बाळ नेहमी एकाच बाजूला मान वाकडी करून का बघते? Torticollis In Babies : Signs, causes, Neck Exercises & Home Treatment
बाळाची मान वाकडी असणे किंवा सतत एकाच बाजूला बघत असेल आणि दुसऱ्या बाजूला मान वळवत असताना बाळाला जर त्रास होत असेल तर हि स्तिथी टॉर्टीकोलीस ची असू शकते .
टॉर्टीकोलीस म्हणजे काय ? What is Torticollis in babies
बाळाच्या मानेच्या एका बाजूचे स्नायू जर संकुचित असतील तर बाळाला मान दुसऱ्या बाजूला वळवता येत नाही. बाळाचा कान खांद्याच्या दिशेला झुकलेला असतो आणि हनुवटी वरच्या दिशेला होते . मानेच्या या स्थितीमुळे बाळाला मान दोन्ही बाजूला वाळवणे होत नाही.
टॉर्टीकोलीस ची कारणे Causes of Torticollis
बाळ आईच्या गर्भामध्ये असताना गर्भाशयामध्ये पुरेशी जागा मिळाली नसेल, गर्भाशयाचा आकार लहान असेल किंवा जुळ्या बाळांमुळे कमी जागेमध्ये वाढ झाली असेल किंवा गरोदरपणामध्ये गर्भाशयाचे पाणी कमी झाले असेल तर मानेची अशी स्तिथी उद्भवण्याची शक्यता असते.
बहुतांश वेळा हे पहिल्या गोरोदरपणामध्ये होते आणि उजव्या बाजूचे स्नायू संकुचित होतात.
टॉर्टीकोलीसमुळे बाळाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? Effect of Torticollis on Baby’s Health
१. मान वाकडी असल्याने बाळ सर्वत्र बघू शकत नाही आणि त्याची नजर किंवा दोन्ही डोळ्यांचा समन्वय नीट साधला जात नाही.
२. एकाच बाजूला झोपून बाळाचे डोके एका बाजूला चपटे होण्याची शक्यता असते.
३. चेहऱ्याची ठेवण हि तिरकी होते.ज्यामुळे बाळ मोठा झाल्यानंतर या कारणामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.
टॉर्टीकोलीस साठी घरामध्ये काय उपचार करावेत? Home Remedies For Torticollis
नवजात बाळाच्या बाबतीमध्ये बाळाची हाडे अजून ठिसूळ असतात अश्यावेळी सातत्याने काही घरगुती उपाय केल्यास बाळाच्या मानेची हि स्तिथी लवकर ठीक होण्यास मदत होते. नवजात बाळाच्या बाबतीमध्ये जेवढ्या लवकर आणि नियमितपणे काही टिप्स आणि मानेचे व्यायाम करवून घेतल्यास मन सरळ होण्यास मदत होते पण मुलं जर मोठी असतील तर त्यावेळी डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ल्याने शस्त्रक्रिया करावी लागू शकते.
टॉर्टीकोलीससाठी मानेचे व्यायाम Neck Exercises For Torticollis
१. बाळाच्या मानेची योग्य स्तिथी राखणे.
नवजात बाळाच्या बाबतीमध्ये बाळाची हाडे, स्नायू हे नाजूक/कमकुवत असतात त्यामुळे ज्या स्तिथीमध्ये जास्त काळ राहतात तशीच ते हळू हळू विकसित होत जातात. सुरुवातीपासूनच बाळाची मन सरळ ठेवण्यासाठी मानेला योग्य तो आधार मिळत असेल तर मन सरळ आणि ताठ राहण्यास मदत होते. यासाठी बाळाच्या डोक्याच्या दोन्ही बाजूला बॉबी पिलो किंवा ब्लॅंकेटनी किंवा मानेचा पट्टा वापरून मान सरळ ठेवण्याचा प्रयत्न करावा.
२.बाळाला हातामध्ये पकडण्याची पद्धत
ज्या बाजूला बाळाची मान झुकलेली आहे तिथे तुमचा हात घालून बाळाला बाजूला दिलेल्या चित्राप्रमाणे उचलावे. हाताच्या दाबामुळे बाळाचे मानेचे स्नायू मोकळे होण्यास आणि हळू हळू हा संकुचितपणा कमी होण्यास मदत होते.
३. मानेचा व्यायाम
१. स्ट्रेचिंग – बाळाला पाठीवर झोपवून त्याचा खांदा हलक्या हाताने खालच्या दिशेला दाबत बाळाची मान दोन्ही उजव्या आणि डाव्या बाजूला खांद्याच्या दिशेने खाली दाखवलेल्या चित्राप्रमाणे वळवावी. प्रत्येक बाजूला ३० सेकंदापर्यंत बाळाची मान या स्थितीमध्ये ठेवावी. दिवसातून हा व्यायाम ३-४ वेळा जरूर करावा.
२. स्ट्रेंथनिंग –
बाळाच्या मानेचे संकुचित झालेले स्नायूला थोडासा ताण पडून आखडलेले स्नायू मोकळे करण्यासाठी बाळाला अश्या स्तिथीमध्ये ठेवा जेणेकरून बाळ हा ज्या बाजूला स्नायू संकुचित आहेत त्या बाजूला बघेल आणि स्नायूंना ताण पडेल.
यासाठी बाळ नेहमी ज्या बाजूला बघते त्याच्या विरुद्ध बाजूला काही खेळणी किंवा आकर्षक रंगीबेरंगी गोष्टी ठेवा म्हणजे ते पाहण्यासाठी बाळ तिकडे बघण्याचा प्रयत्न करेल आणि हळू हळू दोन्ही बाजूला मानेची हालचाल करणे बाळासाठी सोपे जाईल.
३. बाळाला त्याच्या पोटावर झोपवणे. Tummy Time
बाळाला दिवसातून ३-४ वेळा त्याच्या पोटावर झोपवावे , टमी टाइम दिल्याने बाळाच्या मानेचे स्नायू मजबूत बनण्यास मदत होते आणि बाळाला मानेची हालचाल इकडे तिकडे करण्यास प्रोत्साहन मिळते. मानेचे संकुचित झालेले सन्यायु मोकळे होण्यास मदत होते.बाळ स्वतःहून मान वळवत नसेल तर तुम्ही हाताने बाळाची मान वळवण्याचा प्रयत्न करावा किंवा बाळाला तसे प्रोत्साहित करावे.
बाळाला त्याच्या पोटावर झोपवल्यास बाळ ज्या बाजूला सतत पाहते तत्याच्या दुसऱ्या बाजूला भरपूर रंगेबेरंगी किंवा आवाज करणारी खेळणी ठेवावीत किंवा तुम्ही बाळाच्या त्या बाजूला बसून बाळासोबत गप्पा मारू शकता. असे केल्याने बाळ त्याच्या नेहमीच्या मानेच्या स्तिथीमध्ये मान वाळवून न पाहता दुसऱ्या बाजूला पाहिलं आणि मानेचे आखडलेले स्नायू मोकळे होण्यास मदत होईल .
सर्व व्यायाम आणि टिप्स करूनही बाळाच्या मानेच्या स्थितीमध्ये काही फरक पडत नसेल तर वेळीच वैद्यकीय सल्ला घ्यावा.
तर मी आज तुम्हाला लहान मुलांची मान वाकडी असेल म्हणजेच बाळाला टॉर्टीकोलिस असेल तर काय उपाय करावेत याबद्दल माहिती दिली. मला खात्री आहे की या information चा तुम्हाला नक्की फायदा होईल.
जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन .
Frequently Asked Questions (FAQ)
१. बाळाच्या मानेचे व्यायाम करत असताना बाळाला त्याचा त्रास होतो का ?
हो, बाळाच्या बाबतीमध्ये प्रत्येक व्यायाम, मालिश किंवा बाळाच्या शरीराची हालचाल हि अत्यंत हळुवारपणे असणे अपेक्षित असते . बाळाचे स्नायू अजून मजबूत झालेले नसतात, हाडेही ठिसूळ असतात अश्यावेळी बाळाला हाताळत असताना हळुवार आणि बाळाला त्रास होणार नाही किंवा खूप जास्त ताण येणार नाही अश्या प्रकारेच करायचे आहेत.
२. टॉर्टीकोलिस साठी हे वर सांगितलेले व्यायाम आणि टिप्स किती दिवस करणे गरजेचे आहे ?
प्रत्येक बाळ हा वेगळा आहे आणि प्रत्येक बाळाच्या बाबतीमध्ये बाळाच्या मानेची हि स्तिथी ठीक होण्यासाठी लागणार वेळी वेगवेगळा असू शकतो. टॉर्टीकोलिस ठीक करण्यासाठी सांगितलेल्या टिप्स आणि व्यायाम यामध्ये किती सातत्य आहे, किती योग्य प्रकारे ते केले जातात आणि बाळाचे वय या सर्व गोष्टींवर हा वेळ अवलंबून आहे.
अधिक वाचा
लहान मुलांना होणाऱ्या कांजण्या Chickenpox : Symptoms, Causes & Treatment
3 month beby madhe hi samsya asel tr ky karave
video madhe sangitlele sarv upay karu shkta …
upay sudhha sangitle ahet lekh shevtpryant vacha ani video through sudhha sangitle ahe video pahu shkta
माझी मुलगी १वर्षाची आहे ती एक साईट मान करते नेहमी उपाय सांगा plz
लेख संपूर्ण वाचा उपाय सुद्धा सांगितले आहे
माझं बाल 5 महिने चा आहे
तो बघताना तोड मान वाकडी दिसते ..
नॉर्मल आहे का
Yes its normal but you need to check explained conditions in this post to avoid this posture