लहान मुलांमध्ये होणार गोवर संसर्ग Measles in Children : Cuases & Treatment

Spread the love
लहान मुलांमध्ये होणार गोवर संसर्ग Measles In Children : Symptoms, Reasons and Treatment 

राज्यभरामध्ये विशेषतः मुंबई मध्ये सध्या गोवर ची साथ प्रचंड प्रमाणात पसरते आहे आणि याचा धोका अर्थातच लहान बालकांना जास्त आहे . बऱ्याच बालकांचा या गोवर संसर्गामुळे मृत्यू हि झाला आहे . गोवरसंबंधात पालकांच्या मनात असलेले प्रश्न . शंका आणि गैरसमज दूर करणार आहे लेख आहे . आपल्या लहान मुलांना गोवर संसर्गापासून दूर ठेवण्यासाठी या आजाराची करणे , लक्षणे आणि योग्य ते उपाय जाणून घेणे खूप आवश्यक आहे . गोवर या संसर्गजन्य आजाराबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.

Measles in Children
गोवर संसर्ग नक्की काय आहे ? What is Measles Infection 

गोवर हा विषाणूपासून हवेमार्फत पसरणारा एक संसर्गजन्य आजार आहे. गोवर हा आजार कोणत्याही वयोगटातील मुलांना किंवा व्यक्तीला होऊ शकतो पण त्याचे जास्त प्रमाण २-५ वर्षाच्या मुलांमध्ये जास्त असते. प्रत्येक वर्षी हिवाळ्यात साधारणपणे नोव्हेंबर ते जानेवारी च्या दरम्यान गोवरची साथ येते.
गोवर कोणाला होऊ शकतो ?
१. ज्या बाळाची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे .
२. ज्याला एकदाही गोवर झाला नाही .
३. जे दाटीवाटीच्या किंवा दमट अस्वच्छ परिसरात राहतात त्यांना .
४. ज्यांनी गोवर ची लस घेतली नाही . 

गोवर रोगाची लागण कशामुळे होते? Reasons Of Measles Infection 

गोवर हा व्हायरसच्या संक्रमणामुळे होणार आजार आहे . संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकला, शिंक किंवा उष्टे अन्न खाल्याने तसेच संक्रमित व्यक्तीच्या वस्तू जसे कि टॉवेल, कपडे . अंथरून – पांघरून किंवा त्याने वापरलेली भांडी वापरल्याने किंवा त्याच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरतो. 

गोवरची लक्षणे Symptoms Of Measles 

१. सुरुवातीला खोकला, ताप , सर्दी होते. 

२. डोळ्यांची जळजळ होणे , डोळे लाल होणे , सूज येणे. 

३. घशामध्ये दुखणे . 

४. तोंडाच्या आत मध्ये पांढऱ्या रंगाचे स्पॉट जाणवतात. 

५. अशक्तपणा येणे . 

६. अंग , डोके दुखणे . 

७. खाण्याची इच्छा न होणे . 

८. जुलाब लागणे , उलट्या होणे. 

(हे वाचा  दात येत असताना बाळाला जुलाब व ताप का येतो ? (Why does the baby get diarrhea and fever while teething?))

९. सुरुवातीला चेहऱ्यावर, मानेवर आणि त्यानंतर हळू हळू पाठीवर , पोटावर लालसर बारीक पुरळ उठायला सुरुवात होते आणि हळू हळू अंगभर हे पुरळ पसरतात. 

गोवारीवरील उपचार Treatment On Measles

लहान मुलानं गोवरची लक्षणे दिसत असतील तर डॉक्टर त्यानुसार उपचार करतात . ताप सर्दी असल्यास त्यावरील औषधे दिले जातात. खाज येत असेल तर अँटी ऍलर्जिक क्रीम दिली जाते. व्हिटॅमिन A दिले जाते. जुलाब उलट्या होत असतील तर भरपूर तरल पदार्थ , ओ. आर. एस दिले जाते.
गोवर झालेल्या रुग्णाने भरपूर विश्रांती घेणे आणि तरल पदार्थचे सेवन करणे आवश्यक असते. हळू हळू हि लक्षणे कमी होऊन पुरळ कमी होतात आणि आजार बरा होतो. साधारणपणे ८-१० दिवस लागतात हा आजार पूर्णपणे बरा होण्यासाठी.

गोवर झाल्यास लहान बाळाची / मुलांची कशी काळजी घ्यावी ? Taking Care of children during Measles 

लहान मुलांना गोवर झाल्यास अधिक काळजी घेणे आवश्यक असते कारण लहान मुलांची रोगप्रतिकारशक्ती कमी असते आणि मुलांना त्रास हि जास्त होतो. अश्यावेळी लहान मुलांना न्यूमोनिया होऊ शकतो आणि गांभीर्य वाढले तर मृत्यूही होऊ शकतो . गोवर मध्ये मुलांना जुलाब आणि उलट्या होत असतील तर शरीरातील पाणी कमी होऊन धोका अधिक वाढू शकतो. गोवर मध्ये शरीरातील व्हिटॅमिन A कमी होते आणि त्यामुळे वेळेत यावर नाही झाले तर बाळाची दृष्टीही जाऊ शकते. त्यामुळे गोवर या आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळेत योग्य ते उपचार करणे गरजेचे असते .
गोवर या आजारावर कोणताही घरगुती उपाय करण्यात वेळ घालवू नये . गोवरची लक्षणे दिसत असतील तर तात्काळ दवाखान्यात घेऊन जाणे आणि योग्य ते औषदोपचार करणे.

(हे वाचा लहान मुलांना होणाऱ्या कांजण्या Chickenpox : Symptoms, Causes & Treatment)

MMR vaccine for measles
गोवर प्रतिबंधात्मक उपाय Measles preventive measures

गोवरची लागण होऊ नये म्हणून योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक असते .
१. लहान बाळाचे सर्व लसीकरण वेळेत करावे . गोवरची लस ९ व्या आणि १५ व्या महिन्यात दिली जाते, ती लस चुकवू नये.
२. गोवर उठलेल्या मुलांना इतर मुलांच्या संपर्कात पाठवू नये जसे कि शाळेत किंवा एकत्र खेळण्यासाठी .
३. गोवर झालेल्या बाळाची काळजी घेणाऱ्या व्यक्तीने सुद्धा वेळोवेळी हात धुणे, बाळाच्या संपर्कात असताना मास्क लावणे आणि त्याच्या सर्व वस्तू वेगळ्या ठेवणे आवश्यक असते, ज्यामुळे याचा प्रसार रोकता येऊ शकतो.
४. मुलांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन क युक्त आहार आणि फळे बाळाला देणे . उदा . संत्री, आवळा
५. गोवर झालेल्या बाळाला हाताळत असताना दूषित हातांचा स्पर्श आपले तोंड , डोळे याना होणार नाही याची काळजी घ्यावी.

गोवर लसीकरण Measles Vaccination 

गोवर या आजोरावर प्रतिबंधात्मक म्हणून MMR किंवा MR हि लस दिली जाते. या लसीमुळे गोवर (Measles) , गालगुंड (Mums) आणि जर्मन गोवर /वाऱ्याफोड्या (Rubella) या आजारपासून रक्षण होते. या लसीचा पहिला डोस नवव्या महिन्यात आणि दुसरा डोस १५ व्या महिन्यात दिला जातो त्याचप्रमाणे याचा बूस्टर डोस बाळ ४. ५- ५ वर्षाचे झाल्यावर दिला जातो. या लसीचे किमान दोन डोस घेणे आवश्यक असते ज्यामुळे बाळाचे आयुष्यभर गोवर पासून रक्षण होते.

बाळाला गोवरची लस दिली तर आयुष्यात परत कधीच गोवर होत नाही का ?

गोवरची एकदा लस घेतली तर परत कधीच गोवर होणार नाही असे नाही पण गोवरमुळे होणाऱ्या गंभीर समस्या टाळल्या जाऊ शकतात आणि गोवर चा धोका कमी होतो. बाळाला होणार त्रास कमी प्रमाणात असतो. न्यूमोनिया होणे किंवा दृष्टी जाणे आणि त्यामुळे बाळाचा मृत्यू होणे अशी परिस्थिती उत्पन्न होणार नाही जर बाळाला गोवरची लस मिळाली असेल तर .

गोवरची लस बाळाला कधी देऊ नये. When to Avoid MMR Vaccine

बाळाला जर सर्दी , कफ , खोकला आणि ताप असेल तर बाळाला MMR लस देऊ नये. याशिवाय बाळाला जुलाब किंवा उलट्या होत असतील त्यावेळीसुद्धा हि लस देऊ नये. हे सगळे आजार बरे झाल्यानंतर बाळाला गोवरची लस देणे फायद्याचे ठरेल . 

या लेखामधून मी तुम्हाला गोवर हा आजार काय आहे , त्याची लक्षणे , कारणे, लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाय याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

बाळाचे लसीकरण संपूर्ण माहिती -Baby’s Vaccination Schedul in Details 2022

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *