लहान मुलांना होणारे जुलाब , लक्षणे आणि उपचार (Best Remedies on Loose Motions in kids)

Spread the love
लहान मुलांना होणारे जुलाब , लक्षणे आणि उपचार Loose Motions or Diarrhea in Babies & Toddlers

लहान मुलांना जुलाब होण्याचे प्रमुख कारण असते इन्फेक्शन . जेव्हा मुलांना जुलाब होतात त्यावेळी वारंवार पातळ शौचास झाल्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी होते आणि डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे जुलाब लागल्यास वेळेतच उपचार करणे आवश्यक असते.
जे बाळ फक्त आईचे दूध पीत असते अश्या बाळाला नेहमी पातळच आणि वारंवार शौचास होते त्यांमध्ये काळजी करण्यासारखे कारण नसते, पण जर बाळाच्या शी चा वास येत असेल, बाळाचे पोट फुगल्यासारखे किंवा कडक लागत असेल, पोटाला हात लावल्यास बाळ रडत असेल किंवा शी करताना खूप त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

Diarrhea/loose motions in kids

 

जुलाब होण्याची कारणे Causes of Loose Motions in kids

दूषित आहार, दूषित पाणी यामुळे इन्फेक्शन होऊन किंवा अपचन होऊन जुलाब होतात.

बाळाला जेव्हा दात येत असतात त्यावेळीही जुलाब होण्याची शक्यता असते.  तसे पाहायला गेले तर दात येणे आणि जुलाब होणे यांचा काहीच संबंध नाही पण दात येत असताना बाळाचे हिरडे सळसळत असतात त्यामुळे बाळ हातात येणारी प्रत्येक वस्तू तोंडामध्ये घालतो . जर त्या वस्तू अस्वच्छ असतील तर त्यामुळे इन्फेक्शन होऊन जुलाब लागू शकतात. 

(हे वाचा दात येत असताना बाळाला जुलाब व ताप का येतो ? (Why does the baby get diarrhea and fever while teething?) )

जुलाब लागले आहे हे कसे ओळखावे? Signs of Loose Motions in Kids

१. बाळ वारंवार आणि पातळ शी करत असेल.
२. शी करताना पोटात दुखत असेल किंवा बाळ रडत असेल.
३. ताप आला असेल , अशक्तपणा जाणवत असेल आणि बाळाने काही खाल्ल्यास लगेच शी होत असेल किंवा उलट्या होत असतील तर बाळाला जुलाब लागले आहे असे म्हणू शकता.

जुलाब झाल्यास घरगुती उपचार Best Remedies on Loose Motions 

वारंवार होणारे जुलाब आणि उलट्या यामुळे मुलांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते ज्यामुळे डिहायड्रेशन होऊन गंभीर स्थिती होऊ शकते.
१. डिहायड्रेशनचा हा धोका टाळण्यासाठी बाळाला वारंवार पातळ पदार्थ जसे कि मीठ आणि साखर घातलेले पाणी, लिंबू सरबत, नारळ पाणी, फळांचा जूस किंवा सूप प्यायला द्यावेत.
२. जुलाब कमी करण्यासाठी बाळाला केळी, दही , जिऱ्याचे पाणी द्यावे.
३. ओ आर एस (ORS) चे मिश्रण बनवून द्यावे.

जुलाब लागल्यास बाळाचा आहार कसा असावा. Diet in Loose Motions 

१. जुलाब लागल्यास पचनास जे पदार्थ हलके असतात जसे कि वरण भात, मुगाची खिचडी , सूप असे पदार्थ बाळाला द्यावेत .
२. गाईचे किंवा म्हशीचे दुध देणे शक्यतो टाळावे .
३. बाळाला ताजा आणि घरामध्ये बनलेलाच आहार द्यावे , उघड्यावरचे , मसालेदार किंवा तळलेले पदार्थ देऊ नयेत.
४. उकळून थंड केलेले पाणी बाळाला द्यावे.

जुलाब लागल्यास काय काळजी घ्यावी Important things to consider in loose motions 

१. सलग २ दिवस बाळाचे जुलाब होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
२. जुलाब जर काही इन्फेक्शन मुळे झाले असतील तर ते घरगुती उपचार करून हि थांबत नाहीत अश्या वेळी योग्य त्या औषधांची गरज असते.
३. जुलाबमुळे अशक्तपणा येऊन बाळाचे आरोग्य अजून च खालावू शकते त्यामुळे बाळाला पौष्टिक पदार्थ द्यावेत.
४. पूर्ण स्वच्छता आणि विश्रांती घेणे आवश्यक आहे.
५. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे बाळाला देऊ नयेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *