बाळाच्या विकासाचे टप्पे Baby’s Developmental Milestones – 12 Months प्रत्येक महिन्यात बाळ काय काय करू लागते .

Spread the love
बाळाच्या विकासाचे महत्वपूर्ण टप्पे – प्रत्येक महिन्यात बाळाचा होणार विकास Baby’s Developmental Milestones per Months 

बाळाच्या जन्मानंतर आईबाबांबाना आपल्या बाळाच्या वाढीबद्दल आणि विकासाबद्दल खूप जास्त उत्सुकता असते . बाळाच्या प्रत्येक हालचालीवर त्यांचे बारीक लक्ष असते . बाळाचे पहिले हसणे , हुंकार देणे, मान धरणे, चालणे, बसने, रांगणे, चालणे या सर्व गोष्टींची ते आतुरतेने वाट पाहत असतात. आपलं बाळ हुशार असावं , तंदुरुस्त असावं आणि त्याने त्याच्या विकासाचे सर्व टप्पे अगदी व्यवस्थित आणि वेळेमध्ये पूर्ण करावेत असे त्यांना वाटत असते. आजच्या या लेखामध्ये आपण जन्मानंतर पहिल्या १२ महिन्यांपर्यंत बाळाचा विकास कश्याप्रकारे होत असतो , माहिती बाळाच्या विकासाचे टप्पे काय असतात, कोणत्या महिन्यात बाळ काय काय करायला शिकते याबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहोत. सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.

baby developmental milestones

प्रत्येक महिन्यामध्ये आपला बाळ काय काय करू शकतो , बाळाचा विकास योग्य पद्धतीने होतो आहे कि नाही हे जाणून घेण्यासाठी संपूर्ण माहिती जरूर वाचा . 

१ महिना – पहिल्या महिन्यात बाळाचा विकास First Months Baby Milestones

जन्मानंतर सुरुवातीचे काही आठवडे बाळ खूप जास्त झोपते आणि रडते सुद्धा हे स्वाभाविक आहे .नऊ महिने बाळ आईच्या पोटामध्ये अगदी उबदार वातावरणामध्ये सुरक्षित असते. बाहेरच्या जगामध्ये आल्यानंतर प्रत्येक गोष्ट त्याच्यासाठी नवीन असते पण  हळू हळू बाळ आसपासच्या वातावरणाशी जुळवून घ्यायला लागते आणि बाळाचे रडणे कमी होते. पहिल्या महिन्यांमध्ये बाळ हलणाऱ्या वस्तू किंवा खेळण्यांकडे पाहते , आईचा चेहरा ,आवाज ओळखते . हाताच्या मुठी घट्ट आवळून धरते . मोठ्या आवाजाला दचकते आणि प्रखर प्रकाशाला डोळे बंद करते किंवा मिचकावते. या दरम्यान जरी बाळ खूप जास्त झोपत असेल तरीही प्रत्येक २ तासांनी बाळाला हलकेसे जागे करून आईचे दूध पाजणे आवश्यक असते. बाळाला आईचे दूध पुरेश्या प्रमाणात मिळत असेल तर बाळाची वाढ आणि विकास जलद गतीने होण्यास मदत होते. 

२ महिने – दुसऱ्या महिन्यात बाळाचा विकास Second Month Baby Milestones 

या दरम्यान बाळ तुमच्या आवाजाला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करते , हसते , घरातील किंवा रोज दिसणारी माणसे ओळखायला लागते , मान इकडे तिकडे हलवून आजूबाजूच्या वस्तू , माणसे पाहण्याचा प्रयत्न करते . बाळाच्या हातापायांची हालचालही पहिल्या महिन्यापेक्षा जास्त जाणवते. दुसऱ्या महिन्यात बाळाला भूक लागली कि बाळ वेगळा आवाज काढून रडू लागते त्याच्या रडण्यातील हा बदल त्याच्या आईला बरोबर समजतो. शिवाय बाळ हाताच्या मुठीही तोंडामध्ये घालू लागतो. हलणाऱ्या , आवाज करणाऱ्या वस्तू किंवा खेळणी पाहण्यात बाळाला जास्त मजा येते. 

३ महिना – तिसऱ्या महिन्यात बाळाचा विकास Third Month Baby Milestone

या दरम्यान बाळाच्या हाडांमध्ये आणि स्नायूंमध्ये बऱ्यापैकी बळकटी येते , म्हणजे बाळाला जेव्हा त्याच्या पोटावर झोपवले जाते तेव्हा ते आपली मान व खांदे वर उचलण्याचा प्रयत्न करते . आवाजाच्या दिशेने आपली मान वळवते . त्याच्याशी बोलल्यास किंवा अंगाई म्हटल्यास त्याला ते प्रतिसाद देते आणि आनंदाने हुंकार देते . हातापायासोबत खेळत असताना वेगवेगळे आवाज काढते, बोटे किंवा हात तोंडातही घालू लागते. नवनवीन माणसे, वस्तू आणि खेळणी पाहण्यास बाळाला खूप आवडते. 

४ महिना – चौथ्या महिन्यात बाळाचा विकास Fourth Month Baby Developmental Milestone 

या दरम्यान बाळाच्या विकासामध्ये बरीच प्रगती होते , एखादे खेळणे बाळाच्या पुढे पकडले तर ते घेण्यासाठी हात पुढे करते , हातामध्ये घट्ट धरून ठेवते . आवाजाला खूप छान प्रतिसाद देते . त्याचबरोबर भूक लागली असता, सु शी करायची असेल किंवा आईचा सहवास हवा असेल तर वेगवेगळे संकेत हि द्यायला लागते . या दरम्यान बाळाची दिवसाची झोप थोडी कमी होऊन , रात्रीची सलग आणि गाढ झोप घायला लागते. चौथ्या महिन्यामध्ये बाळ त्याची मान धरू लागते . ६ महिण्यापर्यंत बाळाची मान डगमगते त्यामुळे बाळाला उचलत असताना बाळाच्या मानेला अजूनही आधार देण्याची गरज असते. पहिल्या ३ महिन्यांपेक्षा या महिन्यात बाळाची भूकही वाढते आणि बाळ दूध पिण्यासाठी आईकडे डिमांड करायलाही शिकते. यासाठी वेगवेगळे आवाज काढणे, रडणे किंवा वेगवेगळे हावभाव दाखवते. 

५ महिना – पाचव्या महिन्यात बाळाचा विकास  Fifth Month Baby Developmental Milestone

पाचव्या महिनायामध्ये बाळ हा त्याची मान उत्तम प्रकारे धरू शकत असते . वेगवेगळी रंगीबेरंगी खेळणी त्याला आवडू लागतात . बाहेर फिरायला घेऊन गेल्यास सर्व गोष्टी कुतूहलाने पाहत असते . रोज दिसणारी माणसे आणि नवीन लोक यामधील फरक हळू हळू समजायला लागतो . फुरक्या मारणे , तोंडामध्ये बोट घालून चोखणे , हळू हळू एका बाजूवर होऊन पालथे पडण्याचा हि प्रयत्न करते . पाठीवर झोपण्यापेक्षा उभे पकडले किंवा इकडे तिकडे फिरणे जास्त आवडते. पाचव्या महिन्यामध्ये बाळ हा वरचा आहार खाण्यामध्ये गोडी दाखवते म्हणजे आपण जर बाळाच्या तोंडाजवळ चमचा धरला तर तोंडाचा आ करते, खाण्यासाठी किंवा तोंडामध्ये घालण्यासाठी रडायला लागते. या दरम्यान बाळाला दात येण्याची प्रक्रियाही सुरुवात होते. बाळाचे हिरडे फुगतात त्यामुळे बाळ किरकिर करायला लागते. सतत तोंडामध्ये हात घालण्याचा किंवा चावण्याचा प्रयत्न करते. 

बाळाच्या विकासाचे टप्पे

बाळाचा आहार – डाएट चार्ट

बाळ नेहमी एकाच बाजूला बघते? मान वाकडी आहे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *