बाळ चालायला कधी शिकते? (Walking) बाळ स्वतःहून आधाराशिवाय चालण्यासाठी टिप्स Developmental Milestone Walking

Spread the love
बाळाच्या विकासाचा महत्वाचा टप्पा – चालणे Baby Developmental Milestone – Walking 

प्रत्येक पालकांना बाळाच्या जन्मापासूनच त्याच्या प्रत्येक गोष्टींचे कुतूहल , कौतुक आणि उत्सुकता असते . बाळ कधी पालथा होणार, बसायला शिकणार , रांगणार कधी बोलणार या सर्व गोष्टींची त्यांना उत्सुकता लागलेली असते . बाळाचे हे सर्व विकासाचे टप्पे योग्य प्रकारे आणि लवकरात लवकर होण्यासाठी ते अपार कष्ट हि करत असतात. विशेषतः बाळाच्या चालण्याबद्दल पालकांच्या मनात खूप उत्सुकता आणि काळजीही असते. बाळाचे पहिले पाऊल आणि त्याची घरभर दुडूदुडू चालणे पाहण्यासाठी ते अतिशय उत्सुक असतात. 

असे असले तरीही  “चालणे” हा बाळाच्या विकासाचा सर्वात महत्वाचा टप्पा आहे. बाळाची हाडे आणि मांसपेशी जर मजबूत असतील आणि बाळाने त्याचे पालथे होणे , रांगणे , बसणे हे टप्पे वेळेमध्ये आत्मसात केले असतील तर बाळ चालायला सुद्धा लवकर शिकतो पण प्रत्येक बाळ वेगळा आहे आणि त्याचा विकासही वेगवेगळ्या पद्धतीने होत असतो . त्यामुळे पालकांनी खूप ताण न घेता ज्या प्रमाणे बाळाचा विकास होतो आहे त्यानुसार त्याला प्रोत्साहित करावे .

या लेखामध्ये आपण बाळाच्या चालणे या विकासाच्या महत्वाच्या टप्प्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. बाळ चालायला कधी शिकते, बाळाला कधीपासून आणि कश्याप्रकारे चालायला शिकवावे, कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि आधाराशिवाय बाळाने लवकर चालावे म्हणून काय टिप्स वापराव्यात याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा. 

बाळ चालायला कधी सुरु करते ? When Do Baby Start Walking ? 

साधारणपणे १० महिन्यापासून ते १८ महिन्यापर्यंत बाळ कधीही चालू लागते. बाळाचे लवकर चालणे हे बाळाच्या वाढीवर आणि होत असलेल्या विकासाच्या गतीवर अवलंबून आहे. जे बाळ ९ महिन्याच्या आधी जन्माला आले आहे किंवा ज्या बाळाचे वजन जन्माच्या वेळी कमी होते किंवा जन्मतःच बाळाला काही आजार असेल , हाडे ठिसूळ असतील तर बाळ थोडे उशिरा चालायला शिकते. या उलट ज्या बाळाचे वजन जास्त आहे अश्या बाळालाही चालायला शिकण्यास थोडा वेळ लागू शकतो. अश्यावेळी पालकांनी थोडासा संयम ठेऊन योग्य त्या टिप्स वापरल्या तर बाळ लवकर आणि योग्य प्रकारे चालण्यास मदत होते . 

Walking Milestone

 

बाळाला कधी चालवण्यास सुरु करावे ?

बऱ्याचदा पालकांच्या मनामध्ये शंका असतात कि बाळाला कधीपासून चालवावे, छोट्या बाळाला चालवल्यामुळे काही त्रास तर होणार नाही ना किंवा कधी पासून बाळाला चालण्यास शिकवावे . खाली काही गोष्टी सांगितल्या आहेत जर त्या तुम्हाला तुमच्या बाळाच्या बाबतीमध्ये दिसत असतील तर तुम्ही बाळाला हळू हळू चालवायला सुरु करू शकता . 

१. बाळाला उभे पकडल्यास बाळ जर त्याच्या पायावर शरीराचा भार देऊन उभे राहत असेल आणि पुढे पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर बाळ हळू हळू चालवू शकता.साधारणपणे ८ महिन्यांच्या आसपास बाळ हा त्याच्या दोन्ही पायावर सामान भार देऊन आधाराने उभे राहते आणि हळू हळू एक एक पाऊल पुढे टाकण्याचाही प्रयत्न करते . 

२. मांडीवर बसवून बाळाचे हात पकडल्यास बाळ जर हात ओढून उभे राहण्याचा प्रयत्न करत असेल तर बाळ चालण्यासाठी तयार झाला आहे असे समजू शकता. अश्याप्रकारे जर बाळ करत असेल तर बाळ त्याच्या शरीराचे वजन त्याच्या दोन्ही पायावर पेलवण्यास तयार झालेला आहे आणि अश्यावेळी तुम्ही बाळाला चालण्यास प्रोत्साहित करू शकता . 

३. उभे केल्यास बाळ जर त्याची पाठ ताठ ठेऊन उभे राहत असेल तर बाळाला चालायला शिकवण्यास अशीच हरकत नसते.जयप्रमाणे बाळाने मान धरणे महत्वाचे असते त्याचप्रामाने बाळाची पाठ ताठ राहणे हि गरजेचे असते. बाळ जर पाठ ताठ ठेऊ शकत असेल तर तो योग्य प्रकारे बसूही शकते आणि चालूही शकते. 

सुरुवातीला बाळ गुडघे वाकवून चालते त्याला Bow Leg Condition म्हणतात. बाळाच्या शरीराचा भार योग्य प्रकारे राखला जावा आणि चालणे सोईस्कर व्हावे यासाठी लहान बाळ पाय गुडघ्यातून वाकवून आणि पायामधे थोडे अंतर ठेऊन चालते.  पण यासाठी जसा बाळ मोठा होतो, चालण्याचा सराव होतो तसे ते कमी येते आणि बाळ योग्य प्रकारे चालू लागते.. लवकर कमी येण्यासाठी दिवसातून ३-४ वेळा बाळाच्या पायाचे, तळव्यांचे योग्य प्रकारे मालिश करावे. 

 

बाळाने आधाराशिवाय स्वतःहून चालावे म्हणून टिप्स  How to help baby walk independently ?

१. बाळाला जास्तीत जास्त त्याच्या पोटावर (Tummy Time)झोपवावे आणि दिवसातून २-३ वेळा पूर्ण शरीराचे आणि विशेषतः पायाचे मालिश करावे. बाळाला त्याच्या पोटावर झोपवले असत बाळाच्या हाताचे , पायाचे स्नायू मजबूत बनतात. बाळ लवकर चालण्यास मदत होते. 
२. बाळाला उभे राहण्याचा सराव करावा कारण बाळ जर आपला तोल सांभाळून उभे राहू शकत असेल तर चालायला लवकर शिकते.
३. बाळाला वॉकर किंवा पांगुळगाडाही देऊ शकता.पण जर बाळ ११ महिन्यांपेक्षा लहान असेल तर शक्यतो बाळाला हाताला धरून चालवावे. वॉकरचा वापर जेवढा कमी ठेवता येईल तेवढा कमी ठेवावा किंवा टाळावा. 
४. बाळाला सोफ्याच्या किंवा भिंतीच्या शेजारी बसवून थोड्या उंचीवर काही खेळणी ठेवावीत म्हणजे ती घेण्यासाठी सोफ्याचा किंवा भिंतीचा आधार घेऊन बाळ उठण्याचा प्रयत्न करेल आणि हळू हळू एक एक पाऊल पुढे टाकेल.
५. ११ महिन्यांनंतर बाळाला एका हाताला पकडून किंवा पांगुळगाड्याच्या मदतीने चालण्यास प्रोत्साहित करावे म्हणजे आधाराशिवाय लवकर चालायला शिकतात .
६. शक्यतो बाळाला अनवाणी पायानी चालू द्यावे म्हणजे जमिनीची चांगली पकड लक्षात येते आणि बाळाला त्याचा तोल नीट सावरण्याची क्षमता येते. 

७. बाळ स्वतःहून योग्य प्रकारे आणि आधाराशिवाय लवकर चालू लागण्यासाठी बाळाच्या बसण्याच्या स्थितीवरही लक्ष देणे आवश्यक आहे . बाळ जर पायावर W-Shape Sitting शेप मध्ये बसत असेल किंवा पाय गुडघ्यातून वाकवून पायावर असत असेल तर पायांच्या हांडांची ठेवण त्याच प्रकारे होते आणि बाळाला चालताना स्वतःचा तोल सावरण्यास समस्या निर्माण होऊ शकतात. 

 

बाळाला चालायला शिकवत असताना काय काळजी घ्यावी ? Things your should keep in mind while teaching baby walking 

१. वॉकर चा वापर खूप जास्त करू नये . दिवसभरात अर्धा एक तास ठीक आहे पण त्यापेक्षा जास्त नाही .शिवाय फारशींवरून खूप वेगामध्ये वॉकर फिरणार नाही याची काळजी घ्यावी . वॉकरचा वेग जर जास्त राहत असेल तर बाळाच्या पायांची ठेवण बदलते शिवाय बाळ चालत असताना तळपाय वाकडे टाकून चालू लागते. हे टाळण्यासाठी वॉकरचा वापर मर्यादित असावा आणि वेगावरही नियंत्र असावे.  

२. बाळाला पालकांच्या निरीक्षणाखालीच वॉकर मध्ये बसवावे. फरशीवर किंवा घसरड्या पृष्ठभागावर किंवा पायऱ्यांवर वॉकर वेगामध्ये गेल्यास अपघात होण्याची शक्यता असते त्यामुळे बाळाला वॉकरमध्ये ठेवल्यानंतर पालकांनाच पूर्ण लक्ष बळावर असावे. 

३. बाळाला उभा राहिले असता मागच्या किंवा पुढच्या बाजूला झुकण्याची जास्त शक्यता असते .बाळाच्या डोक्याचे वजन शरीराच्या वजनाच्या मानाने जास्त असते त्यामुळे उभे राहिल्यानंतर शरीराचा तोल जाण्याची शक्यता असते. त्यामुळे सुरुवातीला बाळाला योग्य तो आधार देऊन बाळ पडणार नाही याची काळजी घेऊन चालायला शिकवावे. 
४. पायामधे खूप जाड बूट घालून चालवू नये .पायामधे जर जड बूट किंवा चप्पल असेल तर पृष्ठभागाशी पकड नीट होत नाही शिवाय बाळाला पाय उचलणे आणि पाऊल पुढे टाकणे अवघड जाते म्हणून सुरुवातीला बाळाला अनवाणी पायाने चालायला शिकवावे. 

 
बाळ मान कधी धरते ,पालथे/पलटी होते , कधी रांगते , चालायला लागते आणि कधी बोलते हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

या लेखामधून मी तुम्हाला बाळ कधी चालायला शिकते आणि लवकर आधाराशिवाय चालण्यासाठी काही टिप्स याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

बाळ चालायला कधी शिकते? (Walking) बाळ स्वतःहून आधाराशिवाय चालण्यासाठी टिप्स Developmental Milestone Walking

मुलांना रंगांची आणि आकारांची ओळख कशी करून द्यावी ? How to teach colors and shapes to preschoolers In Marathi

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *