मुलांना रंगांची आणि आकारांची ओळख कशी करून द्यावी ? How to teach colors and shapes to preschoolers In Marathi

Spread the love
मुलांना रंगाची आणि आकारांची ओळख करून देताना या गोष्टी जरूर लक्षात घ्या . 

लहान वयामध्ये मुलांची शिकण्याची क्षमता(grasping power) खूप जास्त प्रमाणात  असते त्यामुळे तुम्ही बाळाला वेगवेगळे खेळ, गोष्टी, गाणी शिकवत असाल तर बाळाच्या बुध्दीलाही चालना मिळते आणि बाळ सर्व गोष्टी पटकन शिकू लागतो. पहिल्या ३ वर्षांमध्ये बाळाला सर्व गोष्टी खेळाच्या स्वरूपात बाळाच्या कलाकलाने त्याच्या आवडीनिवडी प्रमाणे शिकवायच्या असतात.यासर्व गोष्टींमध्ये खरंतर आई-वडिलांची कसरतच असते. कारंण लहान मुलांना शिकवतांना खूप संयम(patience) ठेवावा लागतो. मी आज तुम्हाला मुलांना रंगांची आणि आकारांची ओळख कशी करून द्यावी याबद्दल काही टिप्स सांगणार आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

  1. रंगांची ओळख. (Color Recognition)

साधारणपणे मुले १ ते १.५ वर्षाची झाली की हळूहळू बोलू लागतात. त्यामुळे या वयात तुम्ही मुलांना रंगांची ओळख(Color Recognition) करून देऊ शकता. यासाठी तुम्ही भिंतीवर रंगांचे तक्ते(Color tables) लावू शकता. आणि बाळाला रंग हाताने पॉईंट आऊट करायला शिकवू शकता.  तसेच बोर्ड बुक्सचा वापर करू शकता,ज्यामध्ये हे सर्व रंग असतील आणि त्यामुळे बाळाला रंगांची ओळख होईल. आणि सारखा सारखा सराव केल्यानंतर बाळ हळूहळू रंग ओळखू लागेल.

  1. 1. रंगांची खेळणी किंवा इतर वस्तू ओळखायला शिकवणे. (Teaching them to recognize colored toys or other objects)

यासाठी सुरुवातीला फक्त २-३ रंगांचीच  ओळख बाळाला करून द्यायची आहे आणि त्या रंगांची खेळणी किंवा इतर वस्तू ओळखायला शिकवायच्या आहेत ज्यामुळे बाळाचे खेळणेही होईल आणि खेळता खेळता बाळ रंगदेखील ओळखू लागेल.यामध्ये उदाहरणच द्यायचे झाले तर तुम्ही त्यांना वेगवेगळ्या रंगाचे फुगे(balloons) देऊ शकता. आणि त्यामुळे वेगवेगळ्या रंगांची ओळख बाळाला होईल.

  1. 2. एकाच रंगाच्या वस्तू एकत्र ठेवणे. (Putting objects of the same color together)

ही  एक Sorting Activity आहे ज्यामुळे बाळाला रंगामध्ये वेगळेपण लवकर लक्षात येते आणि रंगांची नावेसुद्धा लक्षात राहतात.यासाठी तुम्ही तुमच्या बाळाला वेगवेगळ्या रंगांचे ब्लॉक्स देऊ शकता आणि त्यांना एका विशिष्ट रंगाचे नाव सांगून त्या रंगाचे ब्लॉक्स गोळा करायला सांगू शकता. उदाहरणार्थ तुमच्याकडे हिरवा(green),लाल(red),पिवळा(yellow),गुलाबो(pink) असे चार रंगांचे ब्लॉक्स आहेत. तर तुम्हाला तुमच्या बाळाला सांगायचे आहे की या सर्व ब्लॉक्स मधून मला फक्त लाल रंगाचे ब्लॉक्स आणून दे. याप्रमाणे बाळाला एक एक रंगाची ओळख होईल.  

3.कोणतीही वस्तू दाखवताना बाळाला रंगाची ओळख करून देणे. (Introduce color to baby while showing any object)

 

 मुलांना एखादी वस्तू दाखवत असताना किंवा देत असताना त्याचा रंग आवर्जून सांगा म्हणजे बाळाचा शब्दसंग्रह देखील वाढेल आणि रंगही समजू लागतील. उदाहरणार्थ तुम्ही समजा कुठे बाहेर गेला आहात आणि बाळाला एखादी सायकल दाखवत असाल आणि ती लाल रंगाची असेल तर तुम्ही बाळाला विचारू शकता ही कोणत्या रंगाची आहे जर बाळाला रंग ओळखायला समजले असेल तर तो बरोबर उत्तर देईल. अशाप्रकारे तुम्ही बाळाला एखादी नवीन वस्तूदेखील सांगू शकता आणि त्याबरोबरच रंगांची ओळखदेखील करून देऊ शकता.

how to teach colors and shapes to preschoolers In Marathi
  1. आकारांची ओळख (Identification of shapes)

एकदा का बाळ रंग ओळखू लागले की मग हळूहळू त्याच्या आवडीप्रमाणे त्याला आकारांची ओळख करून द्यावी.

१. सुरुवातीला अगदी बेसिक वर्तुळ(Circles), चौकोन(squares), आयत(rectangles), त्रिकोण(triangles) असे आकार शिकवावेत . यासाठी तक्त्यांचा किंवा पुस्तकांचं वापर करू शकता.

२. आकारांची ओळख करून दिल्यानंतर बाळाला खेळता खेळता प्रश्न विचारावे उदाहरणार्थ बॉलचा आकार कसा आहे? पुस्तकाचा आकार कसा आहे यावर बाळाला आकारांबद्दल समजले असेल तर बाळ बॉलचा आकार गोल(Circles) आहे आणि पुस्तकाचा आकार आयत(rectangle) आहे परंतु जर बाळाला समजले नसेल तर त्याच्यावर चिडून न जाता त्याला वेगवेगळ्या पद्धतींनी समजवण्याचा प्रयत्न करावा.

३.यासाठी बाजारामध्ये शेप सॉर्टींग ची खेळणीही मिळतात ती  मुलांना फार आवडतात त्यांचा  वापर करून तुम्ही मुलांना आकार शिकवू शकता.

४. बाळाला कोणत्याही प्रकारचा कंटाळा येणार नाही आणि हे सर्व बाळ आवडीने करेल यासाठी वेगवेगळ्या कल्पना लढवून वेगवेगळे खेळ बाळासोबत खेळायचे आहेत.

वर दाखवलेले चार्ट तुम्ही डाउनलोड करून प्रिंट काढून मुलांना रंगांची आणि आकारांची ओळख करून देण्यासाठी वापरू शकता . 

हे चार्ट फ्री डाउनलोड करण्यासाठी चार्टखाली  दिलेल्या डाउनलोड बटणवर क्लिक करा. 

मी केलेली एक छोटीशी कविता

लहान मुलांना शिकवताना ठेवावा लागतो खूप संयम
आणि राहा तुम्ही ठाम तुमच्या विचारांवर कायम


मौज मजा मस्तीदेखील करू द्यावी त्यांना थोडी
खेळता खेळता वाटू लागेल त्यांना अभ्यासातही गोडी


शोधून काढा त्यांच्यासाठी वेगवेगळ्या  प्रकारचे खेळ
 मुलांसाठी काढावाच लागतो थोडासा तरी वेळ

मुले ओळखू लागतील वेगवेगळे रंग आणि आकार
आणि करतील एक दिवस तुमचे स्वप्न साकार

 

FAQ (Frequently Asked Questions)

१)तुम्ही मुलांना लहान वयात काय काय शिकवू शकता?

लहान मुलांचे वय हे खेळण्याबरोबरच शिकण्याचे देखील असते. आणि त्यांची grasping power जास्त असल्यामुळे तुम्ही त्यांना हळूहळू वेगवेगळ्या गोष्टी शिकवू शकता. मुले बोलायला लागली की त्यांना हळूहळू देवाचे श्लोक देखील शिकवू शकता.लहान मुलांना पाठांतर करायला जास्त वेळ लागत नाही.

२)मुलांना स्वावलंबी(independent) कसे बनवावे?

मुलांना लहानपणापासूनच स्वावलंबी बनवले तर ते तुमच्या आणि मुलांच्या दृष्टीने चांगले असते. यामध्ये तुम्ही मुलांना लहानपणापासूनच त्यांची कामे त्यांना स्वतः करण्यासाठी प्रवृत्त करा. उदाहरणार्थ स्वतःची खेळणी खेळून झाल्यावर स्वतः भरणे,हाताने जेवणे etc.

तर मी आज तुम्हाला मुलांना रंगांची आणि आकारांची ओळख कशी करून द्यावी ? how to teach colors and shapes to preschoolers याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली . मला खात्री आहे की या  माहितीचा(information) तुम्हाला नक्की फायदा होईल. जर तुम्हाला याविषयी काही शंका (doubts) असतील तर Comment Box मध्ये लिहा. मी तुमच्या प्रश्नांची(Questions) उत्तरे (Answers) देण्याचा नक्की प्रयत्न करेन.

अधिक वाचा 

मुलांना इंग्लिश वाचायला कसे शिकवावे. Best Tips To Teach English Reading TO Kids

How To Choose Best School For Child in 2022 ? मुलांसाठी प्राथमिक शिक्षणासाठी शाळा निवडत असताना या गोष्टी घ्या लक्षात

मुलांना अभ्यासाची गोडी कशी लावावी?

3 thoughts on “मुलांना रंगांची आणि आकारांची ओळख कशी करून द्यावी ? How to teach colors and shapes to preschoolers In Marathi”

  1. Tai, tumcha pratek video kiti helpful asto he me shabdat nai sangu shakat, kuthlahi questions vicharla ki tumhi lagech reply deta he mala khupp awadta.maza mulga ata 20 month cha ahe tyala tumche video baghun sagla halu halu shikvaycha prayatna kartey, once again thank you so much tai 😊🙏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *