सविस्तर माहिती सांगितली आहे.  

 • बाळ कधी गुडघ्यावर रांगते ? When Do Baby Start Crawling ?
 • साधारणतः ६-९ महिन्याच्या दरम्यान बाळ गुडघ्यावर रांगायला सुरुवात करते . काही बाळं त्या आधीही रांगतात , काहींना ९ महिन्यांपेक्षा जास्तही वेळ लागू शकतो तर काही बाळं गुडघ्यावर न रांगता उठून बसायला किंवा चालायलाही लागतात.
 • काही बाळाच्या बाबतीमध्ये बाळ आधी पालथे पडायला लागले कि त्यानंतर हळू हळू  रंगायला लागते तर काही बाळ बसायला शिकल्यानंतर रंगू लागतात . प्रत्येक बाळ हा वेगळा आहे आणि प्रत्येक बाळाचा विकासही वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो त्यामुळे पालकांनी इतर बाळांसोबत आपल्या बाळाची तुलना करू नये. 
 • जर बाळ व्यवस्थित पालथे होत असेल,पुढे सरकत असेल किंवा बसत असेल पण रांगत नसेल तर पालकांनी जास्त काळजी करू नये. 
when do babies start crawling
 • बाळाला रंगायला कधी शिकवावे ?
 • बाळ जर आधाराशिवाय बसू शकत असेल , पोटावर झोपवले असता त्याची मान वर उचलून इकडे तिकडे पाहत असेल आणि हातावर भार देऊन त्याची छाती वर उचलू शकत असेल आणि पुढे सरकण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही बाळाला रंगण्यास प्रोत्सहीत करू शकता, पुढील काही टिप्स वापरून. 
 • बाळाला गुडघ्यावर रांगायला शिकवण्यासाठी टिप्स
 • बाळाला रांगायला शिकवण्यासाठी जास्त प्रयत्न करण्याची गरज पडत नाही , ते आपोआपच जशी पालथी होऊन पुढे सरकायला लागतात तशी रांगायलाही शिकतात . पण जर या मध्ये थोडा उशीर होत असेल तर पालकांनी बाळाला तशी मदत करणे गरजेचे असते.
 • १. बाळाला जास्तीत जास्त त्याच्या पोटावर झोपवावे . जेव्हा बाळ पोटावर झोपलेला असतो तेव्हा हातावर भार देऊन गुडघे वाकवून शरीर वर उचलण्याचा प्रयत्न करते ज्यामुळे त्याच्या हाताचे आणि पायाचे स्नायू आणि हाडे मजबूत बनवतात व हळू हळू रंगायलाही शिकतात.
  २. दिवसातून २ वेळा बाळाचे उत्तम तेलाने मालिश करावे .
  ३. बाळाच्या आसपास त्याच्या आवडीची खेळणी काही अंतरावर ठेवावीत, म्हणजे ते घेण्यासाठी बाळ पुढे सरकण्याचा प्रयत्न करेल .
  ४. बाळाला त्याच्या पोटावर झोपवले असता त्याच्या पोटाखाली हात घालून हलकंसं वर उचला ज्यामुळे बाळाला त्याच्या शरीराचे वजन पेलवण्यासाठी थोडा आधार मिळेल व गुडघे वाकवून हातावर उभा राहील .

५. याशिवाय बाळाच्या पोटाखाली थोडी उंच उशी ठेऊ शकता ज्यामुळे बाळाला वर उठणे सोपे जाईल .
६. बाळ पालथे झाल्यास थोड्या अंतरावर उभे राहून प्रेमाणे बाळाला तुमच्या कडे बोलवा म्हणजे बाळ पुढे येण्यासाठी गुडघ्यावर रांगण्याचा प्रयत्न करेल .

गुडघ्यावर रांगण्यामुळे बाळाला होणारे फायदे 

१. मुलांच्या स्नायूंमध्ये आणि हाडांमध्ये बळकटी येते .
२. गुडघ्यावर रांगल्याने शरीराचे वजन आणि तोल सावरण्यास मुलं लवकर शिकतात.
३. गुडघ्यावर रांगल्याने मुलं स्वतःहून आधाराशिवाय लवकर चालायला शिकतात.

बाळ कधी मान धरते , पालथे होते , बसायला शिकते  , बाळाचे चालणे हे जाणून घेण्यासाठी लिंकवर क्लिक करा.

या लेखामधून मी तुम्हाला बाळ कधी रांगायला शिकते आणि लवकर रांगायला शिकण्यासाठी काही टिप्स याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *