गरोदरपणाचा पहिला महिना – लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यायची काळजी The First Month Of Pregnancy
आई होण्याचा आनंद प्रत्येक स्त्री साठी सर्वात खास आणि अविस्मरणीय असतो. पहिल्यांदाच आई होणार असाल तर गरोदरपणाची लक्षणे समजण्यास किंवा लक्षात येण्यास थोडा वेळ लागू शकतो. जर तुम्ही गरोदर असाल किंवा गरोदर होण्याचा विचार करत असाल तर हा लेख पूर्ण वाचा कारण या लेखामध्ये गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यातील लक्षणे, शरीरात होणारे बदल, बाळाची वाढ , आहार , व्यायाम आणि काही महत्वाच्या गोष्टींबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
गरोदरपणाची सुरुवातीची लक्षणे Symptoms Of Pregnancy
१. मासिक पाळी थांबणे – गरोदर असण्याचे सर्वात पहिले लक्षण म्हणजे मासिक पाळी थांबणे. गरोदरपणात गर्भवतीच्या शरीरात प्रोजेस्टरॉन हार्मोन्स तयार होतात ज्यामुळे मासिक पाळी बंद होते.
२. थकवा येणे आणि मूड स्विंग होणे – गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात काहीही काम न करताही थकवा जाणवतो, झोप नीट लागत नाही. शरीरात होणाऱ्या हार्मोन्स च्या बदलामुळे वागण्यात सतत बदल होत असतो म्हणजे अचानक उगाचच रडायला येणे किंवा अचानक हसावे वाटणे , चिडचिड होणे किंवा कारण नसताना राग येणे अश्या प्रकारे मूडमध्ये बदल होऊ शकतात.
३. स्तन कडक होणे आणि निप्पलचा रंग बदलणे – गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात काही महिलांचे स्तन कडक होतात व काही प्रमाणात वेदनाही जाणवतात. याशिवाय निप्पलचा रंग बदलायला लागतो. आधीपेक्षा निप्पल अधिक गडद काळ्या रंगाचे रंगांचे दिसू लागतात.
४. रक्तस्त्राव आणि शरीरात गोळा येणे – जेव्हा गर्भाशयात अंडे निर्माण होतात तेव्हा गर्भवतीला सुरुवातीला रक्तस्त्राव होऊ शकतो. शिरीरामध्ये गोळा येतो. शरीर आखडते.
५. मळमळ व चक्कर येणे – गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात कोणत्याही वासामुळे मळमळ होणे किंवा उलटी आल्यासारखे वाटणे, उठल्यानंतर चक्कर येणे अशी लक्षणे जाणवून येतात. या काळामध्ये खाण्यापिण्याच्या आवडी-निवडीही बदलतात. काही वेळा सतत भूक लागणे आणि काही वेळा खाण्याची अजिबातच इच्छा न होणे अशी लक्षणे दिसून येतात.
६. शरीर जड वाटणे आणि कंबर व पाठदुखी जाणवणे
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये शरीरावर थोडीशी सूज जाणवते व त्यामुळे शरीर जड वाटू लागते शिवाय पाठीचा भाग हि दुखायला सुरुवात होते.
७. पोट व डोकेदुखी वाढणे – शरीरामध्ये वाढणाऱ्या नवीन जीवामुळे शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. पोटाच्या खालच्या भागामध्ये दुखणे आणि काहीही कारण नसताना डोके दुखणे यासारखा त्रास होऊ शकतो. याचे प्रमाण जर वाढत असेल तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
गरोदरपणातील आहार , व्यायाम आणि काही महत्वाच्या गोष्टी
गर्भवतीचा आहार Pregnant Mother’s Diet
संपूर्ण नऊ महिन्यामध्ये गर्भवतीचा आहार हा पोषक, ताजा, पुरेसा आणि संतुलित असणे अत्यंत आवश्यक असते. होणारी आई जो आहार घेते त्यावरच गर्भाची संपूर्ण वाढ आणि विकास अवलंबून असतो.
भरपूर लोह, प्रोटीन , फायबर आणि फोलेट असणाऱ्या खाद्यपदार्थांचा समावेश आहारामध्ये करावा. दिवसातून कमीत कमी ३ फळे खावीत, सकाळी उठल्यावर नाष्ट्यामध्ये सुकामेवा घ्यावा. सर्व प्रकारच्या पालेभाज्या व फळभाज्या खाव्यात. सफरचंद, केळी, द्राक्ष, संत्रा, चिकू, आवळा यासारख्या फळांचा समावेश असावा.
अंडी, चिकन, मटण खात असाल तर तेही नीट शिजलेले खावे.
पहिल्या महिन्यात होणाऱ्या उलटी किंवा मालमलमुळे खाण्याची इच्छा होत नाही पण तरीही थोडा थोडा वेळाने ताजा आणि पौष्टिक आहार घेणे आवश्यक आहे. भरपूर लोह , प्रथिने आणि सर्व जीवनसत्वे असणारा पुरेसा आहार आई आणि बाळ दोघानांही भरपूर पोषण देण्यास मदत करेल.
काय खाऊ नये Food To Avoid –
उघड्यावरचे , तळलेले किंवा मसालेदार पदार्थ, पॅकेटबंद पदार्थ, जंक/फास्ट फूड, सॉफ्ट चीज खाणे टाळावे. अंडी किंवा मांसाहार घेत असाल तर पूर्णतः शिजवून खावे ज्यामुळे इन्फेक्शनचा शक्यता कमी होतात. उष्ण पदार्थ जसे कि कच्ची पपई किंवा अननस यासारख्या पदार्थाचे सेवन करू नये. मर्क्युरी फिश खाल्याने बाळाला नुकसान होऊ शकते. मद्यपान किंवा धूम्रपान करू नये.
गर्भवतीला व्यायाम Exercise in Pregnancy –
गर्भावस्थेत पहिल्या महिन्यात व्यायाम करणे फायदेशीर ठरते , त्यामुळे थकवा कमी जाणवतो शिवाय नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहण्यास मदत होते. पाठदुखी किंवा डोकेदुखीपासूनही आराम मिळतो. या दरम्यान हलका व्यायाम जसे कि योगासने, चालणे, पोहणे यासारखे साधे सोपे व्यायाम करू शकता. या दरम्यान शरीरावर खूप जास्त ताण पडेल असे व्यायाम करणे टाळावे.
गर्भावस्थेत व्यायाम करताना तो योग्य त्या मार्गदर्शनाखाली आणि देखरेखीखाली होणे गरजेचे असते. गर्भावस्थेच्या आधीपासूनच जर तुम्ही व्यायाम करत असाल आणि तुमच्या प्रकृतीला मानवात असेल तरच असे व्यायाम करावेत.
गर्भवतीसाठी काही महत्वाच्या गोष्टी Important Things For Pregnant Mother –
गर्भवतीच्या शरीरात होणारे बदल आणि तिच्या मनाची चाललेली घालमेल , बाळाची काळजी यासर्व गोष्टी लक्षात घेता होणाऱ्या आईने नेहमी तणावमुक्त आणि आनंदी राहणे आवश्यक असते. यासाठी काही गोष्टी नियमितपणे जरूर करा.
१. दिवसातून एकदा बाहेरच्या ताज्या हवेत फेरफटका मारण्यास जा.-
बाहेरच्या मोकळ्या हवेत फिरल्याने मनावरचा ताण कमी होतो. गर्भावस्थेत होणारे मूड नियंत्रित राहण्यास मदत होते. मन प्रस्सन आणि आनंदी राहते.
२. कमीत कमी ८-१० ग्लास पाणी प्या.
पुरेश्या प्रमाणात पाणी पिल्याने पोट साफ राहते . पचनक्रिया उत्तम राहते आणि आवश्यक असणारे सर्व पोषक घटक शरीराला मिळतात. या शिवाय शरीरातील ऍसिडचे प्रमाण कमी होते , उष्णता कमी होते आणि शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.
३. सकारात्मक विचार करा आणि आनंद देणाऱ्या गोष्टी करा.
शरीरात होत असणाऱ्या हार्मोनलच्या बदलांमुळे चिडचिड होणे , उदास वाटणेकिंवा काहीच न करण्याची इच्छा होणे हे स्वाभाविक आहे. पण तुम्ही करत असलेल्या सकारात्मक विचारांमुळे तुम्हला आनंदी वाटते. तुम्हला आनंद देणाऱ्या आवडतील अश्या सर्व गोष्टी करा.
४. जास्तीत जास्त आराम करा आणि पुरेशी झोप घ्या.
गर्भावस्थेत आईचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहण्यासाठी पुरेशी झोप आणि महत्वाचा आहे. कोणत्याही कामाचे टेन्शन घेऊ नका. शक्य तेवढा अराम करा.
५. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेत न विसरता घ्या. फॉलिक ऍसिड च्या गोळ्या जरूर घ्या.
गर्भावस्थेत शरीराची गरज वाढलेली असते . गर्भाला पूर्ण पोषण मिळण्यासाठी काही सप्लिमेंट्स डॉक्टरांनी दिलेली असतात त्यांचे वेळेवर सेवन करा.
६. चांगल्या पुस्तकांचे वाचन करा.
चांगल्या विचारांचे वाचन आणि श्रावण तुम्हाला सकारात्मक ऊर्जा देण्यास मदत करतील त्यामुळे चांगल्या पुस्तकांचे वाचन जरूर करा.
गरोदरपणात या गोष्टी अजिबात करू नका. Things To Avoid In Pregnancy
१. खूप जास्त ताण किंवा टेन्शन घेणे.
२. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे.
३. खूप जास्त प्रवास करणे.
४. सतत झोपून राहणे.
५. डायटिंग करणे किंवा उपवास करणे.
६. सतत चिडचिड करणे किंवा रडणे.
अधिक वाचा
नॉर्मल डिलिव्हरी कशी होते ? Normal Delivery Process In Marathi
गर्भावस्थेत ऍनिमिया होण्याची लक्षणे कारणे आणि उपचार(Anemia in Pregnancy) )