लहान बाळासाठी आईचे दूध हा प्रमुख आणि संपूर्ण आहार असतो आणि हा आहार बाळाला वेळेवर योग्य प्रकारे आणि पुरेसा मिळणे हे अत्यंत आवश्यक असते बाळाच्या उत्तम वाढ आणि विकासासाठी. बऱ्याचदा नवीन आईला बाळाला स्तनपान करत असताना खूप साऱ्या समस्या येतात. जसे कि बाळाच्या पोटामध्ये गॅस होणे, स्तनपान असताना वेदना होणे, बाळ खूप जास्त रडणे किंवा स्तनपान न घेणे . या सर्व समस्या बाळाला योग्य प्रकारे स्तनपान न केल्याने येऊ शकतात .
नवीन आईला बाळाला स्तनपान कश्याप्रकारे करावे हे माहिती नसते किंवा त्याप्रकारे तिला मार्गदर्शन मिळत नाही. स्तनपानाची अयोग्य स्तिथी, अयोग्य पकड आणि आईचे मानसिक स्वास्थ्य या गोष्टींमुळे बाळाला पुरेश्या प्रमाणात दूध मिळत नाही आणि पोटाच्या समस्या वाढू लागतात. आजच्या या लेखामध्ये बाळाला स्तनपान कसे करावे काय काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. तुमच्याही घरामध्ये जर कोणी नवीन बाळ असेल तर आजचा हा लेख खूप जास्त माहितीपूर्ण ठरणार आहे शेवटपर्यंत जरूर वाचा .
१. स्तनपान करताना आईने बाळाला घेऊन एखाद्या वेगळ्या खोलीमध्ये जिथे जास्त गोंधळ , गडबड, माणसांची ये-जा नाही अश्या ठिकाणी बसावे. ज्यामुळे स्तनपान करत असताना आईला आणि बाळालासुद्धा कोणताही व्यत्यय येणार नाही .
२. बाळाला स्तनपान करताना आईने मांडी घालून किंवा एखाद्या खुर्चीवर पायावर पाय ठेवून पाठीला अराम मिळण्यासाठी टेकून बसावे आणि कोणतीही घाई न करता हळुवारपणे बाळाला मांडीवर घ्यावे , हवी असल्यास मांडीवर उशी घेऊ शकता.
३. ज्या बाजूला स्तनपान करायचे आहे ती मंडी हलकीशी वर असावी किंवा त्याबाजूला बाळाचे डोके ३० डिग्री मध्ये वरती राहील अश्या पद्धतीने बाळाला पकडावे.
४. एक हाताने बाळाच्या मानेला आधार देऊन दुसऱ्या हाताने स्तन C होल्ड नि पकडावे . ज्यामुळे भरलेल्या स्तनांचे ओझे बाळाच्या नाकावर पडणार नाही , श्वास कोंडला जाणार नाही आणि बाळ आराममध्ये पोटभर दूध पिऊ शकेल.
५. स्तनपान करताना बाळाच्या अंगावर न झुकता बाळाला वर स्तन तोंडामध्ये येईल अश्या प्रकारे पकडावे.
६. बाळाच्या तोंडामध्ये निप्पल देण्यापूर्वी बाळाने तोंडाचा मोठा ‘आ ‘ केला आहे का ते पाहावे आणि निप्पल भोवतीचा काळसर भाग पूर्णतः बाळाच्या तोंडामध्ये जाईल याची काळजी घ्यावी. ज्यामुळे निप्पल ची पकड छान होईल आणि आईलासुद्धा निप्पलला वेदना होणार नाहीत.
७. दोन्ही बाजूला कमीत कमी १०-१५ मिनिट बाळाला स्तनपान करावे. लगेच बाजू बदलू नये कारण सुरुवातीला येणाऱ्या दुधामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते , बाळ जसा दूध ओढेल त्यानंतर हळू हळू दूध घट्टसर होत जाते ज्यामध्ये अन्नघटकांचे प्रमाण जास्त असते . असे दोन्ही प्रकारचे दूध बाळाला असते ज्यामुळे बाळाला पुरेश्या प्रमाणात पाणी आणि पोषणही मिळेल.
(हे वाचा :- स्तनपान जाणाऱ्या आईचा आहार )
८. एक बाजूला दूध पूर्णपणे पाजून झाले , स्तन रिकामे झाले कि दुसऱ्या बाजूला पाजायला घ्यावे . कधीकधी बाळाची भूक एक बाजूच्या दुधानेच भागते. अश्यावेळी पुढच्या दूध पाजताना अर्धवट राहिलेल्या बाजूने आधी सुरुवात करावी.
९. बाळाला दूध पाजताना आईने आनंदी, प्रसन्न आणि शांत असावे. कोणताही स्ट्रेस , टेन्शन न घेता सकारात्मक विचार करावा. ज्यामुळे आईचे सकारात्मक ऊर्जा बाळामध्ये जाते आणि आईच्या दुधाची मात्र आणि गुणवत्ता वाढते ज्यामुळे बाळाची वाढ सुद्धा उत्तम प्रकारे होते.
१०. शक्यतो पहिल्या ३-४ महिन्यापर्यंत बाळाला बसूनच दूध पाजावे. आई खूप थकली असेल तर झोपून दूध पाजू शकता पण त्यावेळी आईचा डोळा लागणार नाही आणि बाळाचा श्वास कोंडला जाणार नाही याची काळजी घ्यावी. झोपून दूध पाजत असताना बाळाच्या डोक्याखाली हलका सपोर्ट द्यावा, ज्यामुळे डोके थोडे वर राहील, बाळाच्या कानामध्ये , नाकामध्ये दूध जाणार नाही आणि बाळ व्यवस्थित दूध पिऊ शकेल .
११. स्तनपान करून झाल्यावर बाळाची ढेकर जरूर काढावी ज्यामुळे स्तनपान करत असताना बाळाच्या पोटामध्ये गेलेली अतिरिक्त हवा बाहेर पडेल , बाळ उलटी करणार नाही आणि पोटामध्ये गॅस हि होणार नाही .
१२. बाळाला स्तनपान करताना आई आणि बाळ यांचा स्किन तो स्किन कॉन्टॅक्ट झालाच पाहिजे म्हणजे आईचे आणि बाळाचे पोट एकमेकांना चिकटायला हवे. यामुळे आईच्या दुधाची मात्र आणि गुणवत्ता वाढते .
१३. बाळाला वाटी- चमचा , बाटलीने दूध पाजणे शक्यतो टाळावे. ज्यामुळे जंतू संसर्ग होण्याचा धोका टळेल , बाळाच्या पोटामध्ये गॅस होणार नाही आणि आईला सुद्धा पुरेसे दूध येण्यास मदत होईल .
या लेखामधून मी तुम्हाला बाळाला स्तनपान कसे करावे ,काय काळजी घ्यावी. याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
बाळाच्या आरोग्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या यू-ट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता.