उन्हाळ्यामध्ये घामोळ्या येण्याची कारणे आणि प्रभावी उपाय How to get rid of Heat Rash quickly
उन्हाळा हा ऋतू लहान बाळासाठी / मुलांसाठी अतिशय त्रासदायक असतो. वाढत्या उष्णतेमुळे गरम – दमट हवेमुळे सतत घाम येत राहतो , ज्यामुळे अन्य आजारांसोबतच त्वचेच्या समस्याही वाढतात. शरीरावर लालसर पुरळ उठणे, खाज येणे आणि घामोळ्या येणे यासारख्या त्वचा रोगांमुळे लहान मुलं त्रस्त होतात. लहान बाळाच्या घर्मग्रंथीची वाढ पूर्णतः झालेली नसते त्यामुळे त्यांना घामोळ्यांचा त्रास हा जास्त प्रमाणात जाणवतो.
हा त्रास कमी करण्यासाठी उन्हाळ्यामध्ये अधिक स्वच्छता राखणे आणि त्यासोबतच काही खात्रीशीर असे घरगुती उपाययोजना करणे आवश्यक असते . या लेखामध्ये उन्हाळ्यामध्ये येणाऱ्या घामोळ्यांपासून लहान बाळाला / मुलांना दूर ठेवण्यासाठी किंवा जर बाळाला घामोळे आले असतील तर ते लवकरात लवकर बरे करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले आहेत . हे सर्व उपाय अगदी नवजात बाळापासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांसाठी उपयुक्त आहेत.
उन्हाळ्यात शरीरावर लालसर पुरळ, खाज किंवा घामोळ्या येण्याची कारणे
उन्हाळ्यात उष्ण – दमट हवामानामुळे सतत घाम येतो. हा घाम खूप जास्त काळ त्वचेवर राहिला तर हवेमध्ये असणारे धूलिकण यावर जमा होतात , ज्यामुळे त्वचेवरील छिद्रे बंद होतात . आपल्या शरीराचे तापमान ठेवण्यासाठी आणि त्वचा मऊ मुलायम निरोगी ठेवण्यासाठी त्वचेवरील या छिद्रांमधून घाम आणि एक प्रकारचे तेल बाहेर पडत असते . पण अश्या बंद छिद्रांमुळे याचे प्रमाण कमी होते , परिणामी शरीरावर लालसर रंगाचे पुरळ येतात , त्वचेची जळजळ होते , खाज सुटते आणि घामोळ्या येतात.
लहान बाळांच्या बाबतीमध्ये मान , पाठ , कंबर, पायाच्या जांघेत , काखेत , केसांमध्ये खूप जास्त प्रमाणात घामोळ्या येतात. योग्य त्या वेळेमध्ये योग्य ते उपचार नाही केले तर याचे प्रमाण वाढत जाते जे लहान बाळासाठी अतिशय त्रासदायक ठरू शकते.
घामोळ्यांवर खात्रीशीर उपाय
१. कडुलिंबाची पाने
मूठभर कडुलिंबाची पाणी ४ ग्लास पाण्यामध्ये ५-६ मिनिटे उकळून घ्यावीत. कडुलिंबाच्या पानांचा अर्क उतरलेले हे पाणी बाळाच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये मिसळावे आणि बाळाला त्या पाण्याने अंघोळ घालावी.
कडुलिंबामध्ये अँटीबॅक्टेरिअल प्रॉपर्टीज असतात ज्यामुळे घामोळ्या किंवा इतर त्वचेचे विकार बरे होण्यास मदत होते.
२. कोरफडीचा गर
कोणत्याही प्रकारच्या त्वचेच्या समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे कोरफडीचा गर . जिथे जिथे बाळाला घामोळे आले आहेत त्याठिकाणी कोरफडीचा गर लावल्याने घामोळे कमी होतात. कोरफडीमध्ये अँटीबॅक्टेरिअल, अँटीसेफ्टीक गुणधर्म असतात ज्यामुळे उन्हाचा त्रास कमी होण्यास मदत होते. कोरफडीच्या नियमित वापरामुळे शरीरातील उष्णता नियंत्रित राहते , त्वचेला थंडावा मिळतो आणि काही इन्फेक्शन किंवा घामोळ्या असेल तर ते लवकर बरे होण्यास मदत होते .
३. खोबरेल तेल –
खोबरेल तेलात थोडा कापूर मिसळून या तेलाने बाळाच्या संपूर्ण शरीराची मालिश करा. याच्या वापराने घामोळ्यांपासून आराम मिळतो.
४. बर्फ – घामोळ्यांमुळे त्वचेची खूप जळजळ होते , खाज येते . अश्यावेळी घामोळ्या आलेल्या ठिकाणी बर्फाने मालिश करावी . मालिश करण्यासाठी बर्फ थेट त्वचेवर बर्फामुळे त्वचेला थंडावा मिळतो
५. काकडी – काकडी थोडावेळ फ्रीझ मध्ये ठेवा , थंड काकडी चे काप करून घ्या आणि हे काप घामोळ्या आलेल्या ठिकाणी थोडा वेळ ठेवा . मूल लहान असेल तर थंड काकडीची पेस्ट करून ती त्वचेवर लावू शकता .
६. मुलतानी माती – मुलतानी माती हि घामोळ्यांवर रामबाण उपाय आहे. मुलतानी मातीमध्ये थोडासा गुलाब जल मिसळून त्याची थोडी जाडसर पेस्ट करा आणि ती घामोळ्यांवर लावा. १५-२० मिनिटे हि पेस्ट त्वचेवर ठेवून नंतर थंड पाण्याने स्वच्छ धुवा. दिवसातून २ वेळा हा उपाय करू शकता. नियमितपणे मुलतानी माती त्वचेवर लावल्याने त्वचेवरील छिद्रे बंद होत नाहीत आणि घामोळ्यांचा त्रासही होत नाही. त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
७. पपई – पपईची मिक्सरमध्ये छान पेस्ट करून घ्यावी आणि हि पेस्ट २०-२५ मिनिटांसाठी घामोळ्या आलेल्या ठिकाणी लावावी . नंतर स्वच्छ थंड पाण्याने धुवून घावे. पपईमुळे त्वचेची जळजळ , खाज कमी होऊन घामोळ्यांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते.
घामोळ्या येऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी
– लहान बाळाला किंवा मुलांना घामोळ्या येऊ नयेत यासाठी मुलांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवा .
– मुलांच्या आहारामध्ये थंड गुणधर्म असणारे पदार्थ जसे कि दही, गुलकंद , कोकम सरबत , फळे आणि पालेभाज्या यांचा भरपूर समावेश करा . पाणी आणि इतर पातळ पदार्थ म्हणजेच फळांचे रस , मिल्कशेक , लिंबूपाणी , नारळपाणी असे पदार्थ भरपूर प्रमाणात द्या म्हणजे शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित राहील .
– मुलांचे कपडे सैलसर कॉटनचे हलक्या रंगाचे किंवा पांढरे असे असू द्या ज्यामुळे घाम पटकन शोषला जाईल .
– अचानक होणार तापमानातील बदल शक्यतो टाळा . कडक उन्हामध्ये बाळाला घराबाहेर पडू देऊ नका.
– हवेतील दमटपणा कमी करण्यासाठी रात्रीच्या वेळी फॅन किंवा कूलर लावला असता खोलीमध्ये पाण्याची उघडी बादली ज्यामुळे हवेतील दमटपणा कमी होईल आणि हवा थंड राहायला मदत होईल.
– वेळेमध्येच मुलांमध्ये डिहायड्रेशन ची लक्षणे ओळखा आणि योग्य ते उपाय करा .
या लेखामधून मी तुम्हाला उन्हाळ्यामध्ये घामोळ्या येण्याची कारणे, बचाव आणि प्रभावी असे घरगुती उपाय याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
लहान मुलांमध्ये होणार गोवर संसर्ग Measles in Children : Causes & Treatment