स्तनपान करणाऱ्या आईने हे पदार्थ खाणे टाळावे 6 Foods To Avoid During Breastfeeding.

Spread the love

स्तनपान करणाऱ्या आईने कोणते पदार्थ खाणे टाळावे. Foods To Avoid During Breastfeeding 

बाळाच्या जन्मानंतर आईला बरेच पदार्थ खाण्याबद्दल नियम आणि अटी सांगितल्या जातात. हे खाल्ले तर बाळाला त्रास होईल , पोटामध्ये गॅस होईल , बाळ रडायला लागेल असे बरेच समज असतात. अश्यावेळी काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल आईच्या मनात बऱ्याच शंका आणि प्रश्न असतात. 

स्तनपान करत असताना आई जो आहार घेते तोच बाळाला दुधामार्फत मिळत असतो शिवाय आईच्या आहाराचा तिला येणाऱ्या दुधावर परिणाम होतो. म्हणजे जर आई एक पुरेसा आणि पोषक आहार घेत असेल तर बाळाला मिळणारे दूध हि तेवढेच पुरेसे आणि पोषक असेल.म्हणून या काळामध्ये आईचा आहार संतुलित असणेही तेवढेच आवश्यक असते. स्तनपानाच्या दरम्यान आईने तिच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे खूप आवश्यक असते. काही पदार्थ बाळासाठी त्रासदायक किंवा ऍलर्जिक ठरू शकतात . 

या लेखामध्ये स्तनपान करणाऱ्या आईने कोणते पदार्थ खाणे टाळावे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

Foods To Avoid During Breastfeeding

१. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध गोळ्यांचे सेवन Avoid Taking Medicines Without Prescriptions 

बाळाला दूध पाजत असताना शक्यतो कोणतेही मेडिसिन घेणे जेवढे शक्य होईल तेवढे टाळणे गरजेचे असते. काही गंभीर आजारांमुळे किंवा कारणांमुळे औषादोपचार घ्यावा लागत असेल तर तो हि फक्त डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेणे गरजेचे असते. आई जे काही खाते त्याचा थोड्याफार प्रमाणात अंश बाळाला दुधमार्फत मिळत असतो त्यामुळे या बाबतीमध्ये विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. 

स्तनपान करत असताना पॅरासिटेमॉल सोडून इतर कोणतेही औषध किंवा गोळी घेत असताना डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. याशिवाय गर्भनिरोधक गोळ्या किंवा मासिक पाळी लवकर किंवा पुढे घेण्यासाठीही गोळ्या घेऊ नयेत.गर्भनिरोधक किंवा मासिक पाळीच्या संदर्भात घेतल्या जाणाऱ्या गोळ्यांमुळे आईच्या दुधाचे प्रमाणही कमी होते शिवाय त्याचा गुणवत्ताही ढासळू शकते. 

२. ऍलर्जी असणारे पदार्थ Allergic Food

जर आईला किंवा बाळाच्या जवळच्या नातलगांना एखाद्या पदार्थाची ऍलर्जी असेल तर पहिल्या १ वर्षापर्यंत किंवा बाळ जोपर्यंत स्तनपान घेतो आहे तोपर्यंत ते पदार्थ आईच्या आहारमध्ये समाविष्ट करणे टाळणे गरजेचे असते. त्या पदार्थांची बाळालाही ऍलर्जी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किमान पहिल्या ६ महिन्यांपर्यंत आईने शक्यतो गाईचे दूध, शेंगदाणे, सोयाबीन किंवा अंड्याचा पंधरा बलक घेणे टाळावे. हे पदार्थ जास्त ऍलर्जिक आहेत ज्यामुळे बाळाला त्याचा त्रास होऊ शकतो. याशिवाय ज्या पदार्थंची आईला ऍलर्जी आहे तेही पदार्थ टाळावेत. 

३. उघड्यावरचे , हॉटेलमधील किंवा पॅकिंग फूड Junk Food, Processed Food 

स्तनपान करत असताना आईने शक्य तेवढा ताजा आणि सकस घरामध्ये बनलेला आहार घेणे अपेक्षित असते. हॉटेलमधले किंवा उघड्यावर ठेवलेल्या पदार्थांच्या गुणवत्तेबद्दल आपण खात्री देऊ शकत नाही, शिवाय असे पदार्थ ताजेही नसतात. योग्य ती  स्वछता आणि गुणवत्तेच्या अभावी अश्या पदार्थांच्या सेवनामुळे इन्फेक्शन होण्याची जास्त शक्यता असते. याशिवाय पित्ताचा त्रास जास्त वाढू शकतो. स्तनपानाच्या दरम्यान पौष्टिक आणि पुरेसा आहार जेवढा गरजेचं आहे तेवढाच तो योग्य ती स्वच्छता आणि योग्य ती गुणवत्ता राखूनही बनवणे अपेक्षित असते. स्तनपानाच्या दरम्यान आईचे स्वास्थ्य योग्य प्रकारे राखले जावे यासाठी बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे. 

४. तळलेले , मसालेदार , खारट किंवा खूप जास्त गोड पदार्थ Fried, Spicy, Sweet or Salty Foods

तळलेले किंवा मसालेदार पदार्थ आईला पित्त निर्माण करू शकते ज्यामुळे पचनक्रिया बिघडते. खूप खारट किंवा गोड पदार्थ हि आपल्या आरोग्यासाठी चांगले नसतात, ज्यामुळे भविष्यामध्ये बाळाला रक्तदाब किंवा हृदयाचे विकार होऊ शकतात.स्तनपान करत असताना शक्य तेवढे उकडलेले कडधान्ये, भाज्या किंवा इतर कमी मसाले आणि तेल असणारे पदार्थ खावेत. 

५. चहा, कॉफी आणि कोल्ड ड्रिंक Tea, Caffe or Cold Drinks

स्तनपान करत असताना दिवसभरात २ कपांपेक्षा जास्त चहा किंवा कॉफी घेऊ नका. शक्य असेल तर पूर्णतः टाळू शकता. कॅफेन च्या जास्त प्रमाणामुळे आईच्या दुधाच्या प्रमाणावरही परिणाम होतोच त्याचप्रमाणे बाळालासुद्धा उलटी, झोप न येणे, सतत चिडचिड करणे किंवा अपचन यासारखा त्रास होण्याची शक्यता असते. आपल्या आहारामध्ये कॅफेनच प्रमाण जेवढं कमी असेल तेवढा आरोग्यासाठी उत्तम.  त्यामुळे शक्य तेवढा या पदार्थाचे सेवन कमी ठेवावे.

६. गॅस निर्माण करणारे पदार्थ Gassy Food Items 

नवजात बाळांमध्ये पोटामध्ये गॅस होण्याच्या समस्या जास्त जाणवतात. या काळामध्ये बाळाची पचनक्रिया नाजूक असते शिवाय स्तनपान करत असताना अतिरिक्त हवा पोटामध्ये गेल्यानेही बाळाच्या पोटामध्ये गॅस होत असते. आईच्या आहारामध्ये गॅस निर्माण करणारे पदार्थ जास्त प्रमाणात येत असतील तर बाळाला हा त्रास जास्त प्रमाणात जाणवतो. 

जमिनीत उगवणाऱ्या ज्या मूळभाज्या (Root Vegetables) आहेत जसे कि गाजर, मुळा , बटाटे यामुळे गॅस होण्याची शक्यता जास्त असते. याचा अंश दुधातून बाळालाही मिळतो त्यामुळे बाळाच्याही पोटामध्ये गॅस होऊ शकतो. असे पदार्थ शक्यतो दुपारच्या जेवणामध्ये घ्या पण रात्रीच्या वेळी शारीरिक हालचाल म्ह्नणावी तेवढी होत नाही त्यामुळे गॅस होण्याच्या शक्यता जास्त असतात. त्यामुळे असे पदार्थ रात्रीच्या जेवणामध्ये टाळावेत.

आई आणि बाळाची पचनक्रिया व्यवस्थित राहावी यासाठी आईच्या आहारामध्ये हिंगाचा वापर जरूर करा, भरपूर पाणी प्या आणि जिरे, बडीशेप, ओवा असे आपल्या किचनमध्ये आरामात उपलब्ध असणारे पदार्थ जेवण झाल्यानंतर चघळून खा. हे सर्व पदार्थ आपले पाचन सुधारण्यास मदत करतात. 

७. उग्र वास येणारे पदार्थ Food with Foul smell 

लसूण, कांदा , मुळा किंवा कोबी असे जे पदार्थ आहेत याना खूप जास्त उग्र वास असतो ज्यामुळे दुधाचीही चव बदलते आणि कदाचित त्यामुळे बाळ दूध पिण्यास नकार देऊ शकते त्यामुळे अश्या पदार्थांचे प्रमाण हे आहारामध्ये कमी असावे. लसूण जरूर खाऊ शकता आईचे दूध वाढवण्यासाठी प्रभावी असतो पण कच्चा लसूण खाणे टाळावे.

बाळ जोपर्यंत स्तनपान घेत आहे तोपर्यंत आईने घरामध्ये बनवलेला ताजा, सकस, पौष्टिक आणि पुरेसा आहार घेणे आवश्यक आहे. शिळे पदार्थ खाऊ नयेत. डाएटिंग करण्याचा किंवा वजन कमी करण्याचा विचार करू नये. आई जेवढा पौष्टिक आणि पुरेसा आहार घेईल तेवढे बाळाचे वजन आणि आरोग्य उत्तम राहील.

तर या लेखामध्ये आपण स्तनपान करणाऱ्या आईने कोणते पदार्थ खाणे टाळावे आणि का टाळावेत (Foods To Avoid During Breastfeeding) याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली मला खात्री आहे तुम्हाला या माहितीचा नक्की उपयोग होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

डिलिव्हरीनंतर बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी?

स्तनपान करणाऱ्या आईने हे पदार्थ खाणे टाळावे .

बाळाच्या विकासाचे टप्पे   

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top