डिलिव्हरीनंतर मासिक पाळी कधी सुरु होते ? All ABout Periods After Delivery in Marathi

Spread the love
डिलिव्हरी नंतर मासिक पाळी कधी सुरु होते? Periods After Delivery in Marathi

डिलिव्हरीनंतर मासिक पाळीबद्दल नवीन आईच्या मनात बरेच प्रश्न असतात. जसे कि डिलिव्हरी नंतर मासिक पाळी कधी सुरू होते? डिलिव्हरीनंतर नियमितपणे मासिक पाळी सुरु राहते का? डिलिव्हरीनंतर मासिक पाळीमध्ये काही बदल होतात का किंवा त्रास होतो का ? मासिक पाळीमुळे बाळाच्या स्तनपानावर काही परिणाम होतो का ? असे अनेक प्रश्न  त्यांना सतावत असतात. गरोदरपणाच्या नऊ महिन्यात महिलांची मासिक पाळी पूर्णतः बंद झालेली असते. त्यामुळे डेलिव्हरीनंतर ती परत योग्य वेळेत नियमितपणे सुरु होणेही तेवढेच आवश्यक असते. 

डेलिव्हरीनंतर मासिक पाळी नियमितपणे सुरु होण्यास लागणारा वेळ हा बाळाला आई किती स्तनपान देते आहे यावर जास्त अवलंबून असते.आई बाळाला जेवढे जास्त स्तनपान करेल तेवढ्या उशिरा मासिक पाळी नियमितपणे सुरु होते. पहिल्या सहा महिन्यामध्ये बाळाचे स्तनपान घेण्याचे प्रमाण जास्त असते अश्यावेळी आई जर बाळाला भरपूर स्तनपान करत असेल तर पाळी येण्यास सहा महिन्यांचा वेळ लागू शकतो.

बाळ जसा वरचा आहार सुरु करतो त्यानंतर स्तनपान घेण्याचे प्रमाण हळू हळू कमी होते आणि पाळी येण्याची प्रक्रिया सुरु होते. जर तुमची नैसर्गिकरित्या प्रसूती झाली असेल तर साधारणपणे डेलिव्हरीनंतर ३-६ महिन्यांनी पाळी येते. काही स्त्रियांना एक किंवा दीड वर्षही पाळी येत नाही. 

या उलट सिझर झाल्यास आईला सुरु असणाऱ्या औषधांमुळे आणि बाळाला म्हणावे तेवढ्या प्रमाणात दूध पाजता येत नसल्याने सहा आठवड्यानंतर किंवा त्यापेक्षा थोड्या फार जास्त काळानंतर आईला नियमित मासिक पाळी सुरु होते.

 म्हणजेच बाळाच्या जन्मानंतर मासिक पाळी सुरु होण्यास लागणारा वेळ हा विविध गोष्टींवर अवलंबून असतो आणि प्रत्येक स्त्रीला वेगवेगळ्या कालावधीनंतर मासिक पाळी सुरु होऊ शकते. 

Periods After Delivery in Marathi
Frequently Asked Questions (FAQ)
१. स्तनपान करत असताना मासिक पाळी का येत नाही ? 

आईच्या शरीरात बाळासाठी लागणारे दूध तयार करण्यासाठी काही हार्मोन्स बनत असतात. त्यापैकी प्रोलॅक्टिन नावाचे हार्मोन हे मासिक पाळी येऊ न देण्यासाठी कारणीभूत ठरते. या हार्मोनमुळे ओव्यूलेशन होत नाही आणि एग्जही रिलीज होत नाहीत या सर्व प्रक्रिया होत नसल्याने स्तनपान करत असताना पाळी येत नाही. 

२.मासिक पाळीचा आईच्या दुधावर काय परिणाम होतो?

आपल्याकडे बऱ्याच जणांचे असे समज आहेत कि मासिक पाळीच्या दरम्यान दुधाचा उग्र वास येतो किंवा दुधाचे प्रमाण कमी होते, ज्यामुळे बाळ दूध पीत नाही. वास्तविक पाहता असे काही नाही , मासिक पाळीमुळे दुधाची चव किंवा वास बदलत नाही परंतु शरीरात झालेल्या हॉर्मोन्सच्या बदलामुळे दुधाचे प्रमाण थोडेसे कमी होऊ शकते. बरीच महिलांचा मासिक पाळीमध्ये त्रास होतो, या त्रासामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा आणि स्ट्रेसमुळेही या दरम्यान आईच्या दुधाची मात्र कमी होऊ शकते. 

असे असले तरीही जर तुम्ही मासिक पाळीच्या दरम्यान पुरेसा आहार आणि अराम करत असाल तर या समस्या टाळता येऊ शकतात. 

३. डिलिव्हरी नंतर मासिक पाळीमध्ये काही बदल होतो का ?

गरोदरपणाच्या पूर्ण ९ महिन्यात स्त्रीची मासिक पाली थांबलेली असते. डेलिव्हरीनंतर पहिल्यांदा जेव्हा ती पुन्हा सुरु होते तेव्हा ती आधीपेक्षा वेगळी असू शकते. डेलिव्हरीनंतर शरीर पुन्हा एकदा मासिक पाळीची प्रक्रिया समजून घेत असते त्यासाठी तयार होत असते, अश्यावेळी तुम्हाला काही बदल जणू शकतात. जसे कि मासिक पाळीमध्ये अनियमितता येणे, वेदना जाणवणे, जास्त रक्तस्त्राव होते , रक्ताच्या गुठळ्या पडणे इत्यादी. जस जसे महिने जातील त्यानंतर हा अनियमितपणा आणि इतर समस्या कमी होऊ लागतात. शरीर पूर्ववत स्थितीमध्ये येऊ लागते आणि पाळीची हि प्रक्रियासुद्धा सुरळीत होते. 

४. मासिक पाळीमध्ये बाळाला स्तनपान करावे का ? 

हो नक्कीच मासिक पाळीमध्येही बाळाला स्तनपान करावे. यामुळे आईच्या दुधाची मात्र कायम टिकून राहण्यास मदत होते. मासिक पाळीमध्ये बाळाला जर तुम्ही भरपूर स्तनपान देत असाल तर पाळीमध्ये होणाऱ्या वेदनांपासूनही अराम मिळतो. जर तुम्ही काही गैरसमजांमुळे बाळाला या काळात स्तनपान देत नसाल तर आईच्या शरीराचे दूध निर्माण करण्याचे प्रमाण कमी होते आणि एकदा हे प्रमाण कमी झाले तर परत ते नियमित करणे खूप कठीण ठरू शकते. 

५. डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा? 

डिलिव्हरीनंतर सुरु झालेल्या मासिक पाळीच्या दरम्यान तुम्हाला जर खूप जास्त वेदना होत असतील किंवा रक्तस्त्राव आधीपेक्षा खूप जास्त होत असेल किंवा रक्ताच्या मोठ्या गाठी पडत असतील अश्यावेळी डॉक्टोनाचा सल्ला जरूर घ्यावा. काही दुर्मिळ पण गंभीर कारणांमुळे या सर्व समस्या होण्याची शक्यता असते ज्याचे वेळीच निदान करून होणारे परिणाम टाळता येऊ शकतात.

 

हे वाचा

बाळंतपणानंतर लैंगिक संबंध कधी ठेवावेत ?

डिलिव्हरीमध्ये पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी?

बाळांना होणारी कावीळ, करणे, लक्षणे आणि उपचार (Jaundice In Newborns)

निरोगी बाळाचे वयानुसार वजन किती असावे ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *