बाळ बसायला कधी शिकते ? स्वतःहून आधाराशिवाय बसण्यासाठी टिप्स Baby Developmental Milestone – Sitting
प्रत्येक पालकांना बाळाच्या जन्मापासूनच त्याच्या प्रत्येक गोष्टींचे कुतूहल , कौतुक आणि उत्सुकता असते . बाळ कधी पालथा होणार, बसायला शिकणार , रांगणार कधी बोलणार या सर्व गोष्टींची त्यांना उत्सुकता लागलेली असते . बाळाचे हे सर्व विकासाचे टप्पे योग्य प्रकारे आणि लवकरात लवकर होण्यासाठी ते अपार कष्ट सुद्धा करत असतात.बाळ जसा ५-६ महिन्यांचा होतो त्यानंतर बाळ कधी बसणार किंवा आपण बाळाला बसवू शकतो का ? किती वेळ बसवावे ? बाळाची पाठ दुखणार तर नाही ना ? काय काळजी घ्यावी असे बरेच प्रश्न पालकांच्या मनामध्ये असतात.
बाळ जसा पालथा व्हायला ,रंगायला शिकतो तसे त्याची हाडे आणि स्नायू मजबूत होत जातात . त्यानंतर सुरुवातीला आधाराने आणि हळू हळू आधाराशिवाय बसणेही बाळाला जमते . काही बाळं आधी बसायला शिकतात आणि नंतर रांगतात तर काही आधी रंगायला शिकतात व त्यानंतर बसायला लागतात . प्रत्येक बाळ वेगळा आहे आणि त्याचा विकासही वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो . त्यामुळे पालकांनी खूप ताण न घेता ज्या प्रमाणे बाळाचा विकास होतो आहे त्यानुसर त्याला प्रोत्साहित करावे .या लेखामध्ये आपण मुलाच्या बसणे या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल माहिती पाहणार आहोत , सविस्तर माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
बाळ कधी बसायला लागते ? When Baby Can Sit up?
साधारणतः ५-८ महिन्यांच्या दरम्यान बाळ आधाराने बसते आणि ८-९ महिन्याच्या दरम्यान आधाराशिवाय स्वतःहून बसायला सुरुवात करते. जी मुलं वजनाने थोडी हलकी असतात आणि ऍक्टिव्ह असतात अशी बाळं लवकर बसायला किंवा रंगायला लागतात. पण बाळ जर ९ महिन्याच्या आधी जन्माला आले असेल किंवा काही आरोग्याच्या समस्या असतील तर थोडा वेळ लागू शकतो . पालकांनीसुद्धा बाळाच्या कलाकलाने आणि बाळाचे आरोग्य लक्षात घेऊन योग्य त्या टिप्स वापरून बाळाला बसवण्यास सुरुवात करावी. प्रत्येक बाळ वेगळा आहे आणि प्रत्येक बाळाचा विकासही वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगाने होत असतो त्यामुळे इतर बाळांसोबत तुलना करून बाळ बसत नाही या गोष्टीचे टेन्शन घेऊ नये.
- बाळाला कधी बसवण्यास सुरु करावे ?
- ६ महिन्याचा होईपर्यंत बाळाच्या मानेचे आणि पाठीचे स्नायू मजबूत झालेले असतात. या दरम्यान बाळाला बसवले असता बाळ त्याची मान स्थिर ठेऊ शकते आणि पाठीचीही स्थिती ताठ ठेऊ शकते. जर बाळ त्याची मान धरत नसेल किंवा बसवले असता पाठीचा खूप जास्त बाक निघत असेल तर बाळाला खूप जास्त वेळ बसवू नये त्यामुळे पाठीला बाक येऊ शकतो.
- जर बाळ त्याची मान उत्तम प्रकारे धरू शकत असेल आणि इकडे तिकडे डोके वाळवून पाहत असेल , पोटावर झोपवल्यास त्याच्या हातावर भार देऊन उठण्याचा प्रयत्न करत असेल , पालथा होऊन पुढे सरकण्याचा ,रांगण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पाठीवर झोपवल्यास त्याच्या हातामध्ये तुमचा हात दिल्यास हात ओढून वर उठण्याचा प्रयत्न करत असेल तर तुम्ही बाळाला आधार देऊन बसवू शकता .
- साधारणतः ६-७ महिन्याच्या आसपास बाळ त्याची मान धरू शकते आणि पाठ हि ताठ ठेऊ शकतो त्यावेळी तुम्ही बाळाला आधाराने बसवू शकतो आणि ८-९ महिन्याच्या दरम्यान बाळाची हाडे आणि मांसपेशीही उत्तम प्रकारे मजबूत बनतात. त्यामुळे ८-९ महिन्याच्या दरम्यान बाळाला तुम्ही आधाराशिवाय बसवू शकता.
- बाळाने आधाराशिवाय स्वतःहून बसावे म्हणून टिप्स
- १. बाळाला जास्तीत जास्त त्याच्या पोटावर झोपवावे (Tummy Time)आणि त्याच्या आजूबाजूला रंगीबेरंगी खेळणी टाकावीत म्हणजे ती घेण्यासाठी बाळ त्याची हालचाल करेल आणि उठून बसण्यासाठीही प्रोत्साहित होईल .
२. बाळ त्याच्या पाठीवर झोपले असता त्याचा हात पकडून हळुवारपणे वर उचलण्याचा आणि बसवण्याचा प्रयत्न करावा.
३. बाळाला बसवले असता त्याच्या पाठीला थोडासा आधार द्यावा आणि त्याचे गुडघे वाकवून पाय पुढच्या बाजूला करावेत ज्यामुळे शरीराचा तोल नीट तोलला येईल आणि बाळ इकडे तिकडे झुकणार नाही .
४. बाळाला तुमच्या मांडीवर किंवा पोटावर आधार देऊन, दोन पायांच्या मध्ये ,बाळाच्या फीडिंग चेअर मध्ये किंवा बॉबी पिल्लो लावून बसवावे ज्यामुळे बसण्याची स्तिथी बाळाला आवडायला लागेल आणि त्याचा सरावही होईल .
- बाळाला बसवत असताना काय काळजी घ्यावी ?
- १. सुरुवातीला बाळाला खूप जास्त वेळ बसवू नये.
२. बाळाच्या चहूबाजूला उश्या किंवा मऊ अंथरून लावून आधार द्यावा .
३. बाळाला बसवले असता बाळ मागच्या किंवा पुढच्या बाजूला झुकण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे पुढे आणि मागे उशी ठेवायला विसरू नये.
४. बाळाला बसवत असताना त्याच्या गुडघ्यांची आणि पायांची स्तिती योग्य ती असणे आवश्यक असते . बाळ जर W Shape मध्ये , पाय मागे करून बसत असेल किंवा खूप बाक काढून बसत असेल तर बाळाला त्याचा पुढचा विकासाचा टप्पा म्हणजे चालणे लवकर आणि योग्य प्रकारे जमत नाही.
एकदा का बाळ बसायला शिकले कि त्यानंतर हळू हळू गुडघ्यांवर हात पुढे घेऊन रंगायला शिकते . काही बाळांच्या बाबतीमध्ये रांगणे हा टप्पा वगळून बाळ चालायला लागते तर तेसुद्धा नॉर्मल असते . बाळ रंगायला आणि चालायला कधी शिकते आणि पालकांनी बाळाला रंगायला आणि चालायला लवकर शिकण्यासाठी कसे प्रोत्साहित करावे हे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लेखांच्या लिंक्स चेक करा.
बाळ मान कधी धरते, पालथे/पलटी होते , कधी रांगते , चालायला लागते आणि कधी बोलते हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
या लेखामधून बाळाच्या बसणे या विकासाच्या महत्वाच्या टप्प्याबद्दल आणि पालकांनी घ्यायच्या काळजी आणि टिप्स याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.