आई होणे हा प्रत्येक स्त्री च्या आयुष्यातील सर्वात आनंदी आणि अविस्मरणीय असा क्षण असतो. नऊ महिने एका जीवाला ती आपल्या उदरात वाढवते. अत्यंत वेदना आणि त्रास सहन करून ती एका गोंडस बाळाला जन्म देते. या नऊ महिन्याच्या काळात तिच्या शरीरात एक जिवाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी असंख्या बदल होत असतात. पोटाचा आकार वाढतो, वजन वाढ होते.
डिलिव्हरी झाल्यानंतर प्रत्येक नवीन मातेला आपले वाढलेले वजन आणि पोट याबद्दल काळजी वाटत असते. डिलिव्हरीनंतर वजन कमी कसे होते आणि ते कमी करण्यासाठी काय प्रयत्न करावे याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे.
डिलिव्हरीनंतर वजन कमी करण्यास कधी प्रयत्न करावेत?(When to try to lose weight after delivery?)
डिलिव्हरी आणि गरोदरपणाच्या दरम्यान आईच्या शरीरात खूप सारे बदल झालेले असतात. प्रसूतीच्या वेळी झालेला रक्तस्त्राव(bleeding) आणि वेदना(Pain) यामुळे आईचे शरीर थकलेले असते, अशक्तपणा आलेला असतो. तसेच पहिल्या सहा महिन्यांपर्यंत बाळही पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून असते. बाळाला स्तनपान करत असताना आईची खूप सारी ऊर्जा खर्च होत असते . अश्यावेळी बाळाला पुरेसे आणि पोषक दूध मिळण्यासाठी, आईच्या शरीराची झालेली झीज लवकर भरून येऊन अशक्तपणा जाण्यासाठी आईने सकस आणि पुरेसा आहार घेणे आवश्यक असते. जोपर्यंत बाळ पूर्णतः आईच्या दुधावर अवलंबून आहे तोपर्यंत वजन कमी करण्यासाठी डायटिंग किंवा शरीरावर खूप ताण पडणारे व्यायाम करणे चुकीचे आहे.
बाळंतपणानंतर वजन कमी करण्यासाठी योग्य आणि सोपे ते उपाय(The right remedy for weight loss after childbirth)
योग्य तो आहार, विहार, आराम,डिलिव्हरी कश्या प्रकारे म्हणजे सिझेरियन कि नॉर्मल झाली आहे , टाके किती पडले आहेत आणि शरीराची गरज लक्षात घेऊन डिलिव्हरीनंतर सांगितलेले उपाय करावेत.
१. बाळाला भरपूर स्तनपान करणे(Breastfeeding to the baby a lot)
स्तनपान हा आईसाठी सर्वात मोठा व्यायाम आहे ज्यामध्ये शरीरातील खूप साऱ्या कॅलरीज कमी होतात, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. म्हणूनच आईने बाळाला जास्तीत जास्त स्तनपान द्यावे. ज्यामुळे बाळाचे आरोग्यही सुधारेल आणि आईचे वाढलेले वजनही कमी होण्यास मदत होईल.तसेच स्तनपान केल्याने स्तन आणि गर्भाशयाचा कॅन्सर होण्याचा धोका खूप प्रमाणात कमी होतो.
२. आहारामध्ये पाण्याचे मुबलक प्रमाण(Abundant amount of water in the diet)
आपल्या शरीरामध्ये आवश्यक असणारे पाणी पुरेश्या प्रमाणात असेल तर खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचण्यास मदत होते,त्यामुळे वजन आटोक्यात राहते. पाण्यासोबतच पातळ पदार्थ जसे कि फळांचे रस, लिंबू पाणी , नारळ पाणी, जिऱ्याचे पाणी , बडीशेपचे पाणी असे पदार्थही घ्यावेत,यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास आणि नियंत्रित राहण्यास मदत होते. जिरे आणि बडीशेप भाजून ती जेवणानंतर चघळून खावी ज्यामुळे पचनक्रिया सुधारते, पोट साफ राहते, गॅस होण्याचे प्रमाणही कमी होते, वजन कमी होते, शिवाय बाळाला मिळणाऱ्या दुधाचे प्रमाण आणि गुणवत्ताही सुधारते.
३. पोषक आणि पुरेसा आहार (Eating nutritious and adequate food)
डिलिव्हरीनंतर शरीराची झालेली झीज आणि अशक्तपणा कमी होण्यासाठी पौष्टिक आणि पुरेसा आहार घेणे आवश्यक असते. याकाळात शरीराला प्रोटिन्सची गरज असते, यासाठी आहारात दूध व दुधाचे पदार्थ, मटण, मांस, अंडी यांचा समावेश असावा.भरपूर पालेभाज्या आणि फळांचाही समावेश आहारामध्ये जरूर करावा. मसालेदार, तेलकट, तुपकट, फास्टफूड , खूप गोड, चॉकलेट आणि मैद्याचे पदार्थ खाणे टाळावेत. अधिक माहितीसाठी हा लेख जरूर वाचा. स्तनपान करणाऱ्या आईने हे पदार्थ खाणे टाळावे .
४. वजन कमी करण्यासाठी व्यायाम(Exercise to lose weight)
डिलिव्हरीच्या दरम्यान जर पोटावर किंवा योनीमार्गात टाके पडले असतील तर टाक्यावर ताण पडेल असे व्यायाम पहिल्या ४-५ महिन्यांपर्यंत करू नये. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालणे,हलकी योगासने, प्राणायाम करणे, स्ट्रेचिंग असे हलके व्यायाम करावेत.
डिलिव्हरीमध्ये पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी?
५)ज्या पदार्थानी वजन वाढेल असे पदार्थ खाणे टाळा(Avoid foods that cause weight gain)
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर फास्टफूड,जंकफूड,मैद्याचे पदार्थ,तेलकट किंवा तुपकट पदार्थ तसेच चॉकलेट,मिठाई यांसारखे जास्त गोड पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे अनावश्यक चरबी वाढते. याशिवाय आहार घेण्याच्या वेळही निश्चित कराव्यात.
६)डिलिव्हरी नंतर पोट बांधणे (Belly Bonding After Delivery)
फार पूर्वीपासूनच डिलिव्हरी नंतर पोट बांधण्याची पद्धत आहे. आपल्याला वडीलधाऱ्या व्यक्तींकडून सांगितले जाते की डिलिव्हरी नंतर पोट बांधले तर पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. पूर्वीच्या काळात हे पोट बांधण्यासाठी कॉटनची साडी किंवा एखादे लांब सुती कापड याचा वापर केला जात होता. पण आता मार्केट मध्ये बेल्ट मिळतात ज्याला आपण abdominal belt / Postpartum Belly Binding Belt म्हणू शकतो. यामुळे आपण कोणाच्याही मदतीशिवाय हे बेल्ट वापरू शकतो. काही केसेस मध्ये
डॉक्टर हा बेल्ट लावणे recommend करत नाही असे असल्यास बेल्ट लावणे टाळावे.याशिवाय बेल्टचा वापर करत असताना योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.
१. जेवण करत असताना किंवा जेवण झाल्यानंतर लगेच आणि झोपताना बेल्ट लावणे टाळावे.
२. सलग ३-४ तासांपेक्षा जास्त वेळ बेल्ट लावून ठेऊ नये.
३. बेल्ट खूप जास्त घट्ट लावू नये.
४.बेल्ट लावल्यामुळे तुमच्या शारीरिक हालचालीवर काहीही परिणाम होता काम नये.
५.उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शक्यतो घाम जास्त येतो त्यामुळे बेल्ट लावणे टाळावे.
बेल्ट लावणे हे तुमची डिलिव्हरी कशा पद्धतीने झाली आहे किंवा तुमची हेल्थ कशी आहे यावर अवलंबून असते.
डिलिव्हरी नंतर पोट बांधावे का? बेल्ट लावण्याचे फायदे (Benefits of Binding Belly After Delivery)
१)डिलिव्हरी दरम्यान मग ती सिझेरिअन असेल अथवा नॉर्मल असेल तरी खूप जास्त प्रेशर तुमच्या शरीरावर पडते. ज्यावेळी लेबर पेन होत असतात त्यावेळी पाठ आणि कंबर यावर खूप जास्त प्रेशर येते. त्यामुळे पाठीचा भाग किंवा कंबरेचा भाग हा वीक झालेला असतो. अशावेळी त्याला सपोर्ट ची आवश्यकता असते. आणि ज्यावेळी तुम्ही हा बेली बाइंडिंग बेल्ट वापरता त्यावेळी तुम्हाला एक प्रकारचा सपोर्ट मिळतो.तसेच उठताना,बसताना,चालताना,बाळाला घेताना तुम्हाला एक प्रकारचा सपोर्ट मिळतो. हा एक महत्वाचा फायदा या बेल्ट मुळे होतो.
२)डिलिव्हरी नंतर तुमचे गर्भाशय(uterus) नऊ महिने वाढत असते,त्यामुळे तुमच्या पोटाचा आकार वाढत असतो.त्यानंतर बाळाचा जन्म होतो. तेव्हा पोट थोडे लटकलेले राहते. या सर्व गोष्टींसाठी या बेल्टचा चांगला उपयोग होतो. यामुळे पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते.
बाळंतपणात वाढलेले वजन कमी होण्यास काही कालावधी जावा लागतो. हळू हळू वाढलेले वजन कमी होते , शरीर पूर्ववत अवस्थेत येण्यासाठी साधारणपणे ६-८ महिने लागू शकतात. अश्यावेळी संयम ठेऊन योग्य तो आहार आणि व्यायाम ठेवणे आणि वाढलेल्या वजनाचे कोणतेही टेन्शन न घेता संयम ठेवणे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
Frequently Asked Questions (FAQ)
१)डिलिव्हरी नंतर वजन कमी व्यायाम करावा का?
हो, डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन कमी कारण्यासाठी व्यायाम करू शकतो. परंतु तरीदेखील एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. तसेच अति व्यायाम करणे देखील टाळावे.
२)साधारणपणे वजन कमी करण्यासाठी किती कालावधी लागतो?
वजन कमी करण्यासाठी किती कालावधी लागेल हे प्रत्येकाच्या शरीरावर अवलंबून असते. परंतु साधारणपणे सहा ते नऊ महिने लागतात.
तर मी आज तुम्हाला डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि पोटाचा राहिलेला घेर कमी करण्यासाठी उपाय(Reduce Weight after Pregnancy)याबद्दल माहिती दिली. मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल.
जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन .
अधिक वाचा
नॉर्मल डिलिव्हरी कशी केली जाते ?Normal delivery procedure step-by-step