लहान मुलांनाही येत का डिप्रेशन ? Depression in kids/children

Spread the love
लहान मुलांनाही येत का डिप्रेशन ? Depression In Growing Kids 

आजकालच्या धावपळीच्या युगामध्ये डिप्रेशन हा एक खरंच गंभीर आजार आहे. आपल्याला नेहमी ते वाटू शकते कि ज्या व्यक्तीला जाबदारीच ओझं आहे, खूप सारे व्याप आहेत , टेन्शन आहे अश्या व्यक्तीलाच डिप्रेशन येते पण हा खूप मोठा गैरसमज आहे. डिप्रेशन हा एक गंभीर आजार आहे जो कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होऊ शकतो. यामध्ये लहान मुलंही याची शिकार बनू शकतात. तुमच मुलं उदास आहे, जास्त बोलत नाही, घाबरलेला असते म्हणजे डिप्रेशन मध्ये गेला आहे असे मुळीच नाही , काही लक्षणे , संकेतचिन्हे तुम्हाला मुलं डिप्रेशनची बळी गेली आहेत कि नाही हे सांगतील.या लेखामध्ये लहान मुलांमध्ये डिप्रेशन येण्याची लक्षणे आणि कारणे सांगितली आहेत.

डिप्रेशनची लक्षणे(Symptoms of depression)

 

१)असुरक्षितपणाची भावना निर्माण होणे(Feelings of insecurity)

काही वेळा लहान मुलांना सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती वाटत असते. कित्येक वेळा त्यांचे आई-बाबा बरोबर असूनही त्यांना सुरक्षित वाटत नाही. हे एक डिप्रेशन च मुख्य लक्षण आहे.

 

२)चिडचिडेपणा, राग येणं, सतत दुःखी आणि उदास राहणे(Irritability, anger, constant sadness and depression)

काही मुलं अगदी लहानसहान गोष्टींवरून देखील चिडतात. त्यांची चिडचिड सतत चालू असते. आपण म्हणतो पराचा कावळा करतात म्हणजेच अगदी  गोष्टीचा  देखील बाऊ बनवतात. त्यांना लगेच राग येतो. तसेच मुले सतत दुःखी,निराश,उदास राहतात. त्यांना कोणाशी बोलावेसे वाटत नाही कोणाशी खेळावेसे वाटत नाही.

 

३)भूक न लागणे(Loss of appetite)

बऱ्याच वेळा मुलांना भूकदेखील लागत नाही किंवा जरी भुक लागत असेल तरीदेखील काही खायची त्यांची इच्छा होत नाही. अगदी त्यांच्या आवडीचे जरी दिले तरीदेखी मुले खाण्यासाठी टाळाटाळ करतात.

बाळाला भूक न लागण्याची कारणे आणि भूक वाढवण्यासाठीचे  घरगुती उपाय |Loss Of Appetite In Children : Causes and Best 9 Tips To Improve It

 

४)सतत थकवा येणे आणि अशक्तपणा जाणवणे(Constant tiredness and feeling weak)

लहान मुले ही खूप ऍक्टिव्ह असतात. त्यांची energy level ही खूप जास्त असते. परंतु जर त्यांना डिप्रेशन आले असेल तर त्यांना मैदानी खेळ न खेळताच सतत थकवा येतो. अशक्तपणा जाणवतो.

 

५)कारण नसताना रडू येणे, लक्ष न केंद्रित करू शकणे(Crying for no reason, not being able to concentrate)

बऱ्याच वेळा मुलांना काही कारण नसताना देखील रडू येते. त्यांचे अभ्यासात किंवा इतर कोणत्याही गोष्टींमध्ये लक्ष केंद्रित(concentrate) होऊ शकत नाही. काहीही करण्यासाठी ते फक्त टाळाटाळ करतात.

 

६)काहीच न करण्याची इच्छा होणे(Wanting to do nothing)

बऱ्याच वेळा मुलांना कशातच उत्साह वाटत नाही. त्यांची काहीही करायची इच्छा होत नाही.त्यांना काहीही नवीन करावेसे वाटत नाही. कोणतीही नवीन गोष्ट शिकायची इच्छा होत नाही.  

 

७)डोकेदुखी होणे. सतत आजारी पडणे(Headache. Constantly getting sick)

बरीच मुले तर हे सांगतात की आमचे डोके दुखत आहे,सतत आजारी पडतात. त्यामुळे त्यांचे कशातच लक्ष लागत नाही.

 

८)झोप न लागणे(Insomnia)

बऱ्याचदा मुलांना शांत झोपदेखील लागत नाही. ते थोड्या थोड्या वेळाने उठतात. त्यांची झोप चाळवली जाते. त्यांच्या मनात सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीची भीती असते.

 

९)लोकांसोबत संवाद न साधणे(Not communicating with people)

बरीच मुले त्यांच्या मित्रमैत्रिणींबरोबर देखील बोलत नाहीत. जर घरी नातेवाईक आले तर त्याच्याशी देखील बोलणे टाळतात. त्यांना कोणाशीच बोलायचे नसते. अशी मुले फक्त आपल्याआपल्यामध्येच असतात.

 

१०)मरणाचा विचार मनात येणे(The thought of death comes to mind)

काही लहान मुलांच्या मनात मरणाचा देखील विचार मनात येतो. जेव्हा की त्यांना मरणाचा अर्थ देखील व्यवस्थित समजलेला नसतो. बऱ्याच वेळा मुलांच्या मनात आत्महत्येची(suicide) भावना निर्माण होते.  

 

११)अपराधीपणाची भावना निर्माण होणे(Feelings of guilt)

बऱ्याच वेळा मुलांच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण होते. त्यांना कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे सतत दडपण असते आणि दडपणाखाली असल्यामुळे ही मुले मोकळेपणाने जगू शकत नाहीत.

जाणून घ्या लहान मुलांना का येते डिप्रेशन
कमी करा त्यांचे थोडे तरी टेन्शन
 
नका देऊ त्यांना कोणतेही प्रेशर वावरू दे त्यांना स्वछंदी
मुलेही राहतील मग नेहमीच हसतमुख,खेळकर आणि आनंदी
 
जाणून घ्या मुलांची मते करा त्यांचा आदर
नाही करणार मुलेही मग तुमचा कधीच अनादर 
Depression in kids
मुलांना डिप्रेशन का येत ?(Why do children suffer from depression?)

 

१. मानसिक दबाव(Mental stress)

 

कुटुंबामध्ये किंवा शाळेमध्ये मोठ्या वयाच्या मुलांकडून किंवा व्यक्तींकडून सतत दमदाटी केल्यामुळे, झिडकारल्यामुळे मूले  तणावाखाली राहतात आणि त्याचे रूपांतर हळू हळू डिप्रेशन मध्ये होते. आई वडील सतत मुलांचे तुलना इतर मुलांसोबत करत असतील, त्यांच्या इच्छा-अपेक्षा मुलांवर लादत असतील तर त्याचाही दबाव मुलांच्या मनावर पडतो आणि हळू हळू मुलं डिप्रेशनचे शिकार बनतात.म्हणूनच आई-वडिलांनी आपल्या इच्छा मुलांवर लादू  नये. जर काही कारणामुळे मुलांना अभ्यासात कमी मार्क मिळाले असतील तरी त्यांना प्रेमाने समजावून सांगण्याचा प्रयत्न करावा. तसेच त्यांना अभ्यासात काही अडचणी येत असतील त्यांच्या मनात काही शंका असतील तर त्या दूर करण्याचा प्रयत्न करावा.

 

२. बदलणारी जीवनशैली व कुटुंबामध्ये होणारी भांडणे(Changing lifestyles and family quarrels)

 

मोठ्या लोकांप्रमाणे लहान मुलं बदल लवकर स्वीकारू शकत नाहीत. नवीन घर, शाळा , नवीन माणसे, परिसर या सर्व गोष्टी मुलांना त्रासदायक वाटतात. तसेच पालकांनी लहान मुलांसमोर कधीच भांडू नये. लहान मुलांचे मन खूप नाजूक असते आणि घरातील भांडणे,वाद याचा मुलांच्या मनावर खोल परिणाम होत असतो. म्हणूनच घरातील वातावरण हे प्रसन्न असायला हवे.

 

३. असंतुलित हार्मोनल बदल(Unbalanced hormonal changes)

 

कधीकधी शरीरामधील  हार्मोन्सच्या असंतुलितपणामुळे लहान मुलांना डिप्रेशन येऊ शकते. हा असंतुलितपणा शरीराला असणारे पोषक घटक न मिळाल्याने आणि शारीरिक हालचाल कमी झाल्याने देखील होऊ शकतो. यामुळे मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकासही म्हणाव्या तेवढ्या चांगल्या दराने होत नाही.

 

४. कौटुंबिक इतिहास(Family history)

 

मुलांच्या कुटुंबियांना डिप्रेशन या आजाराचा त्रास होत असेल तर मुलांमध्येही  ते जास्त प्रमाण जाणवून येते. जेव्हा कुटुंबियांना हा आजार असतो त्यावेळी नक्कीच घरातील वातावरणही पोषक राहत नाही , आनंदी राहत नाही ज्यामुळे मुलांमध्ये असुरक्षितता आणि तणाव वाढतो आणि मुलं डिप्रेशनचे शिकार होतात.

 

ज्या घरातील वातावरण निरोगी, आनंदी आणि सकारात्मक असते, जीवनशैली निरोगी ठेवण्यावर भर असतो, पालक मुलांना पुरेसा वेळ आणि क्वालिटी टाइम देत असतात अश्या मुलांमध्ये डिप्रेशन कधीच जाणवत नाही.म्हणूनच मुलांशी संवाद साधणे  देखील गरजेचे आहे. मुलांच्या मनात काय चालू आहे याची माहिती पालकांना असायला हवी. त्यांना जर एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर ती कमी करण्यासाठी प्रयत्न करायला हवे.

FAQ (Frequently Asked Questions)

1)जर मुलांना डिप्रेशन आले असेल तर ते दूर करण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजेत?

जर काही कारणांमुळे मुलांना डिप्रेशन आले असेल तर सर्वात आधी डिप्रेशन येण्याचे मुख्य कारण काय ते जाणून घेतले पाहिजे.जर मुले स्वतःहून सांगत नसतील तर त्यांच्या मित्र-मैत्रिणींकडून  किंवा जवळच्या व्यक्तीकडून ते जाणून घेतले पाहिजे. कारण समजल्यावर मुलांशी प्रेमाने बोलून त्यांचा प्रॉब्लेम दूर होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ घालवू द्यावा.

2)मुलांमध्ये डिप्रेशन आले असल्यास त्यांना कोणता आहार द्यावा?

आपण जे पदार्थ खातो त्याचा डायरेक्ट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. म्हणूनच या काळात मुलांना निरोगी आहार द्यावा. आहारामध्ये साखरेचे प्रमाण कमी असावे. तसेच आहारात हिरव्या पालेभाज्या,फळे,दूध,कडधान्ये यांचा समावेश असावा.

तर मी आज तुम्हाला लहान मुलांमध्ये येणारे डिप्रेशन,त्याची कारणे (Depression and its causes in children)तसेच ते दूर करण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली मला खात्री आहे तुम्हाला या माहितीचा नक्की उपयोग होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

मुलांना यशस्वी आणि संस्कारी व्यक्ती बनवण्यासाठी द्या या ५ गोष्टींची शिकवण

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *