मुलांना भूक लागत नाही ? Causes Of Low Appetite in Kids with Best 10 remedies

Spread the love
मुलांना भूक लागत नाही ? करणे आणि उपाय | Reasons Of Low Appetite in Kids  

जेवण म्हटले की बऱ्याच मुलांना कंटाळा येतो, मुलांची जेवायची इच्छाच होत नाही, मुलांना भूक लागत नाही, आई जेवणाचे ताट मागे घेऊन पळत असते आणि मुलांचे जेवण तासंतास चालूच असते. बऱ्याच पालकांची आपल्या मुलांबद्दल हीच तक्रार असते की आमची मुले नीट जेवत नाहीत. तोंडामध्ये घास धरून ठेवतात किंवा काही मुले तर  तोंडातील घास थुंकून देखील देतात. विशेषतः उन्हाळयात उष्णतेमुळे मुलांना भूक लागत नाही , जेवण पचत नाही आणि  मुलांना  जर जबरदस्तीने जेवायला दिले तर ते त्यांच्या अंगीदेखील  लागत नाही.

 पहिल्या पाच वर्षात बाळाचा  शारीरिक,मानसिक आणि बौद्धिक विकास  हा जलदरीत्या होत असतो. अशा वेळी बाळाचा आहार(diet) हा संतुलित असावा. बाळाला पुरेसा आहार मिळणे खूप गरजेचे असते पण बऱ्याच वेळा बाळ जेवतांना खूप नखरे करतो. त्याला व्यवस्थित भूक लागत नाही. याचा परिणाम बाळाच्या वाढीवर होतो . 

बाळ जर नीट खात नसेल , खाताना रडत असेल किंवा तोंडामध्ये घास तसाच धरून ठेवत असेल तर बाळाला भूक लागते आहे कि नाही ते पाहणे खूप गरजेचे असते . बाळाला जर भूकच लागत नसेल तर त्यामागची कारणे Reasons Of Low Appetite तुम्हाला माहित असायला हवीत ज्यानुसार तुम्ही त्यावर उपाय करू शकाल. या लेखामध्ये आपण लहान मुलांना भूक न लागण्याची कारणे आणि त्यावर योग्य ते उपचार याबद्दल माहिती दिली आहे. सविस्तर माहितीसाठी हा लेख शेवटपर्यंत जरूर वाचा. 

causes of low appetite in kids
मुलांना भूक न लागण्याची कारणे Reasons Of Low Appetite in Kids

१. विविध आजारांमुळे Due To Illness

लहान मुलांच्या बाबतीमध्ये बाळाला सतत सर्दी कफ खोकला होणे , ताप येणे , जुलाब उलटी होणे हे चालूच असते . जेव्हा बाळ आजारी असते तर त्याचे खाण्याचे रुटीन बिघडते , मुलांना खाण्याची इत्च्छ होत नाही आणि हे जर सतत होत राहिले तर हळू हळू मुलांची भूक कमी होते . या आजारांशिवाय जर बाळाला काही पोटाचे आजार असतील , पोट साफ होत नसेल (Constipation), जंत झाले असतील तरीही भूक कमी होते .

(हे वाचा लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होणे कारणे , लक्षणे आणि उपचार (Stomach Worm in Kids in Marathi))

२. हिमोग्लोबीन कमी झाल्यास Low Hemoglobin (Iron Deficiency )

मुलांना जर संतुलित आहार मिळत नसेल तर बाळाचे हिमोग्लोबीन कमी होते ज्या कारणांमुळे भूक लागत नाही . आहाराशिवाय जर बाळाच्या पोटामध्ये जंत झाले असतील तरीही बाळाचे हिमोग्लोबीन कमी होऊ शकते. विविध आजारांमुळे कमतरता  बाळाचे हिमोग्लोबीन जर कमी असेल तर भूक न लागणे आणि अजून इतरही बऱ्याच आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. 

(हे वाचा बाळाचे लसीकरण संपूर्ण माहिती -Baby’s Vaccination Schedule in Details 2022)

३. मानसिक ताण-तणाव आणि भीती Depression 

मुलं जर काही मानसिक दबावाखाली असतील किंवा कोणत्या एखाद्या गोष्टीची भीती बाळाच्या मनात बसली असेल तर मुलांची भूक कमी होते . घरामध्ये सतत होणारी भांडणे किंवा नकारात्मक वातावरणाचाही बाळाच्या भूकेवर परिणाम होतो. आपल्याला सतत वाटत असत कि मुलांना कसला आला आहे ताण , टेन्शन किंवा डिप्रेशन, पण असे होत नाही मोठ्या लोकांप्रमाणे लहान मुलांनाही डिप्रेशन येऊ शकते . लहान मुलांना डिप्रेसीन येण्याची कारणे आणि उपाय जाणून घेण्यासाठी हि लिंक पहा.  

लहान मुलांनाही येत का डिप्रेशन ? Depression in kids/children

४. तोच तो आहार No veriety in Food

बऱ्याचदा पालक मुलांना एकच एक आहार देत असतात जसे कि नाचणीची खीर, खिचडी किंवा खीर , रोज तीच ती चव बाळाला कंटाळवाणी वाटते आणि त्याची खाण्यावरची इच्छा जाते. बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी बाळाला वेगवेगळ्या प्रकारचा आहार देणे आवश्यक असते ज्यामधून त्यांना पुरेसे पोषण मिळते आणि त्याच बरोबर नवनवीन चव आणि टेक्शरही मिळते ज्यामुळे बाळाची खाण्यातील गोडी वाढते.  

५. जबरदस्तीने खाऊ घालणे Forcefully Feeding 

बाळ जर खात नसेल तर बाळाला जबरदस्तीने जर तुम्ही खाऊ घालत असाल , बाळाला तो पदार्थ आवडत नाही किंवा खायचा नाही आणि तरीही केवळ तुम्हाला वाटते आहे कि बाळाने ते खावे म्हणून बाळाच्या इच्छेविरुद्ध बाळाला रडवत जर बाळाला भरवत असाल तर बाळाची भूक हळू हळू कमी होते. खाण्याची वासना उडून जाते आणि भूकही कमी होत जाते . 

६. वाजवीपेक्षा जास्त खाऊ घालणे Overfeeding Baby 

बाळाला जर तुम्ही खूप जास्त खाऊ घालत असाल म्हणजे बाळाचे पोट भरले असतानाही तुम्ही बाळाला भरवत असाल (Overfeeding ) तर बाळाच्या आतड्यांची हे अन्नपदार्थ पचवण्याची क्षमता हळू हळू कमी होते आणि भूक लागण्याचे प्रमाणही कमी होते .

७. मुलांची शारीरिक हालचाल आणि व्यायाम होत नसेल Not Enough Exercise 

आजकाल मुलं हि मैदानावर खेळण्यापेक्षा मोबाइल , लॅपटॉपवरचा गेम खेळण्यात जास्त वेळ घालवतात , ज्यामुळे त्यांचा म्हणावा तेवढा शारीरिक व्यायाम होत नाही आणि मुलांना भूक हि लागत नाही.  कडकडून भूक लागण्यासाठी मुलांनी भरपूर खेळणे हि गरजेचे असते , पण जर मुलांचा पुरेसा व्यायाम होत नसेल तर जे खाल्ले आहे ते पचणार नाही आणि भूक हि लागणार नाही .

८. मुलांच्या आहारामध्ये मैद्याच्या / बेकारीच्या पदार्थांचे प्रमाण जास्त असणे.

बदलत्या जीवनशैलीप्रमाणे मुलांना बाहेरचे , मैद्याचे किंवा बेकरीमध्ये बनणारे पदार्थ जास्त आवडतात . पण असे पदार्थ पचण्यास खूप जाड असतात . शिवाय हे आरोग्यासाठी हि त्रासदायक ठरू शकतात . असे पदार्थ जर वारंवार लहान मुलांच्या आहारामध्ये येत असतील तर हळू हळू त्यांची पचनशक्ती कमी होत जाते. परिणामी मुलांना पुरेशी भूक लागणार नाही .

९. मुलांचे पोट साफ होत नसेल तर Constipation in Kids

जर लहान मुलांच्या पोटामध्ये सतत गॅस होत असेल किंवा शौचास खूप घट्ट होत असेल किंवा २-३ दिवस सौचास होतच नसेल तर बाळाला भूक लागत नाही. बाळाची पचनक्रिया बिघडून जाते आणि त्यामुळे बाळ नीट खात नाही. नियमाईतपणे बाळाचे पोट साफ राहावे यासाठी बाळाला भरपूर पाणी आणि इतर पातळ पदार्थ देणे, आहारामध्ये दही, ओट्स, केली अश्या पदार्थांचा समावेश करणे आणि मैद्याचे, तेलकट, बाहेरचे पदार्थ देणे टाळणे अपेक्षित असते. 

मुलांची भूक वाढवण्यासाठी उपाय Tips & Remedies To Improve Kids Appetite

१. मुलं आजारी पडू नयेत म्हणून मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मुलाचा आहार , विहार आणि झोप पुरेशी ठेवणे .

२. मुलांना जबरदस्तीने खाऊ न घालता , भूक लागल्यानंतरच आणि त्यांना हवं आहे तेवढाच खाऊ घालणे. 

३. मुलांना मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करणे. पुरेसा व्यायाम करून घेणे .

४. मुलांना नेहमी सकारात्मक, प्रेमळ आणि आनंदी वातावरण देणे. ज्यामुळे लहान मुलांना मानसिक ताण तणाव किंवा डिप्रेशन येणार नाही. 

५.मुलांना शक्य तेवढा घरी बनलेला ताजा , सकस आणि पुरेसा आहार देणे. मैद्याचे किंवा बेकारीचे पदार्थ खाणे शक्य तेवढे टाळावे. 

६. मुलांच्या आहारामध्ये बडीशेप, इलायची , पुदिना , लिंबू पाणी , दही , ताक , नारळ पाणी यांचा समावेश करणे ज्यामुळे बाळाची पाचांसहकरी वाढेल आणि उत्तम भूक लागेल .

७. मोठ्या मुलांना च्यवनप्राश , झेंडू पंचारिष्ट देणे. च्यवनप्राश मुले बाळाचे पचन सुधारण्यास मदत होते आणि भूक सुद्धा लागते. 

८. जर मुलाच्या पोटामध्ये जंत होत असतील तर प्रत्येक ६ महिन्यांनी जंत होऊ नयेत म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध देणे. मुलं जशी मोठी होतात , बाहेर खेळायला जात असतील तर त्यांच्या पोटामध्ये जंत होण्याचे प्रमाण थोडे जास्त असते. त्यामुळे प्रत्येक ६ महिन्यांनी बाळाचे डिवॉर्मिंग म्हणजेच जंत होऊ न देणारे औषध देणे आवश्यक असते. 

९ नियमितपणे मुलांचे हिमोग्लोबीन चेक करून पाहणे आणि त्यानुसर सप्लिमेंट्स आणि लोहयुक्त आहार देणे .

१०. बाळाची भूक वाढण्यासाठी आणि बाळाचा विकास योग्य प्रकारे होण्यासाठी बाळाची झोपही पुरेश्या प्रमाणात होणे आवश्यक असते. बाळ एक पुरेशी गाढ झोप घेत असेल तर बाळाने खाल्लेलं अन्न उत्तम प्रकारे पचते आणि नव्याने बाळाला भूकही लागते. 

बाळाची भूक वाढण्यासाठी सर्वात उत्तम उपाय म्हणजे बाळाची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी बाळाचा आहार योग्य ठेवणे . ज्यामुळे बाळ आजारी कमी पडेल आणि या सर्व गोष्टी टाळल्या जातील .

या लेखामधून मी तुम्हाला लहान मुलांना भूक का लागत नाही आणि मुलांना भूक लागण्यासाटःई काय उपाय करावेत याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

यशस्वी आणि संस्कारी व्यक्ती म्हणून घडवत असताना आपल्या मुलांना द्या या ५ गोष्टीची शिकवण 5 Healthy Parenting Tips

मलेरिया – लक्षणे, उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाय योजना Malaria in Children Prevention & Treatment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *