दात येत असताना बाळाला जुलाब व ताप का येतो ? (Why does the baby get diarrhea and fever while teething?)

Spread the love
दात येत असताना बाळाला येणारा ताप आणि जुलाब Diarrhea & Fever During Teething 

 दात येणे ही प्रक्रिया बाळासाठी अतिशय त्रासदायक असते. दात येत असताना बाळाला ताप येणे, चिडचिड वाढणे, जुलाब लागणे, नीट न खाणे अश्या समस्या उद्भवू शकतात. दात येत असताना बाळाला होणारा त्रास  पाहून आपण बऱ्याचदा कोणतीही शहानिशा न करता तर्क लावतो आणि त्यानुसार उपायही करतो ज्यामुळे बाळाला अजून जास्त त्रास होऊ शकतो. या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत दात येत असताना बाळाला जुलाब आणि ताप का येतो आणि त्यासाठी काय उपाय करणे अपेक्षित आहे. 

दात येत असताना बाळाला जुलाब लागण्याची कारणे(Causes of baby diarrhea while teething)

 वास्तविक पाहता डॉक्टरांच्या अभ्यासामध्ये बाळाला दात येणे आणि जुलाब होणे याचा परस्परांशी काहीही संबंध आढळून आला नाही. म्हणजे दात येत असताना बाळाला जुलाब होतात किंवा ताप येतोच असे नाही. मग काय कारण असू शकते?

 1)दात येत असताना बाळाच्या हिरड्या खूपच  सळसळत असतात,त्याला वेदना होत असतात त्यामुळे बाळ हातामध्ये सापडेल ती वस्तू, खेळणी , कपडे तोंडामध्ये घालतो आणि ती चावण्याचा प्रयत्न करतो, असे केल्याने हिरड्यांना थोडा आराम मिळतो. परंतु अश्या वस्तू जर अस्वच्छ असतील तर साहजिकच विषाणू बाळाच्या पोटामध्ये जाऊन बाळाच्या पचन क्रियेवर परिणाम करतात. ज्यामुळे बाळाला जुलाब किंवा अतिसाराचा त्रास सुरु होतो.

 2)तोंडामध्ये घातल्या जाणाऱ्या अश्या अस्वच्छ किंवा घाण वस्तूंमुळे बाळाला इन्फेक्शन होण्याचीही शक्यता असते. जेव्हा बाळाच्या शरीरामध्ये असे इन्फेक्शन चालू असते त्यावेळी त्याविरुद्ध लढण्यासाठी शरीराचे तापमान वाढते आणि बाळाला ताप येतो. दात येत असताना तोंडामध्ये घातल्या जाणाऱ्या अस्वच्छ गोष्टीमुळे बाळाला जुलाब व ताप येऊ शकतो.

 3)दात येत असतांना बाळाला शांत झोपही येत नाही आणि शांत झोप न झाल्यामुळे त्याची सतत चिडचिड होत राहते.

 

दात येण्याआधीची लक्षणे(Symptoms before teething)

 साधारणपणे पाहायला गेले तर बाळाला ४ ते ६ महिन्याच्या दरम्यान दात येतात. हा काळ प्रत्येक बाळाच्या बाबतीमध्ये वेगवेगळा असू शकतो. काही काही बाळांना तर जन्मतःच एखादा दात असतो तर काही बाळाला दीड वर्षांपर्यंत एकही दात येत नाही. 

दात येण्याची प्रक्रिया हि दात होरड्यांवर दिसण्याआधीच किमान  २-३ महिने सुरु झालेली असते. त्यामुळे दात दिसत नसले तरी बाळाचे हिरडे फुगणे , बारीक ताप राहणे , बाळाचे सतत किरकिर करणे , रडणे अश्या लक्षणांमुळे बाळाला दात येण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे याचा अंदाज येऊ शकतो. 

पुढील काही लक्षणे दात येण्यापूर्वी बाळामध्ये दिसू शकतात. 

१)खोकला(cough)

 दात येण्याआधी बाळाला कधीकधी थोडासा खोकला होऊ शकतो.

 २)जेवणात त्रास(Trouble eating)

बाळ जेवायला खूप त्रास देते. बाळाची जेवायची इच्छा होत नाही.

 ३)उलटी(vomiting)

 दात येण्याच्या वेळी बाळाला वारंवार उलटीचा त्रास देखील होऊ शकतो.

 ४)अतिसार(Diarrhea)

दात येण्याआधी बाळाला अतिसाराचा त्रास देखील होऊ शकतो. जुलाब लागल्यानंतर बाळाच्या शरीरातील पाणी कमी होऊ नये यासाठी बाळाला भरपूर आईचे दूध आणि इतर तरल पदार्थ द्यावेत .

 ५)तीव्र ताप(High fever)

साधारणपणे दात येत असताना बाळाचे अंग गरम लागू शकते, विशेषतः बाळाच्या डोक्याचे तापमान वाढते परंतु हा ताप  हलका असतो . कधी कधी या तापाचे रूपांतर तीव्र तापामध्येही होऊ शकते. सलग जर २४ तासांपेक्षा जास्त काळ तीव्र ताप असेल तर डॉक्टरांनाचा सल्ला आवश्य घ्यावा. 

 

दात येत असताना होणाऱ्या जुलाब आणि तापावर उपाय(Remedy for diarrhea and fever caused by teething)

 १)बाळाला दात येत असताना ज्या ज्या वस्तू बाळ हातामध्ये घेऊन तोंडामध्ये घालतो अश्या सर्व वस्तू, खेळणी किंवा बाळाच्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा.

 २)बाळाच्या हिरड्यांवर बोटाने थोडे प्रेस करा त्यामुळे बाळाचे दुखणे थोडे कमी होईल.

 ३)बाळाला चावता येणाऱ्या गोष्टी द्या उदाहरणार्थ गाजर

गाजर कडक असल्यामुळे बाळाच्या दातांना आराम मिळेल. परंतु जर गाजराचे तुकडे देत असाल तर ही काळजी घ्या की गाजराचा पूर्ण तुकडा बाळाच्या तोंडात जाणार नाही आणि बाळ ते गिळण्याचा प्रयत्न करणार नाही.

 ४)या दरम्यान बाळाला भरपूर पाणी आणि संतुलित आहार द्यावा,ज्यामुळे बाळाची रोगप्रतिकार शक्ती मजबूत राहील आणि शरीरामध्ये पाण्याचे पुरेसे प्रमाण असल्याने इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होईल. तसेच जर त्यामुळे ताप येत असेल तर तोही लवकर कमी व्हायला मदत होईल.

 ५)जर बाळाला सलग दोन दिवस जुलाब होत असतील आणि तापही असेल तर कसलाही वेळ न दवडता, घरगुती उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा . जुलाबाचे प्रमाण जास्त असल्यास शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशन होऊ शकते.बाळाच्या बाबतीत कधीच कोणतीही रिस्क घेऊ नये.

 

FAQ (Frequently Asked Questions)

१)बाळाला दात येण्यास केव्हा सुरुवात होते?

बाळाला कोणत्याही महिन्यात दात येऊ शकतात,त्याचे विशिष्ट असे वय नसते. परंतु साधारणपणे चार महिने ते आठ महिने या दरम्यान बाळाला दात येतात.

 2)बाळाला जुलाब लागण्यास काय करू नये(What not to do if the baby has diarrhea)

 बाळाला जेव्हा जुलाब लागतात,त्यावेळी बाळाला जास्त फायबर असणारा आहार अजिबात देऊ नये. दुग्धजन्य पदार्थांचे सेवन टाळावे. शक्य तेवढा घरामध्ये बनलेला , ताजा आणि हलका आहार द्यावा जसे कि भात , तूप , वरण ज्यामुळे बाळाला ऊर्जाही मिळेल आणि जुलाब आटोक्यात यायलाही मदत होईल.ज्यावेळी बाळाला दात येत असतात तेव्हा बाळ थोड्याफार प्रमाणात चिडचिड करत असते. अशामध्ये बाळ कित्येक वेळा नीटसे जेवतही नाही. त्यामुळे साहजिकच आई वडिलांची देखील चिडचिड होते. परंतु वेळी आई-वडिलांनी पेशन्स ठेवायला हवेत. कधी कधी रात्रीचे जागरण आणि इतर काही गोष्टी यामुळे राग येणे साहजिक आहे परंतु तरीदेखील आई-वडिलांनी संयम ठेवणे आवश्यक असते.

 तर मी आज तुम्हाला दात येत असताना बाळाला जुलाब व ताप का येतो ? (Why does the baby get diarrhea and fever while teething?)याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. मला खात्री आहे तुम्हाला या माहितीचा नक्की उपयोग होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा

बाळाचा कान दुखणे , कानातून पु/पाणी येणे – कारणे आणि उपचार

निरोगी बाळाचे वयानुसार वजन किती असावे ?

बाळ उशिरा का बोलायला शिकते ? बाळ लवकर आणि स्पष्ट बोलण्यासाठी करा हे उपाय (Speech Therapy

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *