बाळंतपणानंतर लैंगिक संबंध कधी ठेवावेत ? Sex After Delivery

Spread the love

बाळंतपणानंतर लैंगिक संबंध कधी ठेवावेत? Sex After Delivery :

नवीन आई बाबांच्या मनामध्ये डेलिव्हरीनंतर लैंगिक संबंध कधी ठेवावेत हा प्रश्न जरूर असतो. सेक्समुळे बाळाच्या स्तनपानावर काही परिणाम होईल का किंवा दुधाची मात्र कमी होईल का किंवा आईला काही त्रास होतो का अश्या शंका असतात. बाळाच्या जन्मानंतर संबध ठेवण्यापूर्वी बऱ्याच गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. डिलिव्हरी कोणत्या प्रकारे झाली आहे , टाके पडले आहेत का किंवा काही समस्या निर्माण झाल्या होत्या का अश्या अनेक गोष्टी विचारात घेणे आवश्यक असते. याशिवाय डेलिव्हरीनंतर आई शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अशक्त झालेली असते. हा अशक्तपणा जाण्यासाठी साधारणपणे २-३ महिने लागतात. बाळाच्या संगोपनाच्या जबाबदारी मुळेही थकवा असतो अश्यावेळी आईची मानसिक आणि शारीरिक तयारी असेल तरच लैंगिक संभंध ठेवावेत.

Sex after delivery

नैसर्गिकरित्या प्रसूती झाल्यानंतर किती दिवसांनी संबंध ठेवावेत ? Sex After Normal Delivery 

डेलिव्हरीनंतर पहिल्या ६ आठवड्यापर्यंत योनीमार्गातून रक्तस्त्राव होत असतो. हा रक्तस्त्राव थांबल्यानंतर तुम्ही सेक्स सुरु करू शकता. रक्तस्त्राव होत असताना लैंगिक संबध ठेवल्यास गर्भाशयामध्ये इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. साधारणपणे पहिल्या दीड महिन्यांपर्यंत हा रक्तस्त्राव होत असतो त्यानंतर हळू हळू कमी होत बंद होतो. नॉर्मल डेलिव्हरीनंतर दीड महिन्यानंतर संबध ठेऊ शकता.डिलिव्हरी दरम्यान काहीही समस्या आल्या असतील तर एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच संबंध ठेवावेत. 

नॉर्मल डेलिव्हरीमध्ये योनीभागात टाके पडल्यास कधी संबंध ठेवावेत?

नॉर्मल डेलिव्हरीच्या दरम्यानही बऱ्याचदा योनीभागात टाके पडतात. हे टाके भरून येण्यास २-३ महिने वेळ जावा लागतो. टाके पूर्ण भरून येण्यापूर्वीच जर संबध ठेवले तर जखम वाढण्याची आणि इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. अश्यावेळीही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच लैंगिक संबध सुरु करावेत . 

नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन डेलिव्हरीदरम्यान पडलेले  हे टाके लवकरत लवकर भरून येणे गरजेचे असते . 

डेलिव्हरीदरम्यान पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी, कोणत्या टिप्स वापराव्यात हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. डिलिव्हरीमध्ये पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी?(How to take care of stiches in delivery?)

सिझेरिअन डिलिव्हरी नंतर संबध कधी ठेवावेत? Sex After C Section Delivery

सिझेरिअन डेलिव्हरीमध्ये पोटावर टाके पडलेले असतात , हे टाके भरून येण्यास २-३ महिने लागू शकतात. अश्यावेळी टाक्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. टाके भरून आले असले तरीही लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.

आईचे मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य जपून लैंगिक संबंध ठेवले जात असतील तर त्याचा बाळाच्या स्तनपानावर किंवा आईच्या दुधाच्या प्रमाणावर काहीही परिणाम होत नाही.

डिलिव्हरीनंतर संबंध ठेवण्यापूर्वी या महत्वाच्या टिप्स जरूर वाचा. 

बाळाच्या जन्मानंतर बऱ्याचजणांना लैंगिक जीवन संपले असे वाटतं पण असं काही नाही. नवीन आईला बाळाची वाटणारी काळजी, जबाबदारी आणि शरीरामध्ये जाणवणारा अशक्तपणा या सर्व कारणांमुळे लैंगिक संबंधबद्दल आधी एवढे आकर्षण वाटत नाही पण याचा अर्थ लैंगिक जीवन संपले आहे  असा होत नाही. 

डिलिव्हरीनंतर फक्त काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे असते. Some Important Things To Know After Delivery 

१. डेलिव्हरीदरम्यान पडलेले टाके आणि वेदना कमी होऊ द्या.  – डिलिव्हरीनंतर शरीराची झालेली झीज आणि वेदना कमी येण्यास बराच कालावधी लागतो. साधारणपणे दीड ते दोन महिने टाके भरून येण्यास लागू शकतात. योनीमार्गात टाके पडलेले असल्यास होणाऱ्या वेदनाही जास्त असतात. त्यामुळे जोपर्यंत पूर्णतः हे टाके भरून येत नाहीत तोपर्यंत संबंध ठेऊ नका. 

२. गर्भनिरोधक उपायांचा वापर करा. – नुकत्याच झालेल्या डिलिव्हरीनंतर पुन्हा शरीर नवीन जिवाच्या वाढीसाठी तयार नसते. डिलिव्हरीनंतर जरी मासिक पाळी सुरु झाली नसेल तरीसुद्धा गर्भधारणा होऊ शकते. अश्यावेळी योग्य ते गर्भनिरोधक उपायांचा वापर करा. 

३. ल्युब्रिकंटचा वापर करा. – डिलिव्हरीननंतर बऱ्याच महिलांच्या गुप्तांगामध्ये नैसर्गिक ओलावा राहत नाही. अश्यावेळी शारीरिक संबध वेदनादायक वाटतात. जर तुम्हाला असा त्रास जाणवत असेल तर लिक्विड ल्युब्रिकंटचा वापर करा. हे लुब्रीकंत वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. 

Frequently Asked Questions (FAQ)

१. बाळ स्तनपान घेत असताना शारीरिक संबंध ठेवले तर दुधाचे प्रमाण कमी होते का ?

नाही . शारीरिक संबंध ठेवल्याने आईच्या दुधाची मात्र कमी होत नाही परंतु आईच्या मानसिक आणि शारीरिक तयारीशिवाय जर हे संबंध ठेवले गेले तर त्याचा स्ट्रेस येऊन मानसिक दबावामुळे दुधाची मात्र कमी होऊ शकते. 

२. डेलिव्हरीनंतर शारीरिक संबंध ठेवल्यास लगेच गर्भधारणा होऊ शकते का? 

हो. डेलिव्हरीनंतर जरी मासिक पाळी सुरु झाली नसेल तरीसुद्धा शारीरिक संबंध  ठेवल्यास गर्भधारणा होण्याची शक्यता असते. त्यामुळे योग्य ते प्रतिबंधात्मक उपाय करूनच संबंध ठेवावेत. 

३. दोन मुलांमध्ये साधारणपणे किती अंतर असावे? 
गर्भावस्था आणि डेलिव्हरीदरम्यान आईच्या शरीरात असंख्या बदल झालेले असतात. एका नवीन जीवाला जन्म देण्याच्या प्रक्रियेमध्ये आईच्या शरीराची बरीच झीज होते. हि झीज भरून निघण्यासाठी साधारणपणे १.५ ते २ वर्षाचा कालावधी लागू शकतो. आईला पुन्हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या सबळ होण्यासाठी लागणार हा कालावधी योग्य तो असेल तर निरोगी आणि सुदृढ बाळ जन्माला येते. त्यामुळे दोन मुलांमध्ये किमान दीड ते दोन वर्षाचे यानंतर असावे. 

अधिक वाचा

डेलिव्हरीनंतर मासिक पाळी कधी येते ?
नवजात बाळाचे वजन कसे वाढवावे?

डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि पोटाचा राहिलेला घेर कमी करण्यासाठी उपाय Reduce Weight after Pregnancy

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *