डिलिव्हरीनंतर बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी? Best Post Delivery Care Tips For New Mother

Spread the love

बाळाला जन्म देणे हे आईसाठी खूप त्रासदायक असते , बऱ्याच वेदना आणि त्रास सहन करून आईची डिलिव्हरी होते. बाळंतपणात झालेला रक्तस्त्राव आणि शरीराची झालेली झीज भरून येण्यासाठी आईला पहिल्या सव्वा महिन्यापर्यंत तरी खूप जास्त काळजी घेणे आवश्यक असते. हि काळजी कशी घ्यावी कोणत्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे याबद्दल सविस्तर माहिती या लेखामध्ये दिली आहे.

बाळंतिणीची अशी घ्या काळजी
१. बाळंतिणीचा आहार

गरोदरपणाप्रमाणेच बाळाच्या जन्मानंतरही आईला पोषक आणि ताजा आहार घेणे गरजेचे असते. आई जो आहार घेते तोच बाळाला दुधामार्फत मिळत असतो. आई जर पौष्टिक आणि पुरेसा आहार घेत असेल तर तयार होणारे दूध हि तेवढेच पोषक असेल शिवाय डिलिव्हरीच्या दरम्यान शरीराची झालेली झीज आणि अशक्तपणा लवकर कमी येण्यास हि मदत होईल .
फक्त दूध भात, वरण भात न खाता सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या , डाळी , दूध आणि दुधाचे पदार्थ , सुका मेवा , अंडी , मटण , मासे यांचा समावेश आहारामध्ये करावा. तेलकट , मसालेदार , जंक फूड, हॉटेलमधील किंवा केमिकल असणारे पदार्थ टाळावेत .

Taking care of new mother
२.आहारमधील पाण्याचे प्रमाण

बऱ्याचदा हा गैरसमज असतो कि डिलीव्हरीनंतर जास्त पाणी पिऊ नये पण बाळाच्या जन्मानंतर पोटाचा राहिलेला घेर , वाढलेले वजन कमी करण्यासाठी आणि आईच्या दुधाची मात्र वाढवण्यासाठी आईने दिवसातून कमीत कमी ८-१० ग्लास पाणी पिणे आवश्यक असते. या शिवाय फळाचे रस, लिंबू पाणी , जिऱ्याचे पाणी , मिल्कशेक घ्यावेत म्हणजे शरीरामध्ये पाण्याची पातळी राखली जाते. शरीरात जर आवश्यक पाणी असेल तर इन्फेक्शन होण्याची शक्यताही कमी असते.

३. स्वच्छता

डिलिव्हरीनंतर योग्य ती स्वच्छता ठेवणे बाळाच्या आणि आईच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे असते. डिलिव्हरी दरम्यान सीझर असेल तर पोटाला किंवा कधी कधी नॉर्मल डिलिव्हरीमध्ये योनीभागात टाके लागतात. योग्य ती स्वच्छता नाही राखली गेली तर इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. या शिवाय बाळाचे आरोग्यही नाजूक असते योग्य ती स्वच्छता नसेल तर बाळालाही त्रास होऊ शकतो.

. मालिश आणि शेक

डिलिव्हरीनंतर आईचे शरीर सैल पडते , अशक्तपणा आलेला असतो, थकवा जाणवत असतो अश्यावेळी दिवसातून २ वेळा जर आईच्या शरीराचे मालिश केले जात असेल तर हा थकवा किंवा अशक्तपणा जाण्यास मदत होते.
भारतीय संस्कृतीमध्ये बाळंतपणानंतर शेक देण्याचीही पद्धत आहे. शेपा, ओवा, कडुलिंबाची पाने अश्या काही औषधी गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचा कोळश्याच्या शेगडीच्या मदतीने शेक दिला जातो. यामुळे आई व बाळाच्या आसपासचे वातावरण निर्जंतुक बनते, उबदार राहते शिवाय आईच्या शरीरालाही अराम मिळण्यासाठी,वेदना कमी होण्यासआणि थकवा जाण्यासाठी मदत होते.

 

५. आराम आणि व्यायाम

डिलिव्हरीच्या दरम्यान शरीराची झालेली झीज आणि वेदना यामुळे आईला अशक्तपणा आलेला असतो. पोषक आहारासोबतच पुरेसा आरामही गरजेचा आहे. किमान पहिल्या सव्वा महिन्यापर्यंत आईने विश्रांती घेणे आणि शारीरिक आणि मानसिक दृष्ट्याही शांत राहिले पाहिजे.
बाळंतपणानंतर पोटावर किंवा शरीराच्या कोणत्याही भागावर खूप जास्त दाब पडेल असे व्यायाम प्रकार टाळावेत , शक्यतो हळू हळू चालणे आणि काही प्राणायाम करू शकता. बाळ जोपर्यंत स्तनपान घेते आहे तोपर्यंत वजन कमी करण्यासाठी कोणताही कठीण व्यायाम करू नये.

 

. औषादोपचार आणि तपासण्या

सीझर किंवा नॉर्मल डेडिलिव्हरीनंतरही डॉक्टरांनी सांगितलेली औषधे वेळेमध्ये न चुकता घ्यावीत. याशिवाय काही तपासण्या असतील तर त्याही सांगितलेल्या वेळेमध्ये कराव्यात. पोटाला किंवा योनीमार्गात टाके असल्यास ते ठीक झाले आहेत कि नाही किंवा काही इन्फेक्शन नाही ना तपासण्यासाठी डेलिव्हरीनंतर ६ आठवडयांनी डॉक्टरांना जरूर भेटावे.डिलिव्हरी दरम्यान पडलेल्या टाक्यांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा. 
डॉक्टरांच्या योग्य त्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या किंवा औषधे घेऊ नयेत.

डिलिव्हरीनंतर कोणते पदार्थ खाणे टाळावेत?

डिलिव्हरीनंतर मासिक पाळी कधी येते ?

1 thought on “डिलिव्हरीनंतर बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी? Best Post Delivery Care Tips For New Mother”

  1. Pingback: नॉर्मल डिलिव्हरी कशी केली जाते ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *