How To Choose Best School For Child in 2022 ? मुलांसाठी प्राथमिक शिक्षणासाठी शाळा निवडत असताना या गोष्टी घ्या लक्षात

Spread the love
How To Choose Best School For Your Child in 2022?

Choose Best Primary School For Your Child in 2022 in Marathi

सामान्यतः आपण आपल्या मुलांसाठी शाळा निवडत असताना आपल्या शेजाऱ्यांचा, नातेवाइकांचा मुलगा किंवा मुलगी ज्या शाळेत जातात ती शाळा निवडतो किंवा ज्या शाळेचं नाव असत , ज्याची फी जास्त असते तर तिथे शिक्षण उत्तम असते असा समज  करून ती शाळा निवडतो . पण मुलांसाठी शाळेची निवड करत असताना पालकांनी शाळेबद्दलच्या काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते, ज्यामुळे मुलांना तिथे उत्तम प्रकारचे शिक्षण मिळेल आणि कोणत्याही गोष्टीचा पाल्यांवर किंवा पालकांवर दबाव येणार नाही.

या लेखामध्ये आपल्या मुलांसाठी योग्य शाळेची निवड करता असताना महत्वाच्या गोष्टीबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन जर बाळासाठी शाळेची निवड करत असाल तर ती शाळा मुलांसाठी नक्कीच उत्तम असेल.

मुलांसाठी प्राथमिक शिक्षणासाठी शाळा निवडत असताना या गोष्टी घ्या लक्षात (How Do Parents Choose a School For their Child)

१. घरापासून शाळेपर्यंतचे अंतर (Distance from home to school)- 

मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी जी शाळा घरापासून सर्वात जवळ असेल त्या शाळेची निवड करा . लहान वयामध्ये मुलांना जर शाळेला जाण्यासाठी खूप प्रवास करावा लागत असेल तर मुलांची ऊर्जा प्रवासामध्ये जास्त खर्च होते , मुलं लवकर कंटाळतात आणि हळू हळू त्यांना हि ये जा नको वाटायला लागते शिवाय पालकांनाही जर तातडीने शाळेमध्ये जावे लागले तर त्यांच्यासाठी सुद्धा हे सोयीचे होते . म्हणून प्राथमिक शिक्षणासाठी जवळच्या शाळेचा पर्याय पाल्यांसाठी आणि पालकांसाठीही सोयीचे असते. 

 २. शाळेची फी (School fees)- 

पालकांना परवडेल अशी ज्या शाळेची फी असेल ती शाळा निवडावी. जर शाळेची फी खूप जास्त असेल तर त्याचा ताण तुमच्या खिशावर येतो आणि त्यामुळे आर्थिक स्थिरता ढासळू शकते. प्राथमिक शिक्षणासाठी असणारी फी जर तुम्हाला परवडणारी नसेल तर मुलांच्या पुढच्या उच्च शिक्षणासाठी तरतूद करणेही अवघड जाऊ शकते. त्यामुळे शाळेची फी जास्त म्हणून तिथे शिक्षण चांगले हा समाज न ठेवता जी फी आपल्याला परवडेल अश्याच शाळेची निवड करा.  

 ३. मुलांची सुरक्षितता (Child safety) –

आपल्या मुलांना ज्या शाळेमध्ये आपण ३-४ तास ठेवणार असतो त्या शाळेचे वातावरण सुरक्षित असणे गरजेचे आहे . शाळेमध्ये मुलांची काळजी आणि सुरक्षितता कश्या प्रकारे पहिली जाते हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला शाळेच्या वेळेमध्ये शाळेला भेट द्यावी लागेल किंवा जे अनुभवी पालक आहेत त्यांच्याशी संवाद साधावा लागेल . शाळेची सेक्युरिटी , तिथे काम करणारा सर्व स्टाफ, मुलांची सुरक्षितता या सर्व गोष्टी जरूर पाहाव्यात .

 ४. शिक्षणासोबतच इतर कलागुणांना वाव मिळणे (Curriculum and co-curricular activities.

मुलांना शिक्षणासोबतच इतर कलागुणांना ज्या शाळेमध्ये वाव मिळतो ती शाळा नेहमीच मुलांसाठी उत्तम असते . पुस्तकी ज्ञानासोबतच मुलांच्या अंगात असणाऱ्या सुप्त कलागुणांना वाद देऊन मुलांना प्रोत्साहन देणे सुद्धा आवश्यक असते .

 ५. शिक्षक पालक रेशो (Teacher – Child Ratio )- 

मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी शाळेमध्ये एक शिक्षक किती मुलांना नियंत्रित करतो आहे हे जाणून घ्या म्हणजे प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक लक्ष राहील , मुलांसाठी काही ऍक्टिव्हिटीएस किंवा शिकवणे चांगल्या प्रकारे होईल. कोणाकडे हि दुर्लक्ष होणार नाही.

६. मुलांच्या समस्या लक्षात घेऊन त्यानुसर शिक्षण (Education according to the problems of the children) – 

मुलांसाठी शाळेची निवड करत असताना जर तुमच्या पाल्याबाबत काही समस्या असतील म्हणजे मूळ जर लाजाळू असेल , कमी बोलत असेल किंवा अजून काही समस्या असतील तर त्या शिक्षकांना सांगा आणि त्यानुसर ते मुलांना समजून घेऊन सर्व गोष्टी शिकवतील याची खात्री करून घ्या . जर तसे नाही झाले तर मुलांचा आत्मविश्वास कमी होतो, वारंवार दुर्लक्षित झाल्याने त्यांच्या मध्ये न्यूनगंड निर्माण होतो आणि शाळेबद्दल किंवा अभ्यासाबद्दलची गोडी कमी होते .

७. शारीरिक शिक्षा (Physical Punishment)- 

ज्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षा मुलांना केली जाते तर ती शाळा मुलांसाठी निवडू नका. आत्ताच्या पिढीला शारीरिक शिक्षा करण्यापेक्षा समजावून त्यांच्या कलाकलाने सांगणे जास्त आवश्यक आहे आणि कोणतीही गोष्ट शिकवण्यासाठी किंवा समजावण्यासाठी शारीरिक शिक्षेची गरज नसते.ज्या शाळेमध्ये शारीरिक शिक्षा केली जाते तिथे आपली मूळ सुरक्षित असू शकत नाहीत शारीरिकही नाही आणि मानसिकही नाही . अश्या वातावरणामध्ये मूळ नेहमी दबावाखाली राहतात ज्यामुळे शाळा किंवा ते वातावरण त्यांना आवडत नाही आणि नक्कीच याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावरही होतो . 

मुलांना अभ्यासाची गोडी लावण्यासाठी महत्वाच्या टिप्स असणारा हा लेख जरूर वाचा 

मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी.

वर दिलेले जे पॉईंट्स आहेत ते लक्षात घेऊन जर तुम्ही तुमच्या मुलांच्या प्राथमिक शिक्षणासाठी शाळेची निवड करत असाल तर ती शाळा मुलांसाठी नक्कीच उत्तम असेल .

FAQ (Frequently Asked Questions)

१. मुलांना शाळेमध्ये कधी घालावे ?
सामान्यतः बाळाला ३.५ वर्षे पूर्ण झाल्यावरच शाळेमध्ये घालण्याचा विचार करावा कारण तोपर्यंत बाळ बऱ्यापैकी समजदार बनलेला असतो. ३.५ वर्षानंतर बाळाला प्लेस्कूल मध्ये ऍडमिशन मिळते आणि त्यानंतर नर्सरी , LKG , UKG असा पुढचा प्रवास सुरु होतो . बाळाचे दोन्ही पालक जर Working असतील आणि मुलांना घरामध्ये सांभाळणारी किंवा त्यांना योग्य प्रकारे व्यस्त ठेवणारी व्यक्ती नसेल तर ३.५ वर्षाच्या आधीही मुलांना प्लायस्कूल / डिकेयर ला ठेऊ शकता .  
 
२. ऑनलाईन स्कूल  गरजेचे आहे का ? 
निदान पहिल्या ४ वर्षांसाठी तरी बाळाला ऑनलाईन स्कूलची गरज नसते . कारण या वयामध्ये मुलांना सर्व शिक्षण हे खेळांतून, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज मधून देणे अपेक्षित असते . ऑनलाईन स्कूलिंग जरी होत असेल तरी बालकडून सर्व गोष्टी पालकांनाच करून घ्याव्या लागतात अश्यावेळी ओंलीने स्कूलसाठी फी भरण्यापेक्षा तुम्ही बाळाला होम स्कूलिंग करू शकता फक्त तुम्हाला त्याचा योग्य मार्ग आणि पद्धत माहिती असायला हवी. 
 
मुलांना इंग्लिश वाचायला कसे शिकवावे. Best Tips To Teach English Reading TO Kids
 
यशस्वी आणि संस्कारी व्यक्ती म्हणून घडवत असताना आपल्या मुलांना द्या या ५ गोष्टीची शिकवण Healthy Parenting Tips
 
बाळ उशिरा का बोलायला शिकते ? बाळ लवकर आणि स्पष्ट बोलण्यासाठी करा हे उपाय (Speech Therapy)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Shopping Cart
Scroll to Top