मलेरिया – लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना Malaria in Children Prevention & Treatment

Spread the love
लेरिया ( हिवताप ) – लक्षणे, कारणे आणि उपचार Malaria in Children Prevention & Treatment 

मलेरिया हा डासांमुळे पसरणारा एक सामान्य रोग आहे. जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांपैकी हे एक कारण आहे. मलेरियाचे योग्य वेळेत निदान झाले आणि योग्य ते उपचार मिळाले तर हा रोग पूर्णपणे बारा होतो परंतु उपचारांसाठी उशीर झाल्यास गंभीर समस्या उदभवू शकतात.

malaria in children

मलेरिया हा एक प्राणघातक संसर्गजन्य रोग आहे जो बाधित डासांत असणाऱ्या प्लेजमोडीयम परजीवी मुळे होतो. असा बाधित डास चावल्यानंतर हे परजीवी त्या व्यक्तीच्या यकृतात प्रवेश करतात आणि रक्तातील लाल पेशी बाधित करतात. याला हिवताप असेही म्हणतात.

मलेरिया होण्याची कारणे Causes of Malaria 

साठलेले पाणी , अस्वच्छ परिसर या ठिकाणी अश्या डासांची संख्या अधिक वेगाने वाढते आणि मलेरियाची साथ पसरते. आई जर गरोदर असेल तर तिच्या मार्फत बाळालाही मलेरियाची लागण होते.
मलेरियाची लक्षणे
१. थांबून थांबून ताप येणे , थंडी वाजून येणे.
२. डोकेदुखी, उलट्या, जुलाब होणे.
३. शरीरात वेदना होणे.
४. धाप लागणे.

५. कावीळ ची लक्षणे म्हणजेच डोळे आणि नखानाचा रंग पिवळसर होणे आणि अतिशय पिवळ्या रंगाची लघवी होणे. 

६. अशक्तपणा जाणवणे. 

मलेरिया ची लक्षणे सामान्यतः फ्लू किंवा इतर विषाणू संक्रमित लक्षणासारखी असल्यामुळे या आजाराचे निदान करणे कठीण जाते. 

मलेरियावर उपचार Treatment on Maleria

मलेरियावर फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार घेणे आवश्यक असते. मलेरियाचे ऐकून ५ प्रकार आहेत. कोणत्या प्रकारच्या मलेरियाची लागण झाली आहे हे डॉक्टर ब्लड टेस्ट करून त्यानुसा योग्य ते औषादोपचार दिले जातात. मलेरियाची लागण झाल्यास लवकरात लवकर वैद्यकीय मदत घेणे गरजेचे असते कारण यामुळे माणसांच्या जीवाला धोकाही असतो.

मलेरिया होऊ नये या साठी काही प्रतिबंधात्मक उपाययोजना जरूर करू शकता . Preventive Tips For Malaria

१. घराच्या आसपास कुठेही पाणी साठणार नाही याची काळजी घेणे. परिसर स्वच्छ ठेवणे.

मलेरियासाठी कारणीभूत असणाऱ्या डासांच्या माडांच्या उत्पत्तीचे प्रमाण हे साठलेल्या पाण्यामध्ये जास्त असते , जरी ते पाणी स्वच्छ असेल तरीही . त्यामुळे आसपास कुठेही पाणी जास्त काळासाठी साठवून ठेऊ नये. वेळोवेळी पाणी बदलावे म्हणजे या डासांची उत्पत्ती टाळली जाईल. 

 
२. डासनाशक साधनांचा व मच्छरदाणीचा वापर करणे.

बाजारामध्ये डासांपासून संरक्षणात्मक क्रीम आणि बरीच साधनेही मिळतात. याशिवाय मच्छरदाणीचाही वापर करावा, घराची दारे खिडक्या याना जाळ्या लावून घ्याव्यात. 

३. लहान मुलांना अंगभर कपडे घालणे.

जेवढे शक्य होईल तेवढे अंग झाकले जाईल याप्रकारे लहान मुलांना कपडे घालावेत, याशिवाय हे कपडे सैलसर असावेत. उघड्या अंगावर डास खूप चावतात. 

 
४. डास चावण्याचे प्रमाण संध्याकाळी जास्त असते अश्यावेळी घराचे दारे खिडक्या लावून ठेवणे.

दिवसभरापेक्षा सध्यांकाळी किंवा रात्री डास चावण्याचे प्रमाण जास्त दिसून येते. अश्यावेळी लहान मुले बाहेर खेळत असतील तर त्यांना रोल ऑन किंवा इतर डास न चावण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या क्रिम लावणे आणि संध्याकाळी घराचे दारे आणि खिडक्या लावून घ्याव्यात ज्यामुळे घरामध्ये डासांचा शिरकाव होणार नाही.   

५. मलेरियाची साथ आली असेल तर अधिक काळजीपूर्वक राहणे.

 तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये कोणालाही मलेरिया म्हणजेच हिवताप सदृश लक्षणे दिसत असतील तर योग्य ती काळजी घेणे.  नाही किंवा डास चावणार नाहीत याची खबरदारी घेणे गरजेचे आहे . याशिवाय जर मलेरिया, फ्लू किंवा कावीळ सदृश कोणतेही लक्षण दिसत असेल तर लगेच वैद्यकीय मदत घेणे . 

 
६. ताप येत असेल तर घरगुती उपाय न करता वैद्यकीय सल्ला घेणे.

मलेरिया या आजारावर जर वेळेमध्ये निदान होऊन उपचार झाले तर तो पूर्णपणे बारा होतो पण थोडा जरी उशीर झाला तर हा आजार प्राणघातकही ठरू शकतो. लहान मुलांच्या बाबतीमध्ये याचा धोका थोडा जास्त असतो. त्यामुळे विशेष काळजी घेणे आवश्यक असते.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *