नॉर्मल डिलिव्हरी कशी होते ? Normal Delivery Process In Marathi

Spread the love

 

नॉर्मल डिलिव्हरी कशी होते ? Step By Step Process of Giving Birth Naturally

नैसर्गिक प्रसूती म्हंटले कि आईच्या अंगावर काटा उभा राहतो कारण नैसर्गिकरित्या बाळाला जन्म देणे हे अतिशय वेदनादायक प्रक्रिया आहे. पण असे असले तरीही याचे अगणित असे फायदेही आहेत. काही अनुभवी मातांकडून आपण नैसर्गिक प्रसूतीची प्रक्रिया ऐकलेली असते आणि त्यामुळे त्याबद्दल बरेच गैरसमज, काळजी आणि शंकाही मनात असतात. या लेखामध्ये मी थोडक्यात नॉर्मल डिलिव्हरी कशी केली जाते याबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे .

नॉर्मल डिलिव्हरी कशी होते?
नॉर्मल डेलिव्हरीचे ३ महत्वाचे टप्पे (Normal Delivery in 3 Steps)

. पहिला टप्पागर्भाशयाचे तोंड उघडणे.

प्रसूती कळा सुरु झाल्यावर आतील दाबामुळे गर्भाशयाचे तोंड हळू हळू उघडते , गर्भजलाची पिशवी फुटते बाळाच्या डोक्याच्या दबाव गर्भाशयाच्या तोंडावर पडून गर्भाशयाचे तोंड उघडू लागते.
पहिल्या बाळंतपणात गर्भाशयाचे तोंड उघडण्यास बराच वेळ लागू शकतो. जर प्रसूती कळा जोरात येत असतील तर गर्भाशयाचे तोंड लवकर उघडते आणि लवकर प्रसूती होते.

. दुसरा टप्पाबाळ बाहेर येणे
गर्भाशयाचे तोंड पूर्णतः उघडले कि बाळाचे डोके बाहेर दिसू लागते, त्यानंतर हळू हळू बाळाचे हात, छाती , पाय बाहेर येतात. बाळासोबतच गर्भाशयातील पाणीही बाहेर येते.
योनीमार्ग लहान असल्यास त्याठिकाणी थोडासा चिरा देऊन मार्ग मोठा केला वाजतो तसेच बाळ बाहेर येण्यास वेळ लागत असेल तर चिमटा किंवा व्हॅक्युम च्या मदतीने बाळाला बाहेर काढले जाते.
बाळ बाहेर आल्यानंतर आईच्या छातीवर बाळाला ठेवले जाते आणि बाळाची नाळ चिमटा लावून योग्य प्रकारे कट केली जाते.

. तिसरा टप्पाप्लासेंटा आणि मेम्ब्रेन बाहेर येणे.
प्लॅसेंटा बाहेर काढण्यासाठी डॉक्टर नाळेला थोडासा ताण देतात ज्यामुळे प्लॅसेंटा गर्भाशयापासून सुटून बाहेर येतो. बाळाच्या जन्मानंतर १०२० मिनिटात प्लॅसेंटा बाहेर पडणे आवश्यक असते.

बाळाच्या जन्मानंतर पहिला एकसहा तास अतिशय महत्वाचे असतात. बाळंतिणीला रक्तस्त्राव झाल्यास तो थांबवण्यासाठी या कालावधीमध्ये उपचार केले जातात. बाळाची प्राथमिक तपासणी केली जाते. पहिल्या सहा तासांपर्यंत बाळ आणि बाळंतीण दोघांकडेही विशेष लक्ष दिले जाते.

नॉर्मल डिलिव्हरीनंतर हि लक्षणे आहेत धोकादायक (Post Delivery Complications / Danger Signs )

१. योनीतुन अधिक प्रमाणात रक्तस्त्राव होणे.
२. रक्ताच्या गुठळ्या स्रावातून बाहेर येणे.
३. बी.पी वाढणे किंवा चक्कर येणे किंवा खूप जास्त अशक्तपणा येणे.

नॉर्मल डिलिव्हरीमुळे आई आणि बाळाला होणारे फायदे (Benefits of Natural birth To Baby and New Mother)

आजकाल प्रत्येक गर्भवतीला आपली नॉर्मल डिलिव्हरी होईल कि सिझेरिअयन याबद्दल सतत चिंता वाटत असते. इतर मातांचे ऐकलेले अनुभव आणि झालेला पाहून सहसा नॉर्मल डिलिव्हरी नको शकते. नॉर्मल डिलिव्हरी जरी त्रासदायक आणि चिंतादायक तरीही नैसर्गिकरित्या होणाऱ्या बाळंतपणाचे आई आणि बाळाला बरेच फायदे होतात.

 
१. बाळाला निरोगी आरोग्य लाभते – नॉर्मल डेलिव्हरीमध्ये प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या आणि गुंतागुंतीच्या शक्यता बऱ्याच प्रमाणात कमी होतात . या शिवाय योनीमार्गातून जन्माला आलेल्या बाळाची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असते कारण जन्मतःच बाळाला हेल्दी बचटेरीया मिळतात. अश्या बॅक्टरीयामुळे बाळ सुदृढ आणि निरोगी राहण्यास मदत होते.

 
२. बाळाला जन्मतःच स्तनपान करता येते – बाळाच्या जन्मानंतर बाळाला लगेच स्तनपान देणे आवश्यक असते ज्यामुळे आईच्या दुधाची मात्रा वाढण्यास मदत होते शिवाय असे घट्टसर दूध बाळासाठीसुद्धा खूप महत्वाचे असते. नॉर्मल डेलिव्हरीनंतर आईला उठून बाळाला व्यवस्थित हाताळून स्तनपान करता येते. सिझेरियन झाल्यानंतर ओपेशन दरम्यान दिलेली भूल उतरण्यास बराच काळ जातो शिवाय पडलेल्या टाक्यांमुळे आईला उठणे आणि बाळाला वेळेवर दूध पाजणे अवघड जाते.

 
३. शारीरिक प्रकृती सुधारण्यास वेळ कमी लागतो – जर नॉर्मल डिलिव्हरी असेल तर खूप जास्त काळ दवाखान्यात राहण्याची गरज नसते . डेलिव्हरीनंतर काही तासांतच आई स्वतःच्या पायावर चालू शकते . बाळाच्या जन्मानंतर आईच्या प्रकृतीमध्ये सुधारणा येण्यास बराच काळ जातो, परंतु जर डिलिव्हरी नॉर्मल झाली असेल तर हा काळ कमी असतो. सिझेरियन मध्ये पडलेल्या टाक्यांमुळे आणि ओप्रेशनच्या दरम्यान दिल्या गेलेल्या भूल आणि इतर औषधांमुळे आईला शारीरिकदृष्या सक्षम आणि तंदुरुस्त बनण्यास वेळ लागतो.

 
४. दुसऱ्या बाळाच्या वेळीही नॉर्मल डिलिव्हरी होण्याची शक्यता – पहिली डिलिव्हरी जर नॉर्मल असेल तर दुसऱ्या बाळाच्या जन्माच्या वेळीही नॉर्मल डिलिव्हरी कोणत्याही समस्यांशिवाय होण्याची शक्यता असते. शिवाय एका नॉर्मल डेलिव्हरीनंतर आईच्या मनातील नॉर्मल डेलिव्हरीबद्दल असणारी भीती कमी होऊन आत्मविश्वास वाढतो त्यामुळे डिलिव्हरी दरम्यान होणारी गुंतागुंतही कमी होते.

या लेखामधून मी तुम्हाला नॉर्मल डिलिव्हरी कशी होते आणि नॉर्मल डेलिव्हरीचे आईला आणि बाळाला काय काय फायदे होऊ शकतात याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा

डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि पोटाचा राहिलेला घेर कमी करण्यासाठी उपाय  6 Best Tips To Reduce Weight & Belly Fat after Delivery

गर्भजल कमी का होते आणि गर्भजल वाढवण्यासाठी उपाय. (Causes of low Amniotic Fluid and Tips To increase it naturally)

गरोदरपणाचा पहिला महिना – लक्षणे, आहार, व्यायाम आणि घ्यायची काळजी First month of pregnancy care

 

2 thoughts on “नॉर्मल डिलिव्हरी कशी होते ? Normal Delivery Process In Marathi”

    1. yes Aparana , C section nantarhi normal delivery hou shkte pan tyasathi min 5 years gap hava 2 pregnancy madhe yashivay bakihi konte health issues nkot .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *