लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होण्याची कारणे आणि उपाय Stomach Worm in Kids in Marathi
साधारणपणे बाळ रांगायला लागले किंवा बाळाला दात यायला लागले कि बाळाच्या पोटामध्ये जंत होण्याच्या समस्याही वाढू लागतात. लहान बाळ वारंवार त्याची खेळणी किंवा आजूबाजूला पडलेल्या अस्वच्छ वस्तू, माती तोंडामध्ये घालत असेल किंवा बाळाच्या बाबतीमध्ये योग्य ती स्वच्छता राखली जात नसेल तर पोटामध्ये जंत होण्याच्या समस्या जास्त प्रमाणात वाढू लागतात.
जंताचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. १.पचनसंस्थेत वाढनाराय जंत २. यकृत किंवा इतर स्नायू मध्ये वाढणारे जंत
पोटामध्ये जंत होण्याची कारणे Causes Of Stomach Worm Infection in Kids
१. दूषित अन्न, पाणी आणि परिसर – लहान बाळाच्या पोटामध्ये जंत होण्याचे प्रमुख कारण म्हणजे दूषित अन्न किंवा पाणी आणि अस्वच्छ परिसर . अस्वच्छ आहारातून आणि अस्वच्छ असणाऱ्या आजूबाजूच्या परिसरामुळे लहान मुलांना जंत होण्याची शक्यता अधिक असते.
२. अस्वच्छता –बाळाला जेव्हा दात येत असतात तेव्हा बाळ हातामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट तोंडामध्ये घालतो. अश्यावेळी बाळ जर अस्वच्छ खेळणी किंवा काही आजूबाजूला पडलेल्या वस्तू तोंडामध्ये घालत असेल किंवा माती मध्ये खेळत असेल तरीही बाळाच्या पोटामध्ये जंत होण्याची शक्यता असते. याशिवाय बाळाचे कपडे आणि बाळाला हाताळणाऱ्या व्यक्ती यांच्या बाबतीमध्ये हि स्वच्छता असणे आवश्यक असते.
३. लहान मुलांची नाजूक असणारी रोगप्रतिकार शक्ती – तशीही लहान बाळाची कोणत्याही रोगाविरुद्ध लढण्याची क्षमता कमी असते म्हणजेच बाळाची रोगप्रतिकार क्षमता हळू हळू वाढत असते . अश्यावेळी बाळ आजारी पडण्याची शक्यता हि जास्त असते. नाजूक असणाऱ्या या रोगप्रतिकार शक्तीमुळे बाळाला जंत होण्याच्या समस्या वारंवार होतात .
४. कच्च्या अस्वच्छ भाज्या,फळे किंवा मांस खाणे – आपण नेहमी ऐकतो कि कोणताही आहार बाळाला ताजा आणि नेट शिजलेला असाच द्यावा. पण जर तुम्ही बाळाच्या आहारामध्ये नीट साफ न केलेल्या कच्च्या भाज्या किंवा खूप जास्त काळ कापून ठेवलेली फळे यांचा समावेश करत असाल तर बाळाला जंत होऊ शकतात. या शिवाय जर तुम्ही बाळाला मांसाहार देत असाल आणि तो योग्य प्रकारे शिजलेला नसेल तरीही असे संक्रमण होण्याची शक्यता असते. उघड्यावर ठेवलेले किंवा खूप वेळापूर्वी बनवलेले अन्नपदार्थ बाळाला देणे टाळावे.
५. पाळीव प्राण्यांना वारंवार हात लावणे.- तुमच्या घरामध्ये जर कोणताही पाळीव प्राणी असेल आणि बाळ त्याच्यासोबत खेळत असेल किंवा वारंवार त्याच्या संपर्कात येत असेल तर बाळाच्या पोटामध्ये जंत होण्याच्या शक्यता जास्त असतात. त्यामुळे लहान मुलांपासून पाळीव प्राण्याना शक्य तेवढे दूरच ठेवावे.
पोटातील जंत होण्याची लक्षणे Signs Of Stomach Worm Infection
१. मुलांचे वजन कमी होणे , भूक न लागणे.
जेव्हा लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होतात तर त्यावेळी बाळाचे हिमोग्लोबिन ही कमी होते , बाळ सतत चिडचिड करू लागते, पुरेशी भूक लागत नाही, बाळ नीट खात नाही त्यामुळे नक्कीच बाळाचे आजारी पाडण्याचे प्रमाण वाढते आणि वजनसुद्धा कमी येते.
२. उलट्या जुलाब होणे.
जंतांमुळे बाळाला सतत जुलाब आणि उलट्या होऊ लागत , बाळ जे खातो ते बाळाला नीट पचत नाही. अश्यावेळी डिहायड्रेशन होणार नाही याची काळजी घ्यावी. भरपूर पाणी आणि इतर पातळ पदार्थ बाळाला द्यावेत.
३. लघवी किंवा शी करताना वेदना होणे किंवा त्या जागांवर खाज सुटणे.
बाळाला सौचास करणं किंवा लघवी करताना खूप जास्त वेदना होतात. त्या जागेवर खाज येते. जंतांचे प्रमाण जर जास्त असेल तर लघवी किंवा शी मधून किंवा त्या जागेमधून जंत बाहेर पडतानाही दिसतात . जंत बाहेर पडत असतानाही बाळाला खूप त्रास होतो.
४. अशक्तपणा आणि पोटदुखी होणे.
बाळाच्या पोटामध्ये जंत होतात तेव्हा बाळ जे खातो ते बाळाच्या अंगी लागत नाही, बाळाला पुरेसे पोषण मिळत नाही त्यामुळे बाळाचे हिमोग्लोबिनची पातळी कमी होते, आवश्यक असणारे घटक न मिळाल्याने अशक्तपणा येतो आणि बाळ सतत आजारी पडते. शिवाय या जंतामुळे बाळाच्या पोटामध्येहि दुखू लागते.
पोटातील जंतावर घरगुती उपचार Remedies For Stomach Worm Infection
जंतांचे प्रमाण जास्त असल्यास आणि वारंवार होत असल्यास डॉक्टरांची मदत घ्यावी , पुढे काही घरगुती उपचारही दिले आहेत एक वर्षांपेक्षा मोठ्या मुलांसाठी हे करावेत.
१. लहान मुलांना जंत झाल्यास मुलांच्या आहारामध्ये लसूण, काळी मिरी, हळद या मसाल्यांचे प्रमाण वाढवावे आणि गोड पदार्थांचे प्रमाण कमी करावे.
२. अर्धा चमचा मधामध्ये एक चिमूटभर धने पावडर घालून ते मिश्रण चाटवावे.
३. दररोज दिवसातून २ वेळा एक चमचा ओव्याच्या पावडरमध्ये पाव चमचा तूप आणि थोडेसे सैंधव मीठ घालून हे मिश्रण खायला द्यावे.
४. लहान मुलांना वारंवार जंत होत असतील तर सकाळी उठल्याबरोबर मुलांना एक चमचा एरंडेल तेल प्यायला द्यावे, पोट साफ होऊन शी वाटे जंत बाहेर पडतात.
५. आंब्याची कोय वाळवून , थोडी भाजून त्याची पावडर मधातून बाळाला दिल्यासही जंतांचे प्रणाम कमी येते.
६. मध आणि डिकमळ सुद्धा जंतावर प्रभावी औषध आहे.
७. एक चिमटी जिऱ्याची पावडर , एक चिमटी वावडिंग पावडर आणि २-३ चिमट्या गुळाची पावडर एकत्र करून मुलांना उपाशीपोटी खायला द्या. सलग ३-४ दिवस हा उपाय केल्यास पोटातील जंत बाहेर पडतात.
८. कारल्याच्या पानांचा अर्धा चमचा रस आणि एक चमचा एरंडेल तेल एकत्र करून ते प्यायला द्यावे.
मुलं जशी मोठी होतात , बाहेरच्या परिसराशी संपर्क वाढतो त्यानंतर प्रत्येक ६ महिन्यांनी बाळाला पोटातील कृमिनाशक औषध योग्य तो वाद्यकीय सल्ला घेऊन देणे गरजेचे असते. मुलांच्या पोटामध्ये जेव्हा जंत/कृमी होतात त्यावेळी मुलं जे खातात ते सर्व हे जंत खातात त्यामुळे काहून हि अन्नपदार्थ त्यांच्या अंगी लागत नाही. मुलांचे वजन , हिमोग्लोबिन कमी होते , अशक्तपणा वाढतोय नि इतर आजार हि उदभवतात. त्यामुळे जंतांवर वेळीच उपचार करणे गरजेचे असते.
या लेखामधून मी तुम्हाला लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होण्याची करणे आणि त्यावरील सर्व घरगुती उपाय याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.