When Can Babies Hold Their Head Up? बाळ मान कधी धरते ? लवकर मान धरण्यासाठी काय करावे ?

Spread the love
बाळ मान कधी धरते ? बाळाने लवकर मान धरण्यासाठी वापरा या टिप्स When Do Baby Hold Their Head Up?

प्रत्येक पालकांना बाळाच्या जन्मापासूनच त्याच्या प्रत्येक गोष्टींचे कुतूहल , कौतुक आणि उत्सुकता असते . बाळ कधी पालथा होणार, बसायला शिकणार , रांगणार कधी बोलणार या सर्व गोष्टींची त्यांना उत्सुकता लागलेली असते . बाळाचे हे सर्व विकासाचे टप्पे योग्य प्रकारे आणि लवकरात लवकर होण्यासाठी ते अपार कष्ट हि करत असतात. बाळाने त्याची मान धरणे हा त्याच्या शारीरिक विकासाचा सर्वात पहिला आणि महत्वाचा टप्पा आहे. त्यापैकी बाळाने मान धरणे म्हणजे बाळाची मान स्थिर राहणे , बाळ स्वतः इकडे तिकडे पाहू लागणे . 

नवजात बाळाची हाडे व स्नायू सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये खूप नाजूक आणि कमकुवत असतात . त्यामुळे सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये बाळाला हाताळताना खूप काळजी घ्यावी लागते . डोक्याला आधार द्यावा लागतो . बाळाला उभे पकडले असता बाळाची मान डगमगते , बाळाला आपल्या डोक्याचे वजन तोलता येत नाही . हळू हळू जसे बाळ मोठे होते तसे मानेचे स्नायू मजबूत होत जातात आणि बाळ मान धरू लागते .

या लेखामध्ये आपण बाळ मान कधी धरू लागते, बाळाने लवकर मान धरावे म्हणून पालकांनी काय प्रयत्न करावेत आणि कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी याबद्दल माहिती दिली आहे , सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा. 

when do baby hold their head up
  • कोणत्या महिन्यात बाळ मान धरते ? When Do babies Hold Head up?
  • साधारणतः ४-५ महिन्यापर्यंत बाळ मान धरायला शिकते तरीही ६ महिन्यांपर्यंत मान डगमगते.जे बाळ नऊ महिन्याआधी जन्माला आले आहे किंवा जन्मताच काही आजार असेल किंवा जन्माच्या वेळी वजन खूप कमी असेल तर अश्या बाळाला मान धरण्यास थोडा वेळ लागू शकतो. प्रत्येक बाळ हा वेगळा आहे आणि त्याचा विकासही वेगवेगळ्या गतीने होत असतो . त्यामुळे पालकांनी आपल्या बाळाची  इतर बाळांसोबत तुलना करू नये आणि बाळाला मान धरण्यास थोडा उशीर लागत असेल तर त्याचे टेन्शन घेऊ नये. बाळाने लवकर मान धारावी यासाठी पालकांनी प्रयत्न आणि योग्य त्या टिप्स मात्र जरूर कराव्यात.  
  • बाळाने मान लवकर आणि व्ययस्थित धरण्यासाठी टिप्स Tips to teach baby hold his head up early  –
    • बाळाची नाळ पडली कि बाळाला हळू हळू त्याला पोटावर झोपवायला (Tummy Time) सुरु करावे म्हणजे ते आपले डोके वर उचलण्याचा प्रयत्न करते. मानेच्या मांसपेशी मजबूत होतात आणि बाळ मन स्थिर करायला शिकते.
    •  बाळाला पोटावर झोपवले असता त्याच्या पुढे रंगीबेरंबगी खेळणी धारावीत ज्याला पाहण्यासाठी बाळ मान वर उचलण्याचा किंवा इकडे तिकडे पाहण्याचा प्रयत्न करेल आणि मानेवर उत्तमप्रकारे नियंत्रण येईल .
    • याशिवाय बाळाचे दिवसातून २ वेळा चांगल्या तेलाने मालिश करावे , जे बाळाच्या शारीरिक आणि मानसिक विकासामध्ये गरजचे असते .मालिश केल्याने बाळाच्या शरीरातील रक्ताभिसरण उत्तम राहण्यासाठी मदत होते आणि बाळाची हाडे आणि मांसपेशीही मजबूत होतात. ज्यामुळे बाळाचे सर्व शारीरिक विकासाचे टप्पे योग्य प्रकारे आणि वेळेत पूर्ण होतात .
    • बाळाने मान लवकर धारावी तसेच बाळाची हाडे आणि मांसपेशी लवकर मजबूत व्हाव्यात याकरता बाळाला डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन D3 चे ड्रॉप्स सुरु करावेत. 
    • सकाळच्या कोवळ्या उन्हातही ड जीवनसत्व (Vitamin D)असते ज्यामुळे लहान बाळाची ठिसूळ हाडे लवकर मजबूत बनतात आणि बाळ तंदुरुस्त बनायला मदत होते ज्यामुळे बाळाचा शारीरिक विकास झपाट्याने आणि योग्य प्रकारे होतो. त्यामुळे लहान बाळाला दररोज सकाळच्या कोवळ्या उन्हात झोपवावे . 
    • अश्या प्रकारे बाळ ६ महिन्याचा होईपर्यंत मन धरायला शिकते .
      जे बाळ ९ महिन्याच्या आधी जन्माला आले आहे त्या बाळाला थोडा वेळ लागू शकतो .
      बाळ जर ८ महिने होऊनही नीट मान धरत नसेल तर त्या वेळी डॉक्टराना भेटावे .

    • अश्या प्रकारे ६ महिन्यांच्या आसपास बाळ मान नीट धरण्यास शिकला कि त्यानंतर तो पालथा पडायला लागतो आणि हळू हळू सर्व विकासाचे टप्पे पार करतो. बाळ पालथे कधी होते आणि लवकर पालथे होण्यास शिकवण्यासाठी पालकांनी काय करावे हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक चेक करा. 

    • अधिक वाचा 

बाळ पालथे कधी पडते आणि कसे शिकवावे हे वाचण्यासाठी येथे क्लिक करा .

बाळ नेहमी एकाच बाजूला बघते? मान वाकडी आहे? Torticollis In Babies Treatment

बाळाने लवकर रांगावे यासाठी उपाय आणि टिप्स

बाळाला बसायला कधी आणि कसे शिकवावे ?

3 thoughts on “When Can Babies Hold Their Head Up? बाळ मान कधी धरते ? लवकर मान धरण्यासाठी काय करावे ?”

  1. Pingback: बाळ पालथे / पलटी कधी होते ? – बालविश्व मराठी BABYWORLD

  2. Pingback: बाळाचे गुडघ्यावर रांगणे ?(Crawling) बाळाला रांगायला कधी आणि कसे शिकवावे ? – बालविश्व मराठी BABYWORLD

  3. Pingback: बाळ बसायला कधी शिकते ?(Sitting) बाळ स्वतःहून आधाराशिवाय बसण्यासाठी टिप्स – बालविश्व मराठी BABYWORLD

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *