बाळाला पोटामध्ये गॅस होण्याची कारणे, लक्षणे आणि घरगुती उपचार Gas Problem in Babies

Spread the love
बाळाच्या पोटामध्ये गॅस का होतो ? कारणे, लक्षणे आणि उपचार Gas Problem in Babies

लहान बाळांच्या पोटामध्ये गॅस होणे हे खूप सामान्य आहे, बाळाची पचनशक्ती कमकुवत असते त्यामुळे आतड्यांमध्ये चांगले जिवाणू अजून विकसित झालेले नसतात शिवाय स्तनपान किंवा बाटलीने दूध पितानाही अतिरिक्त हवा पोटामध्ये घेल्याने किंवा दुधामध्ये असणारे घटक नीट न पचल्यानेही बाळाला गॅस होऊ शकतो. लहान बाळासाठी गॅसमुळे होणाऱ्या वेदना ह्या खूप असह्य असतात शिवाय बाळ त्याला काय होत आहे हे सांगू हि शकत नाही त्यामुळे काही लक्षणे पाहून बाळाच्या पोटामध्ये गॅस झाला आहे कि नाही हे जाणून घेऊ शकता.

या लेखामध्ये लहान बाळांच्या पोटामध्ये गॅस का होतो, बाळाच्या पोटामध्ये गॅस झाला आहे हे कसे ओळखावे आणि त्यावर काय उपाय करावेत आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ज्यामुळे बाळाला होणार हा त्रास कमी होईल आणि बाळाला अराम मिळेल याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. 

पोटामध्ये गॅस झाल्याची लक्षणे

१. बाळ जर वारंवार चुळबुळ करत असेल किंवा अंग ताठ करत असेल .
२. बाळाला उभे पकडल्यास जर पाठीची कमान करत असेल.
३. आवळत असेल किंवा ताणून धरत असेल.
४. स्तनपान घेण्यास नकार देत असेल किंवा काहीच खात पीत नसेल.
५. सतत रडत असेल आणि त्याचे पाय पोटाजवळ धरत असेल.
६. रडताना जर बाळाचा चेहरा किंवा शरीर लाल होत असेल तर बाळाला पोटामध्ये गॅसमुळे  वेदना होत आहेत असे आपण म्हणून शकतो.

gas problem in babies
बाळाच्या पोटामध्ये गॅस होण्याची कारणे

१. विकसित न झालेली पचन संस्था.
नवजात बाळाची पचन संस्था खूप नाजूक असते ती विकसित होत असते त्यामुळे पोटामध्ये गेलेले अन्नपदार्थ कसे पचवायची हे ते अजून शिकत असते आणि या प्रक्रियेत काही न पचलेल्या अन्नघटकांमुळे गॅस होऊ शकतो.
२. अतिरिक्त हवा पोटामध्ये जाणे .
बाळ स्तनपान किंवा बाटलीने दूध पीत असताना स्तनांची किंवा बाटलीच्या निप्पल ची पकड जर चुकीची असेल तर बाळाच्या पोटामध्ये अतिरिक्त हवा जास्त जाते आणि गॅस होतो.
३. बाळाचे सतत रडणे.
बाळ जर खूप जास्त रडत असेल किंवा जास्त वेळपर्यंत रडत असेल तर रडताना तोंडावाटे हवा बाळाच्या पोटामध्ये जाते आणि गॅस होऊ शकतो.
४. बाळाला खूप जास्त दूध पाजणे.
लहान बाळाला अजून भुकेचे ज्ञान आलेले नसते. आपले पोट भरले आहे कि नाही हे त्याला समजत नाही अश्यावेळी बाळाने जर खूप जलद गतीने आणि जास्त दूध पिले तर ते नीट पचत  नाही आणि गॅस होण्याची शक्यता असते.
५. स्तनपान करणाऱ्या आईचा आहार.
आई जो आहार घेणे तोच बाळाला दुधमार्फ़त मिळत असतो अश्यावेळी बाळाची नाजूक पचनशक्ती पाहून आईने तिच्या आहारामध्ये गॅस निर्माण करणारे, तेलकट, आंबट किंवा मसालेदार पदार्थांचा समावेश करावा. असे पदार्थ बाळाला पचवण्यासाठी काही वेळ जावा लागतो सुरुवातीला यामुळे बाळाच्या पोटामध्ये गॅस होऊ शकतो. गॅस निर्माण करणारे किंवा पचनास थोडे जाड असणारे अन्नपदार्थ आहारात कमी प्रमाणात घ्यावेत 

गॅस होण्याच्या समस्यांवर घरगुती उपचार 

१. बाळाला दूध पाजतानाची स्थिती योग्य असावी.

बाळ जर स्तनपान घेत असेल तर स्तनांची पकड योग्य आहे कि नाही ते पाहावे. बाटलीने दूध देत असाल तर बाटलीचे निप्पल बाळाच्या वयानुसार हे योग्य आकाराचे असावे. बाळाला दूध पाजताना बाळाचे डोके हे नेहमी ३० डिग्री वरती असेल याची खात्री करून घ्यावी. बाटली  धरताना हि थोडीशी वाकडी धारा म्हणजे दूध बाटलीच्या निप्पल जवळ साठणार नाही आणि बाळाला हे पटपट प्यावे लागणार नाही. बाळाला खूप जास्त भूक लागू देऊ नका जेव्हा खूप जास्त भूक लागते तेव्हा बाळ पटापट दूध पिते ज्यामुळे गॅस होतो.

२. दूध पाजून झाले कि बाळाला ढेकर जरूर काढा.
दूध पीत असताना बाळाच्या पोटामध्ये जर अतिरिक्त हवा पोटामध्ये गेली असेल तर ती ढेकरेच्या स्वरूपात बाहेर पडते त्यामुळे दूध पाजून झाले कि बाळाला ढेकर जरूर काढा. यासाठी बाळाला १०-१५ मिनिटे खांद्यावर उभे पकडा पाठीवर हळुवारपणे थोपटा.

३. बाळाला जास्त वेळ रडू न देणे.
बाळ का रडते आहे याचे कारण समजून घेऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न करा , त्याचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करा म्हणजे रडताना बाहेरील हवा पोटामध्ये जाणार नाही.

४. बाळाच्या पोटाचा मसाज.
बाळाच्या पोटातील गॅस कमी करण्यासाठी दिवसातून ३-४ वेळा पोटाचा योग्य प्रकारे मालिश करा . हे मालिश करण्यासाठी बाळाला पाठीवर झोपावं आणि बाळाच्या बेंबी भोवती हाताच्या ४ बोटानी घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने हलकेसे दाबत गोलाकार मालिश करा . या शिवाय बाळाचे पाय त्याच्या पोटावर हळुवार दाबल्यास किंवा सायकल चालवल्याप्रमाणे पायांची हालचाल केल्यासही पोटातील गॅस बाहेर पडतो.

५. हिंगाचा प्रयोग करा.
बाळ ६ महिन्यापेक्षा लहान असल्यास बाळाच्या बेंबीवर थोड्याश्या कोमट पाण्यात हिंगाची पेस्ट करून ती लावा , बाळ वरचा आहार घेत असेल तर आहारामध्ये हिंगाचा समावेश करा पोटातील गॅस वर अराम मिळतो.

६. दिवसातून किमान १-२ वेळा बाळाला उत्तम तेलाने मालिश करा आणि नंतर कोमट पाण्याने अंघोळ घाला.

७. बाळाला वारंवार आणि जास्त गॅस चा त्रास होत असेल तर डॉक्टरांच्या मदतीने औषधोपचार करा.

या लेखामधून मी तुम्हाला बाळाच्या पोटामध्ये होणाऱ्या गॅसची कारणे आणि त्यावर असणारे प्रभावी उपाय याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

Frequently Asked Questions (FAQ)

१. बाळाला गॅसचा त्रास कधीपर्यंत होऊ शकतो?

साधारणपणे बाळ स्वतःहून त्याच्या पोटावर येऊ लागले म्हणजेच पालथे पडू लागले कि गॅसचे प्रमाणही कमी होते. काही मुलांमध्ये हा काळ पहिल्या ६ महिन्यांपर्यंतचाही असू शकतो तर ज्या बाळांची पचनशक्ती नाजूक आहे अश्या बाळांमध्ये एक वर्षापर्यंतही वेळ लागू शकतो. बाळाची शारीरिक हालचाल जशी वाढत जाते आणि पचनशक्ती विकसित होते तसे हे प्रमाण कमी कमी होऊ लागते. 

२. गॅस कमी करण्यासाठी कोणते औषध द्यावे?

पोटामध्ये होणाऱ्या या गॅसमुळे बाळाला उलटी, जुलाब होत असेल किंवा बाळ अजिबातच दूध पीत नसेल आणि त्यामुळे बाळाचे वजन वाढ नीट होत नसेल तर बाळाला गॅस कमी करण्यासाठी काही औषधे देणे आवश्यक असते. हि औषधे घेण्यासाठी नजीकच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. जर तुम्ही नियमितपणे या लेखामध्ये सांगितलेले उपाय आणि टिप्स वापरात असाल तर बाळाला गॅस चा त्रास होणार नाही आणि कोणतेही औषध देण्याचीही गरज पडणार नाही.

 

डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि पोटाचा राहिलेला घेर कमी करण्यासाठी उपाय  6 Best Tips To Reduce Weight & Belly Fat after Delivery

लहान मुलांना होणाऱ्या कांजण्या Chickenpox : Symptoms, Causes & Treatment

डिलिव्हरीमध्ये पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी?(How to take care of stiches in delivery?)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *