डोळे येणे म्हणजे का ?
पावसाळ्याच्या दिवसात अनेक साथीचे रोग बळावतात , त्यामध्ये “डोळे येणे “ हा आजार सध्या खूपच फोफावत चालला आहे. विशेषतः लहान शाळकरी मुलांमध्ये डोळ्यांची साथ येणे आणि साथ अतिशय वेगाने पसरने हे सामान्य आहे.
डोळे येणे हा आजार डोळ्याला झालेले एक प्रकारचे बॅक्टरीअल किंवा व्हायरल इन्फेकशन असते . काही वेळा ऍलर्जी सुद्धा असू शकते .
जर इन्फेकशन बॅक्टरीअल किंवा व्हायरल असेल तर ते व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरू शकते . पण जर ऍलर्जी असेल तर त्याचा दुसर्यांना संसर्ग होत नाही .
डोळे येणे म्हणजे डोळ्याच्या पांढऱ्या भागावर असलेल्या पातळ उतींची आणि पापणीच्या आतील बाजूस दाह होण्याची शक्यता असते. डोळे येणे किंवा कॉंजक्टिव्हिटीस किंवा पिंक आय हा आजार लहान शाळकरी मुलांमध्ये खूप सामान्य आहे . मोठ्या लोकांनासुद्धा याचा संसर्ग होऊ शकतो.
डोळे येणे हा आजार जरी खूप गंभीर समजला जात नसला तरी डोळ्यासारख्या नाजूक अवयवर हे संक्रमण होत असल्याने आणि त्याचे काही गंभीर परिणाम भविष्यात होऊ नयेत म्हणून योग्य ती काळजी घेणे आवश्यक असते.
या लेखामध्ये आपण डोळे येणे किंवा डोळ्यांची हि साथ येते म्हणजे नक्की काय होत ? याची लक्षणं काय आहेत ? काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहितीने जाणून घेणार आहोत.

डोळ्यांची साथ पावसाळ्यातच का येते ?
पावसाळ्यात हवेमध्ये आद्रतेचे प्रमाण वाढते , वातावरणामध्ये दूषितपणा वाढतो आणि त्यामुळे व्हायरसचे प्रमाणही वाढते शिवाय हवेतील आणि परिसरातील ओलाव्यामुळे शरीरामध्ये संसर्ग जास्त काळ राहतो आणि तो इतरांमध्ये पसरण्याचा धोकासुद्धा जास्त असतो . त्यामुळे या काळामध्ये संसर्गजन्य आजारांची जास्त साथ येते .
अस्वच्छ हात किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या डायरेक्ट संपर्कात आल्याने किंवा त्याचे कपडे, रुमाल किंवा टॉवेल असे काही वापरल्याने किंवा डोळ्याला लावल्याने डोळे येतात .
डोळे येणे या आजाराची लक्षणे
१. डोळ्यात किंचित लालसरपणा
२. डोळ्यातून पाणी येणे , पिवळसर घाण येणे .
३. डोळ्याला खाज सुटणे .
४. पापण्या लाल होणे आणि पापण्यांवर सूज येणे.
५. डोळ्याला चिपडे येणे, डोळ्यांच्या पापण्या चिकटणे .
६. प्रकाशाचा त्रास जाणवणे .
(हे वाचा लहान मुलांना होणाऱ्या कांजण्या Chickenpox)
डोळे आल्यास काय काळजी घ्यावी ?
१. ज्या व्यक्तीला किंवा लहान मुलाला डोळे आले आहेत त्यांना संपूर्ण विलगनासह घरामध्ये विश्रांती द्यावी .
२. बाहेरच्या मोकळया हवेत किंवा गर्दीमध्ये सार्वजनिक ठिकाणी जाऊ देऊ नये .
३. डोळे आलेल्या व्यक्तीचा रुमाल, टॉवेल व इतर कपडे इतरांनी वापरू नयेत शिवाय ते वेगेळे ठेवावेत .
४. डोळे आलेल्या व्यक्तीचे वापरलेले कपडे वेगेळे धुवावेत.
५. डोळे आलेल्या व्यक्तीने वारंवार हात स्वच्छ धुवावेत .
६. सतत डोळ्याला हात लावणे टाळावे.
डोळे आल्यास घरगुती उपाय काय करावेत ?
डोळेचा हा संसर्ग काही दिवसात आपोआप कमी होतो पण त्रास जास्त जाणवत असेल , सूज जास्त प्रमाणात असेल आणि डोळ्यावर अंधारी येत असेल तर डॉक्टरांच्या योग्य त्या औषधोपचार घेणे कधीही उत्तम . डोळा हा आपल्या शरीराचा अतिशय नाजूक भाग असल्याने यावर कोणतेही ऐकीव किंवा गावठी उपचार करू नयेत.
दाह कमी व्हावा आणि थोडा अराम मिळावा यासाठी थंड पाण्याचा हबका डोळ्यावर मारू शकता आणि शक्य तेवढी डोळ्यांची स्वछता ठेवणे गरजेचे असते , कोणतेही लोकल कंपनीचे काजळ किंवा डोळ्यांची सौन्दर्य प्रसाधने वापराने टाळावे . डोळ्यांमध्ये आलेली घाण किंवा पाणी स्टेराइल केलेल्या वाईप नि पुसून घ्यावे .
या लेखामधून मी तुम्हाला मुलांना डोळे आल्यास काय करावे ,कशी काळजी घ्यावी , काय उपचार करावेत याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
बाळाच्या आरोग्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या यू-ट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता.