मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी? 8 Best Ways To Get Your Child Interested in Studies

Spread the love

मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी ? Best Ways To Get Your Child Interested in Studies

मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी वापरा या प्रभावी टिप्स –

सध्याच्या आधुनिक आणि धावपळीच्या युगामध्ये मुलांमध्ये म्हणावी ठेवढी अभ्यासाची गोडी दिसून येत नाही. रात्रदिवस फोन, गेम्स आणि मस्ती करण्यात वेळ घालवणे मुलांना जास्त आवडते. अश्यावेळी आईवडिलांना हाच प्रश्न सतावतो कि मुलांना अभ्यासाची गोडी लावावी कशी ? या लेखामध्ये मुलांमध्ये अभ्यासाची गोडी लावण्यासाठी काही महत्वपूर्ण टिप्स सांगितल्या आहेत , सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी लेख शेवटपर्यंत जरूर वाचा. 

१. इतर मुलांसोबत तुलना करून मुलांवर अभ्यासासाठी दबाव टाकू नका. 

काही पालक सतत मुलांच्या अभ्यास करण्यासाठी मागे लागतात. इतर मुलांसोबत त्यांची तुलना करतात. परीक्षेत चांगले मार्क्स मिळालेच पाहिजेत असा अट्टाहास करतात. पालकांच्या या वागण्याचे मुलांना टेन्शन येते , त्रास वाटू लागतो आणि हळू हळू त्यांचा अभ्यासातील रस निघून जातो. अभ्यासावर ते म्हणावे तेवढे लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. मुलांना अभ्यास करण्यासाठी त्यांच्या मागे लागण्यापेक्षा त्यांना त्यांच्या पद्धतीने अभ्यास करू द्या. प्रत्येक मूल सारखे नसते हे स्वीकारून इतरांसोबत त्यांची तुलना टाळा.

२. अभ्यासाचे वेळापत्रक बनवा.

मुलांकडून रोज अभ्यास करून घेण्यासाठी एक फिक्स वेळापत्रक बनवा. खेळासाठी आणि अभ्यासासाठी ठराविक वेळ घालून द्या. अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय खेळायला जायला मिळणार नाही हे जेव्हा मुलांच्या लक्षात येईल त्यावेळी मुलं पटकन आणि मन लावून अभ्यास करतील आणि रोजचा अभ्यास रोज पूर्ण होईल.

३. मुलांचे मूड समजून घ्या.

कधी कधी मुलांही एखादी गोष्ट करण्याचा कंटाळा येतो आणि त्यात अभ्यासाच्या बाबतीमध्ये तर होऊच शकते. अश्यावेळी अधेमधे त्यांचेही म्हणणे ऐकून घेऊन थोडीफार सवलत देऊ शकता. मुलांच्या इच्छेविरुद्ध करून घेतल्या जाणाऱ्या गोष्टी मुलं मन लावून करत नाहीत त्यामुळे जबरदस्ती न करता कधी कधी त्यांना हव्या त्या आवडीच्या गोष्टी करण्यास मुभा द्या.

४. मुलांच्या वयानुसार त्यांना समजेल अश्या भाषेमध्ये त्यांना शिकवा. 

जेव्हा तुम्ही मुलांनाच अभ्यास घेत असता तेव्हा मुलांसोबत प्रेमाने बोला आणि त्यांच्या वयानुसार त्यांना समजेल अश्या भाषेमध्ये त्यांना सांगा . उदाहरणार्थ जे मूल ५ वर्षापेक्षा लहान आहे अश्या मुलांना वास्तविक उदाहरणे देऊन किंवा जी गोष्ट तुम्हाला शिकवायची आहे ती प्रॅक्टिकली करून दाखवली तर ती त्यांच्या चांगली लक्षात राहते, त्यामध्ये उत्सुकता आणि अवधी निर्माण होते. अश्या प्रकारे प्रत्येक गोष्ट त्यांना सांगितली किंवा शिकवली गेली तर त्यांना हळू हळू अभ्यासाची गोडी लागते. मोठ्या मुलांना त्यांची सस्तुती , कौतुक करत तुम्ही त्यांचा आत्मविश्वास वाढवणाऱ्या शब्दांत शिकवले तर ते त्यांना आवडते. 

 
मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी ?

. अभ्यासासाठी कोणत्याही गीष्टीचे अमिश दाखवू नका.

आपल्या मुलाने अभ्यास करावा म्हणून बऱ्याचदा पालक मुलांना आमिष दाखवतात आणि मग मुलं त्या गोष्टीसाठीच फक्त अभ्यास करतात शिवाय हळू हळू त्यांना याची सवयही होते. अश्यावेळी स्वतःसाठी नव्हे तर देऊ केलेले आमिष मिळवण्यासाठी मुलं अभ्यास करतात. असा केलेला अभ्यास मुलांच्या डोक्यापर्यंत कधीच जात नाही आणि टिकत नाही. त्यामुळे मुलं अभ्यास कमी करत असतील तरी ठीक आहे पण मनापासून करणे गरजेचे असते . त्यासाठी मुलांना कधीच आमिष दाखवून अभ्यास करण्यास भाग पडू नका.

. अभ्यास करताना मुलांसोबत बसा.

मुलांना अभ्यास करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी सोपा मार्ग म्हणजे त्यांच्या सोबत अभ्यास करताना बसणे , त्यांची स्तुती करणे, अभ्यासामध्ये त्यांना मदत करणे. लहान मुलांना त्यांची स्तुती केलेली फार आवडते आणि त्यामुळे त्यांना अजून प्रेरणा मिळते आणि मुलं मन लावून अभ्यास करू लागतात.

.मुलांची शिकण्याची पद्धत समजून घ्या . 

प्रत्येक मुलाची शिकण्याची , आत्मसात करण्याची पद्धत वेगवेगळी असते . काही मुलांना चित्राच्या रूपात किंवा गाण्यांच्या रूपात किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीने शिकवलेलं लवकर लक्षात राहते. काही मुलांना सराव करून किंवा रिपीटेशन ठेऊन लक्षात राहते. प्रत्येकाची स्मरणशक्ती, समजून घेण्याची ताकद आणि आत्मसात करण्याचा मार्ग वेगवेगळा असतो. तुम्ही शिकवलेल्या पद्धतीने मुलांना समाजात नसेल , आवडत नसेल तर त्यांना ज्या प्रकारे आवडते , जसे समजते , लक्षात राहते त्याप्रकारे शिकवा. 

८. मोबाईल, इंटरनेट , टीव्ही चा वापर कमी करा.

मुलांचे अभ्यासातील लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी जसे कि मोबाइलला, इंटरनेट , टीव्ही यांचा वापर कमी असावा. याउलट मुलांना रंगीबेरंगी त्यांना आवडणारी अशी गाण्यांची, गोष्टींची पुस्तके आणून द्या. मुलांसोबतच कुटुंबीयांचाही अश्या उपकरणांचा वापर कमी असावा. मुलांसोबत आणि त्यांच्या पुढे तुम्ही वाचन करा, वाचलेल्या गोष्टीवर चर्चा करा , मुलांची त्याबद्दलची मते जाणून घ्या. आपलं मूल आपल्यालाच कॉपी करत असते त्यामुळे तुम्ही जर तुमचा जास्त वेळ वाचनासाठी देत असाल तर मुलांमध्येही ती सवय निर्माण होईल आणि पुस्तकांशी त्यांची मैत्री होण्यास मदत होईल.

तर या लेखामध्ये मी तुम्हाला मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी ?याबद्दल माहिती दिली. मला खात्री आहे की या माहितीचा ( information )तुम्हाला नक्की फायदा होईल.जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन .

अधिक वाचा

मुलांसाठी प्राथमिक शिक्षणासाठी शाळा निवडत असताना या गोष्टी घ्या लक्षात, How To Choose Best School For Child?

यशस्वी आणि संस्कारी व्यक्ती म्हणून घडवत असताना आपल्या मुलांना द्या या ५ गोष्टीची शिकवण Healthy Parenting Tips

1 thought on “मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी? 8 Best Ways To Get Your Child Interested in Studies”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top