पीसीओडी म्हणजे काय ? कारणे, समस्या, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय PCOD Problem in Woman’s Health 2023

Spread the love

आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या राहणीमानात देखील खूप मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे आणि त्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होत आहे. कोणत्याही स्त्रीची नियमित असणारी मासिक पाळी हे तिच्या निरोगी आरोग्याचे मोजमाप असते पण आजकाल अगदी १८-२० वर्षे वयोगटापासून ते ५० वर्षे वयोगटातील महिलांनासुद्धा पीसीओडी सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते आहे.

बऱ्याचदा मुलींची मासिक पाळी अनियमित होत असेल तर त्याचे कारण पीसीओडी (PCOD) असे सांगण्यात येते. यासाठीच पीसीओडीबाबत सर्व गोष्टी प्रत्येक स्रीला माहित असणं गरजेचं आहे.

म्हणून  या लेखामध्ये आपण पीसीओडी (PCOD)  म्हणजे नक्की काय ? याची लक्षणे काय आहेत ? यावर उपचार कधी आणि काय घ्यावेत ? आणि पीसीओडी  होऊच नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

मासिक पाळी नियमित असणे का गरजेचे आहे ?

मासिक पाळी नियमित असेपर्यंत शरीराला आवश्यक असलेली हार्मोन्स सुरळीत निर्माण होत असतात. वात -पित्त- कफ संतुलित राहून स्त्री च आरोग्य उत्तम राहत , सौन्दर्य टिकून राहत पण PCOD ने त्रस्त असलेल्या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक महिलांमध्ये पीसीओडी हे आई न होण्यामागील प्रमुख कारण आहे. अनेक मुली मासिक पाळी अनियमित असेल तर त्यावर वेळीच उपचार करीत नाहीत. ज्यामुळे भविष्यात त्यांना वंधत्वाला सामोरे जावे लागेल. आजकालच्या आधूनिक काळात पीसीओडीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना उपलब्ध आहेत. शिवाय जीवनशैलीमध्ये काही विशिष्ठ बदल करून तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. पण त्यासाठी तुम्हाला पीसीओडीची समस्या आहे हे वेळीच लक्षात येणं गरजेचं आहे.

PCOD in woman's health
पीसीओडी म्हणजे नक्की काय ? (What is PCOD?) – 

पीसीओडी म्हणजे पॉलिसिस्टीक ओव्हरियन डिसिज (Polycystic Ovarian Disease) पीसीओडी मध्ये त्या स्त्रीच्या अंडाशयामध्ये गाठी अथवा सिस्ट निर्माण होतात. अंडाशयातील या गाठींमुळे किंवा सिस्टमुळे त्या महिलेचे स्त्रीबीज निर्माण होण्यात अडथळा निर्माण होतो. शारीरिक कार्यात अडथळा आल्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण शरीररवर होऊ लागतो. पीसीओडीमुळे महिलांच्या हॉर्मोन्समधील संतुलन बिघडते. सध्या वंधत्वाचा सामना करणाऱ्या अनेक महिलांमध्ये पीसीओडी हे आई न होण्यामागील प्रमुख कारण आहे.आजकालच्या पीसीओडीवर मात करण्यासाठी अनेक उपाययोजना उपलब्ध आहेत. शिवाय जीवनशैलीमध्ये काही बदल करून तुम्ही या समस्येपासून मुक्तता मिळवू शकता.

पीसीओडी ची लक्षणे (Signs of PCOD) –

१. अनियमित मासिक पाळी – दर महिन्याला स्रीयांच्या गर्भाशयातून एक परिपक्व झालेले स्त्रीबीज बाहेर पडते. यालाच आपण मासिक पाळी म्हणतो. मात्र पीसीओडीमुळे स्त्रीबीज निर्माण होण्यास अडथळा येतो.त्यामुळे मासिक पाळी उशीरा येणे.

२. अचानक वजन वाढू लागणे – पीसीओडीची समस्या असल्यास महिलांच्या महिलांच्या पोटाचा घेर जास्त दिसू लागतो,वजनामध्ये अचानक वाढ होऊ लागते. तुमचे वजन अचानक वाढू लागले असेल तर त्याकडे दूर्लक्ष करू नका.

३. पाळीच्या काळात होणाऱ्या असह्य वेदना – पीसीओडीमुळे स्त्रीयांच्या अंडाशयात गाठी निर्माण होतात. ज्यामुळे मासिक पाळीच्या काळात त्यांना असह्य वेदना जाणवू लागतात. काहीजणींना पीसीओडीच्या समस्येमुळे योनीमार्गामध्ये किंवा पोटामध्ये मासिक पाळी सुरू नसतानाही असह्य वेदना जाणवतात.

४. वंधत्व –  पीसीओडी हे महिलांमधील वंधत्वाचे एक प्रमुख कारण आहे. गर्भधारणा राहण्यासाठी ओव्हूलेशन होण्याची गरज असते. मात्र पीसीओडी मुळे  ओव्हूलेशनच्या कार्यात अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे महिलांना गर्भधारणा होण्यामध्ये समस्या निर्माण होतात.

५. डोकेदुखी, चिडचिडेपणा, कंटाळा, नैराश्य वाढते आणि अशक्तपणा जाणवतो  – शरीरामध्ये झालेल्या हॉर्मोनलच्या बदलांमुळे सतत डोकेदुखी होणे ,  कोणतेही काम करताना उत्साह न जाणवणे, अशक्तपणा समस्या होऊ लागतात.

६. केस गळणे, केस पांढरे होणे आणि चेहऱ्यावर केस येणे –

हॉर्मोन्सचे संतुलन बिघडल्यामुळे त्याचा परिणाम तुमच्या केसांवरही होतो. केसांचे योग्य पोषण न झाल्यामुळे ते कोरडे आणि निस्तेज दिसू लागतात. शिवाय या काळात केस मोठ्या प्रमाणावर गळतात आणि पांढरे होऊ लागतात. शिवाय चेहऱ्यावर अगदी राठ आणि मोठ्याप्रमाणात केस यायला लागतात.

७. चेहऱ्यावर डाग आणि पिंपल्स –

जर तुमचे आरोग्य निरोगी असेल तर तुमचा चेहरा प्रसन्न आणि चमकदार दिसतो. मात्र पीसीओडीमुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स आणि काळे डाग दिसू लागतात.

वर सांगितलेल्या ७ कारणांपैकी कोणतेही कारण तुम्हाला जाणवत असेल तर स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.


पीसीओडी समस्येची कारणे ( Reasons Of PCOD ) –

चुकीची जीवनशैली आणि आहार –

आजकालच्या धावपळीच्या जगामध्ये कामाचा ताण – तणाव, कौटुंबिक समस्या, दैनंदिन जीवनात येणारी आव्हानं यामुळे तुमच्या हॉर्मोन्समध्ये बदल होण्याची शक्यता आहे. कामाच्या गडबडीमध्ये महिला स्वतःच्या आहारकडे पुरेसं लक्ष देत नाहीत. सकस आणि पौष्टिक आहार न घेतल्याने शरीराला गरजेचे असणारी पोषक घटक मिळत नाहीत. ज्यामुळे तुमच्या हॉर्मोन्सच्या निर्मितीमध्ये बदल होतो आणि पीसीओडी सारख्या आरोग्य समस्या निर्माण होतात.

अपुरा व्यायाम –

आपल्या शरीराला निरोगी आणि सक्रिय राहण्यासाठी व्यायामाची फार आवशक्ता असते. मात्र जर तुम्ही व्यायाम करत नसाल तर तुम्हाला पीसीओडीचा सामना करावा लागू  शकतो.

अनुवंशिकता-

जर तुमच्या आई अथवा बहिणीला पीसीओडीची समस्या असेल तर तुम्हालाही पीसीओडीची समस्या निर्माण होऊ शकते. पीसीओडी ही एक अनुवंशिक समस्या आहे.

पीसीओडीचा त्रास होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी (Precautions to avoid PCOD )-

१. नियमित व्यायाम करा – 

नियमित व्यायाम आणि योगासने केल्यास तुमच्या संपूर्ण शरीरावर त्याचा चांगला परिणाम होतो. नियमित व्यायाम केल्यामुळे तुम्ही फिट राहता. तुमचे मासिक आणि शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते.  हॉर्मोन्सचे कार्य सुरळीत होते. त्यामुळे पीसीओडी आणि इतर आरोग्य समस्या टाळण्यासाठी दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे व्यायाम अवश्य करा.

२. संतुलित आहार – 

घरातील सात्विक आणि ताजे अन्न खा, आहारात ताज्या भाज्या आणि फळांचा समावेश करा. जेवणात वरून मीठचे ,साखरेचे प्रमाण कमी ठेवा.

३.  अति ताण घेणे टाळा – अति ताण – तणाव असेल तर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य पूणतः ढासळून जाते. कोणत्याही गोष्टीचा अति ताण टेन्शन घेणे टाळा . 

४. वैद्यांच्या सल्ल्याने पंचकर्म करून घ्यावे – आयुर्वेदामध्ये पीसीओडी टाळण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी बरेच उपाय सांगितले आहेत . वैद्यांच्या योग्य त्या सल्ल्याने केलेलं पंचकर्म शरीरातील हार्मोनल लेव्हल योग्य ठेवण्यासाठी मदत करेल . आणि हा त्रास भविष्यामध्ये जाणवणार नाही.

५. मद्यपान आणि धूम्रपान –

मद्यपान आणि धूम्रपानाचा शरीरावर विपरित परिणाम होतो. स्त्रियांमध्ये जरी याचे प्रमाण कमी असेल तरीसुद्धा तुयमच्या जवळच्या व्यक्ती मद्यपान आणि धूम्रपान करत असतील आणि तुम्ही  त्यांच्या सतत संपर्कात येत असाल तर ते तुमच्यासाठी धोक्याचे ठरू शकते . ऍक्टिव्ह स्मोकिंग पेक्षा पॅसिव्ह स्मोकिंग जास्त घटक ठरते . निरोगी आयुष्य हवे असेल तर मद्यपान आणि धूम्रपान करण्यापासून आणि करणाऱ्या व्यक्तीपासून दूर रहा.

पीसीओडी समस्येवरील उपचार (Treatment on PCOD ) – 

पीसीओडीची समस्या असल्यास वाढलेले वजन आणि अनियमित मासिक पाळीमुळे तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी समस्या निर्माण होतात. यासाठी गर्भधारणेसाठी प्रयत्न करण्यापूर्वीच पीसीओडीवर उपचार करणे गरजेचे आहे. वजन कमी करून आणि ओव्हूलेशनला चालना देणारे उपचार करून तुम्ही गरोदर राहू शकता. अशा उपचारांमध्ये डॉक्टर तुम्हाला काही औषधे आणि अल्ट्रा साऊंड परिक्षणाद्वारे ओव्हूलेशन कधी होणार याचा अंदाज देतात. या काळात सेक्स केल्यामुळे तुम्हाला गर्भधारणा होणे शक्य असते. फर्टिलिटी प्रोग्रेसवर लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या वंधत्वावर मात करू शकता.

पीसीओडी समस्या ही आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे निर्माण झालेली समस्या आहे. त्यामुळे वेळीच योग्य उपचार करून आणि पोषक आहार आणि नियमित व्यायाम करून तुम्ही तुमच्या या समस्येवर उपचार करू शकता. वरील सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण आपल्या स्वास्थ्याला होणारा त्रास कमी करू शकता.

या लेखामधून मी तुम्हाला महिल्यांमध्ये वाढत चाललेल्या पीसीओडी (PCOD )या समस्येबद्धल याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

बाळाच्या आरोग्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या यू-ट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता.

बालविश्व मराठी Baby World

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *