Danger Signs In Pregnancy In Marathi गरोदरपणात हि लक्षणे दिसत असल्यास तात्काळ घ्या वैद्यकीय सल्ला

Spread the love

गरोदरपणात हि लक्षणे दिसत असतील तर तात्काळ घ्या वैद्यकीय सल्ला Pregnancy Complications

गर्भावस्थेतील धोकादायक लक्षणे

गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात नाजूक आणि सुखद काळ असतो. अश्या अवस्थेत एखादी छोटीशी चूकही बाळ आणि आई यांच्या जीवाला धोका निर्माण करू शकते. गर्भामध्ये बाळाची वाढ जशी होत जाईल तशी बाळ आणि आई यांच्या सुरक्षिततेची जबाबदारीही वाढत जाते. 

बाळाचा जन्म होईपर्यंत आईच्या आणि पोटामध्ये वाढणाऱ्या गर्भाच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते.
गर्भावस्थेत पुढील काही लक्षणे जाणवत असतील तर तात्काळ डॉक्टरांना भेटावे आणि योग्य त्या तपासण्या आणि औषधोपचार घ्यावेत.

Pregnancy Complications

१. पहिल्या ३ महिन्यांमध्ये सतत मळमळ, उलटी होणे सामान्य आहे पण त्यानंतरही हा त्रास चालू राहिला आणि उलटीचे प्रमाण जास्त असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.गर्भावस्थेत उलटी किंवा जुलाब होण्याचे प्रमाण जास्त असेल तर डिहायड्रेशन होऊ शकते शिवाय अनेमिया होण्याचीही शक्यता असते. गर्भावस्थेत ऍनेमिया होण्याची करणे , लक्षणे आणि उपचार जाणून घेण्यासाठी हि लिंक चेक करा.

 गर्भावस्थेत ऍनिमिया होण्याची लक्षणे कारणे आणि उपचार(Anemia in Pregnancy) 

२. गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीमध्ये योनीतून पाणी किंवा रक्तस्त्राव होणे हे सामान्य आहे पण त्यानंतरही अधिक प्रमाणात असा स्त्राव येत असल्यास डॉक्टरांकडे जाऊन तपासण्या करणे आणि योग्य तो आराम करणे आवश्यक असते.

३. सतत अशक्तपणा, थकवा जाणवत असेल, वारंवार ताप येत असेल , जुलाब होत असतील किंवा ओटीपोटात दुखत असेल तर वेळ न दवडता वैद्यकीय सल्ला घ्यावा.अति अशक्तपणा आणि थकवा हे लोहाच्या कमतरतेची लक्षण आहे . गरोदरपणामध्ये लोहाच्या कमतरतेमुळे गर्भवतीला ऍनेमिया होण्याची शक्यता असते . योग्य वेळी नियादान केले तर आईचे आणि पर्यायाने बाळाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

४. बाळाचे वजन जसे वाढेल तसे आईच्या पायावर सूज येऊ शकते पण जर पहिल्या किंवा दुसऱ्या तिमाही मध्ये हातापायासोबतच चेहऱ्यावरही सूज जाणवत असेल तर रक्तदाब वाढल्याचे हे एक मुख्य कारण आहे,यामुळे बाळ आणि आईला धोका निर्माण होऊ शकतो.

५. गर्भाशयातील बाळाची हालचाल कमी झाल्यासारखी वाटणे.

६. लघवीला जळजळ किंवा शौचास करताना त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना भेटावे. 

७. भूक न लागणे किंवा खाण्याची अजिबातच इच्छा न होणे किंवा झोप न लागणे यापैकी कोणतेही लक्षण गरोदरपणामध्ये जाणवत असेल तर तात्काळ डॉक्टरांची मदत घेणे आवश्यक असते. गर्भात वाढणाऱ्या बाळाच्या सुयोग्य वाढीसाठी आईने पुरेसा आणि पोषक आहार घेणे गरजेचे असते पण आईला भूक लागत नसेल किंवा खाल्ल्यानंतर उलटी , जुलाब होत असतील तर अश्यावेळी पुरेसे पोषण मिळत नाही ज्यामुळे गर्भवतीचेही आरोग्य ढासळू शकते. बाळाच्या वाढीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो. 

वर सांगितल्याप्रमाणे कोणतेही लक्षण जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांची मदत घ्यावी.

तर या लेखामध्ये गर्भावस्थेत असणारी काही धोक्याची लक्षणे (Danger Signs in Pregnancy/ Complications in pregnancy) याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली . मला खात्री आहे की या  माहितीचा(information) तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा 

गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाही मध्ये गर्भवितीची काळजी 

गर्भवतीचा आहार कसा असावा ?

गरोदरपणात प्रत्येक महिन्यात बाळाची होणारी वाढ  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top