बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालताय ? बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालणे ठरू शकते काळजीच कारण . वाचा कसे ते :-
घरामध्ये लहान बाळ आलं कि त्याच्या बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टी , परंपरा, रीतीभाती पाळण्याबद्दल सांगितल्या जातात. त्यापैकीच खूप जुनी आणि सर्व घरामध्ये वयोवृद्ध लोकांकडून सांगितली जाणारी गोष्ट म्हणजे बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालणे.बाळाच्या जन्मानंतर पाचवीच्या पूजेला बाळाच्या डोळ्यात काजळ घालण्याची प्रथा भारताच्या बऱ्याच ठिकाणी आहे . परंतु आजच्या २१ व्या शतकामध्ये डॉक्टर बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ न घालण्याचा सल्ला देतात आणि बहुतांश पालकांना सुद्धा बाळाला काजळ घालणे आवडत नाही . परंतु घरातील वयस्कर मंडळींचा मात्र मोठा आग्रह असतो कि बाळाला काजळ हे लावलेच पाहिजे .
आजच्या या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत कि लहान बाळांना काजळ घालणे कितपत योग्य आणि सुरक्षित आहे . सविस्तर माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा.
बाळाला काजळ का घालावे ?
बाळाला काजळ घालण्यामागे बरीच कारणे सांगितली जातात जसे कि बाळांचे डोळे मोठे आणि आकर्षक होतात, नजर तीक्ष्ण होते , डोळ्यांना थंडावा मिळतो , बाळांना डोळ्याचा कोणताही आजार होत नाही , बाळाला कोणाचीही वाईट नजर लागत नाही . पण वास्तविक पाहता यापैकी कोणत्याच गोष्टीचा वैज्ञानिक दृष्ट्या पुरावा नाही .
काजळ म्हणजे नक्की काय असते ?
काजळ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून दिव्यावर आलेली काळी काजळी असते. विजलेल्या दिव्याच्या वातीवर जी काळी काजळी राहते तिलाच काजळ म्हणतात.
काजळाचे खूप सारे ब्रॅण्ड्स बाजारामध्ये आहेत. परंतु बऱयाचदा आपल्याला काजळ घरामध्ये बनवून ते लावण्याचा सल्ला दिला जातो .
रेडिमेड मिळणारे काजळ बाळासाठी का योग्य नसते ?
बाजारामध्ये जे रेडिमेड काजळ मिळते त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये शिसे या धातूचा समावेश असतो. असे काजळ बाळाच्या डोळ्यांसाठी अजिबात योग्य नाही. असे काजळ बाळाच्या डोळ्यामध्ये घातले गेले तर डोळे लाल, खाज येणे , डोळ्यातून पाणी येणे , डोळ्यांची जळजळ होणे असे त्रास होऊ शकतात आणि अर्थातच लहान बाळ होणारा हा आपल्याला सांगूही शकत नाही.
याशिवाय शिसे असणारे असे काजळ बाळाच्या मेंदूवर, किडनीवर आणि मज्जासंस्थेवर सुद्धा परिणाम करू शकते .
मग घरामध्ये बनलेले काजळ बाळासाठी योग्य आणि सुरक्षित आहे का ?
घरी बनलेले काजळ सुद्धा बाळासाठी हानिकारकच ठरू शकते कारण यामध्ये जरी शिसे हा धातू नसेल तरीही तेल/ तूप संपूर्ण जाळून गेल्यानंतर जी काजळी राहते त्यामध्ये कार्बनचे प्रमाण खूप जास्त असते. आणि असे कार्बनयुक्त काजळ बाळाच्या नाजूक डोळ्यांसाठी अजिबात चांगले नाही. शिवाय असे काजळ डोळ्यामध्ये हाताच्या बोटाने घातले जाते आणि अस्वच्छतेमुळे बाळाला इन्फेकशन होण्याची शक्यता जास्त असते.

या सर्व गोष्टी लक्षात घेता घरामध्ये बनलेले असो किंवा बाहेरचे काजळ हे बाळासाठी , त्याच्या डोळ्यांसाठी सुरक्षित नाही . पण जर परंपरा म्हणून तुम्हाला बाळाला काजळ लावायचेच असेल तर तुम्ही ते डोळ्यामध्ये न घालता कपाळावर , तळपायाला , कानामागे किंवा कपाळाच्या अगदी वरच्या एक बाजूला केसांमध्ये लावू शकता.
बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालणे टाळा .
घरामध्ये काजळ बनवणे अतिशय सोपे आहे . यासाठी तुम्हाला लागणार आहे एक बदाम , थोडास तूप, दिवा आणि वात .
सर्व प्रथम तुपाचा दिवा लावून घ्या . दिव्याच्या जळणाऱ्या वातीवर बदाम धारा हे बदाम तुम्ही एखाद्या छोट्या धातूच्या सळई ला लावू शकता ज्यामुळे हात भाजणार नाही . आता या बादमवर तुम्हाला एखादी वाटी किंवा छोटा चमचा थोड्या अंतरावर धरायचा आहे. वातीमुळे बदाम जाळला जाईल आणि ती काजळी बदामावर धरलेल्या वाटीमध्ये किंवा चमच्यामध्ये जमा होईल. जमा झालेले काजल डबीमध्ये भरून ठेवू शकता आणि बाळासाठी वापरू शकता .
पण घरामध्ये बनलेले असे काजळसुद्धा बाळाच्या डोळ्यांसाठी अयोग्यच आहे. त्यामुळे काजळ कोणतेही असू द्या बाळाच्या डोळ्यामध्ये ते घाण्याचा अट्टाहास टाळावा .
या लेखामधून मी तुम्हाला बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ घालावे का ? ते बाळासाठी कसे असुरक्षित आहे याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
बाळ नेहमी एकाच बाजूला बघते? मान वाकडी आहे? Torticollis In Babies Treatment
बाळाच्या आरोग्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या यू-ट्यूब चॅनेलला भेट देऊ शकता.