यशस्वी आणि संस्कारी व्यक्ती म्हणून घडवत असताना आपल्या मुलांना द्या या ५ गोष्टीची शिकवण 5 Healthy Parenting Tips

Spread the love
यशस्वी आणि संस्कारी व्यक्ती घडवण्यासाठी महत्वाच्या आहेत या ५ गोष्टी 5 Healthy Parenting Tips

प्रत्येक आई बाबाना आपली मुलं  यशस्वी व्हावीत, एक संस्कारी व्यक्ती म्हणून त्याची ओळख असावी असे वाटत असते.यासाठी मुलांना अगदी लहान वयापासूनच चांगल्या गोष्टींची शिकवण मिळणे गरजेचे असते. यशस्वी आणि संस्कारी व्यक्ती म्हणून घडवत असताना आपल्या मुलांना या  लेखामध्ये सांगितलेल्या ५ गोष्टींची शिकवण जरूर द्या.

कोणत्या अश्या गोष्टी आहेत जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

 

१. लहान थोरांचा आदर करणे Respect Everyone-

या आधुनिक काळात इतरांचा मान राखणे आणि आदर करणे हि अतिशय मौल्यवान आणि महत्वाची शिकवण आहे जी प्रत्येक पालकांनी आपल्या मुलांना दिली पाहिजे. लहान असो किंवा मोठी लोक असो, स्त्री असो किंवा पुरुष सर्वाना आदराने बोलणे, त्यांचा अपमान होईल असे न वागणे, मोठ्या आवाजात न बोलणे अश्या गोष्टी मुलांना लहान वयातच शिकवा म्हणजे तुमचं मुलं एक चांगला व्यक्ती म्हणून ओळखला जाईल आणि त्याचा सर्वानाच अभिमान वाटेल.

 

२. सवेंदनशीलता Sensitivity – 

मुलगा असो किंवा मुलगी दोघांनाही भावना आहेत, संवेदना आहेत आणि त्या व्यक्त करण्याचे स्वतंत्र हि आहे. बऱ्याचदा मुलांना सांगितले जाते कि “मुलींप्रमाणे रडायचे नाही ” असे सांगणे म्हणजे स्वतःहून मुलांमध्ये पुरुषी भावना वाढवून स्त्रियांना तुच्छ लेखण्यास प्रवृत्त करणे होय. मुलांना सुद्धा मुलींइतकाच स्वतःच्या भावना व्यक्त करण्याचा, मनसोक्त रडण्याचा हक्क आहे आणि त्यांनी तसे करायला हि हवे. यामुळे त्यांचे मन संवेदशील राहील आणि भावनिक होईल. एक चांगला आणि संस्कारी व्यक्ती होण्यासाठी त्याचे मन संवेदनशील असणे खूप महत्वाचे आहे.

 

३. हिंसा न करण्याची शिकवण Non-Violence –

लहान मुलं रागीट असतात, रांगडी असतात. मुलांमध्ये असणारी रंगेलपणाची हि वृत्ती वेळीच पालकांनी कमी केली पाहिजे. मुलं म्हणतील ते त्यांना आणून देणे किंवा त्यांचे सर्व हट्ट पुरवणे यामुळे या वृत्तीला खतपाणी मिळते. प्रत्येक गोष्टीची किंमत मुलांना जाणवून द्या , त्यासाठी लागणारे कष्ट आणि मेहनीतीची जाणीव करून द्या. कोणती गोष्ट चांगली आणि कोणती वाईट याची फरक करायला शिकवा. यामुळे त्यांच्या जीवनात ते योग्य ते निर्णय कसे घ्यायचे, शांत राहून समस्यांवर तोडगा कसा काढायचा हे शिकतील आणि रागावर नियंत्रण राहिल्याने शांत राहून सुखाचा आनंद घेता येईल.

 

४. स्वतःची कामे स्वतः करण्याची शिकवण Doing Things By Their own –

मुलांना आत्मनिर्भर करण्यासाठी काही छोट्या छोट्या गोष्टी त्यांना शिकवणे गरजेचे असते. जसे कि स्वतःची कामे स्वतः करणे, आपली खेळणी जागेवर ठेवणे, स्वतःचे कपडे नीट ठेवणे,स्वयंपाकघरातील छोटीमोठी कामे करणे, मदत करणे ,स्वच्छता राखणे. अश्या गोष्टीमुळे मुलांना आपापली कामे करण्याची सवय होते आणि लहान वयातच शिस्त लागते आणि बेफिकीरपणा कमी होतो. मुलं जशी मोठी होतात त्यानंतर त्यांना या सगळी गोष्टी आवडत नाहीत, पटतही नाहीत त्यामुळे बालवयातच या सर्व गोष्टीची शिकवण मिळणे गरजेचे असते.

 

५. अपयश स्वीकारणे Accept Failure – 

बऱ्याचदा लहान मुलांसोबत जेव्हा पालक खेळात असतात त्यावेळी नेहमीच त्यांना जिंकू दिल जात, हे करणे चुकीचे आहे. मुलांना यशस्वी बनवायचं असेल तर अपयश काय असते आणि ते कश्या प्रकारे पचवून अजून जिद्दीने यशासाठी प्रयत्न करावा हे मुलांना समजले पाहिजे, जाणवून दिले पाहिजे. नेहमीच मुलांना जिंकण्याची सवय असेल तर या स्पर्धेच्या युगामध्ये मुलं टिकणार नाहीत आणि थोड्याश्या अपयशानेही खचून जाऊन त्यांची मानसिकता बिघडू शकते. मुलांना खंबीर आणि यशस्वी बनवण्यासाठी अपयशाचीही ओळख जरूर करून द्यायला हवी आणि त्यातून सावरायला आणि पुन्हा प्रयत्न करायलाही शिकवायला हवे.

 

मुलं जशी मोठी होतात तशी त्यांची विचारशक्ती वाढते, पालकांचे विचार त्यांना पटत नाहीत, रुचत नाहीत त्यामुळे जेवढ्या कमी वयामध्ये यासर्व गोष्टींची शिकवण देता येईल तेवढ्या लवकर द्यावी. या सर्व गोष्टी मुलांना त्यांच्या जीवनात यशस्वी होण्यासाठी  “शिदोरी” ठरतील. 

 

या लेखामध्ये मी तुम्हाला आपल्या मुलांना यशस्वी आणि संस्कारी बनावट असताना गरजेच्या असणाऱ्या ५ महत्वाच्या गोष्टी सांगितल्या . अशा आहे तुम्हाला त्या पटल्या असतील आणि उपयोगीही पडतील.मला खात्री आहे तुम्हाला या माहितीचा नक्की उपयोग होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा 

मुलांना रंगांची आणि आकारांची ओळख कशी करून द्यावी ? How to teach colors and shapes to preschoolers In Marathi

How To Choose Best School For Child in 2022 ? मुलांसाठी प्राथमिक शिक्षणासाठी शाळा निवडत असताना या गोष्टी घ्या लक्षात

मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी? 8 Best Ways To Get Your Child Interested in Studies

 

3 thoughts on “यशस्वी आणि संस्कारी व्यक्ती म्हणून घडवत असताना आपल्या मुलांना द्या या ५ गोष्टीची शिकवण 5 Healthy Parenting Tips”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top