घरामध्ये नवीन बाळाचा जन्म झाला कि बाळाच्या प्रत्येक गोष्टींकडे आपले विशेष लक्ष असते . खासकरून बाळाच्या वजन वाढीकडे . बाळाचे उत्तम वजन असेल तर बाळ सुदृढ आणि निरोगी राहते , योग्य ती वजन वाढ हा बाळाच्या सर्वांगीण विकासाचा महत्वाचा घटक आहे.
पहिल्या ६ महिन्यामध्ये बाळाचे वजन खूप झपाट्याने वाढते . या दरम्यान बाळाच्या वजन वाढीसाठी एकमेव मार्ग म्हणजे आईचे पुरेसे आणि पोषक दूध . आईच्या दुधामध्ये सर्व पोषक घटक आणि खनिजे असतात , जे बाळाच्या वजन वाढीसाठी , रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वाचे असतात . नवजात बाळाच्या वजन वाढीसाठी खालील गोष्टी महत्वाच्या आहेत. या लेखामध्ये आपण नवजात बाळाचे वजन कसे वाढवावे ? कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत .
१. पुरेसे आणि संतुलित स्तनपान Breastfeeding Schedule
नवजात बाळाला पहिल्या ३-४ महिन्यांपर्यंत प्रत्येक २ तासांनी पोटभर स्तनपान करावे . बाळाचे पोट लहान असते शिवाय आईचे दूध हि पचवण्यास हलके असते त्यामुळे बाळाला प्रत्येक २ तासांनी भूक लागते . बाळ झोपले असले तरीही हलके जागे करून बाळाच्या तोंडामध्ये निप्पल दिल्यास बाळ दूध प्यायला लागते . बाळाने प्रत्येक बाजूला कमीत कमी १०-१५ मिनिटे स्तनपान घेणे आवश्यक असते .
रात्रीसुद्धा बाळाला दिवसाप्रमाणेच प्रत्येक २ तासांनी दूध द्यावे .
बाळ जर ९ महिन्याच्या आधी जन्माला आले असेल , किंवा वजनाने खूपच कमी असेल किंवा काही आजार असेल तर आईचे दूध पिण्यास असमर्थ असू शकतात , अश्या वेळी बाळाला पंप नि दूध काढून चमच्याने बाळाला पाजावे . काही वेळेस आईला पुरेसे दूध येत नाही अश्यावेळी बाळाला गाईचे किंवा म्हशीचे दूध न देता फॉर्मुला मिल्क द्यावे जे आईच्या दुधाएवढेच पोषक असते .
२. आईचा आहार Breastfeeding Mother’s Diet
आई जो आहार घेते तोच बाळाला फिल्टर होऊन दुधामार्फत मिळत असतो त्यामुळे आईने तिचा आहार संतुलित आणि वेळेत घेणे हि गरजेचे असते . आईच्या आहारामध्ये जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या , फळे आणि दूध आणि दुधाचे पदार्थ असावेत ज्यामुळे बाळालाही आवश्यक असणारे पोषक घटक मिळतील आणि बाळाची वाढ उत्तम प्रकारे होईल .
३. बाळाची झोप Baby’s Sleep –
नवजात बाळ संपूर्ण २४ तासामध्ये १६-१८ तास झोप घेणे आवश्यक असते . बाळाच्या वाढीसाठी लागणारे ग्रोथ हार्मोन्स झोपेमध्ये जास्त सक्रिय असतात त्यामुळे बाळ जेवढा छान झोपेल तेवढी बाळाची वाढ उत्तम होते .
४. बाळाचे मालिश Baby’s Massage –
अगदी पहिल्या दिवसापासून बाळाच्या शरीराचे योग्य प्रकारे मालिश करावे .मालिशमुळे बाळाचे रक्ताभिसरण सुधारते , हाडांमध्ये बळकटी येते, बाळाला भूक छान लागते , थकवा निघून जातो आणि झोप हि गाढ आणि शांत लागण्यास मदत होते . पहिल्या २ वर्षापर्यंत दिवसातून २ वेळा बाळाच्या शरीराचे मालिश चांगल्या तेलाने करणे अपेक्षित असते. बाळाची नाळ ओली असेल तर नाळेभोवतीच्या भागावर दाब पडणार नाही याची काळजी घ्यावी. नाळ असून तो बेंबीभोवतीचा भाग सुकल्यास बाळाला त्याच्या पोटावर झोपवण्यास (Tummy Time ) सुरुवात करावी .
५. बाळाचे लसीकरण Vaccination
बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व काही गंभीर आजारांपासून बाळाचे रक्षण करण्यासाठी नेमून दिलेले लसीकरण हे वेळेत देणे आवश्यक असते . बाळाचे लसीकरण जर वेळेत होत असेल तर बाळाचे आजारी पाडण्याचे प्रमाण कमी होते . बाळ जर निरोगी आणि सुदृढ असेल तर वजन हि उत्तम प्रकारे वाढते .
( हे वाचा बाळाचे लसीकरण संपूर्ण माहिती -Baby’s Vaccination Schedul in Details 2022 )
बाळाला पुरेसे पोटभर दूध मिळते आहे कि नाही हे हि जाणून घेणे जास्त गरजेचे असते . बाळ दिवसातून कीमान ६ वेळा लघवी करत असेल आणि शी करत असेल , शांत झोप घेत असेल आणि बाळाचे वजन हि वाढत असेल तर बाळाला पुरेसे दूध मिळते आहे असे तुम्ही समजू शकता .
या लेखामधून मी तुम्हाला नवजात बाळाचे वजन कसे वाढवावे आणि कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.
डिलिव्हरीनंतर बाळंतिणीची काळजी कशी घ्यावी? Best Post Delivery Care Tips For New Mother